नवी दिल्ली, 30 मे : केंद्र सरकारने (Central Government) डिजीटल इंडियाद्वारे (Digital India) एक नवं चॅलेंज सुरू केलं आहे. या चॅलेंजद्वारे लोकांना 5 लाख रुपये जिंकण्याची संधी मिळणार आहे. 5 लाख रुपये जिंकण्यासाठी या स्पर्धेत भाग घ्यावा लागेल, जिंकणाऱ्या स्पर्धकाला विनिंग अमाउंट दिली जाईल. भारत सरकार आणि संयुक्त राष्ट्रांच्या SDG (UN SDGs) स्वच्छ भारत मिशनच्या (Swachh Bharat Mission) समर्थनार्थ हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडने (Hindustan Unilever Ltd.) इन्वेस्ट इंडिया (Invest India), स्टार्टअप इंडिया (Startup India) आणि AGNIi सह मिळून एक ग्रँड वॉटर सेव्हिंग चॅलेंज (Grand Water Saving Challenge) सुरू केलं आहे.
सरकारकडून सुरू करण्यात आलेली ही स्पर्धा अतिशय इंटरेस्टिंग आहे. या स्पर्धेत इंडियन टॉयलेटसाठी (Indian Toilet) एक इनोवेटिव्ह फ्लश सिस्टम (Innovate Flush System) तयार करायची आहे. टॉयलेट स्वच्छ ठेवण्यासह यात वॉटर सेविंगकडेही लक्ष दिलं जावं, हा या स्पर्धेचा उद्देश आहे. या स्पर्धेमुळे स्वच्छतेसह पाण्याचा उपयोग कमी करण्याकडेही लक्षकेंद्रित केलं जाईल.
कसं कराल अप्लाय -
या स्पर्धेत भाग घेण्यासाठी https://www.startupindia.gov.in/content/sih/en/ams-application/challenge.html?applicationId=6050cc03e4b03f92cbc8c95e या लिंकवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर स्टार्टअप इंडिया हबवर आपली एन्ट्री करता येईल. आपलं मॉडेल तयार केल्यानंतर 25 जून 2021 पर्यंत ते सबमिट करू शकता, ही स्पर्धेची शेवटची तारीख आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.