• Home
  • »
  • News
  • »
  • technology
  • »
  • भारतात 5G नेटवर्कच्या ट्रायलला मंजुरी; 'या' कंपन्या करणार टेस्टिंग, चायनीज कंपन्यांना No Entry

भारतात 5G नेटवर्कच्या ट्रायलला मंजुरी; 'या' कंपन्या करणार टेस्टिंग, चायनीज कंपन्यांना No Entry

भारत सरकार देखील मेक इन इंडिया या अभियानातंर्गत भारताला ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब निर्माण करण्याच्या तयारीत आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 5 मे: भारतात 5G नेटवर्क (5G Network) आता अगदी हाकेच्या अंतरावर आलं आहे. केंद्र सरकारच्या टेलिकम्युनिकेशन्स विभाग (Telecommunication Department) आणि दळणवळण मंत्रालयाने 5G ट्रायलला मंजुरी दिली आहे. ज्यांना 5G स्पेक्ट्रमचं (Spectrom) वाटप करण्यात आलं आहे, त्यांनाच ही मंजुरी मिळाली आहे. या आठवड्यापासून संबंधित कंपन्या या ट्रायल्स सुरु करतील, असे वृत्त आहे. भारतात जिओ (Jio), भारती एअरटेल (Bharti Airtel) आणि वी (Vi) या खासगी टेलिकॉम कंपन्या 5Gची ट्रायल सुरु करणार आहेत. परंतु, ही ट्रायल किती काळ चालेल हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. परंतु, सूत्रांनी सीएनबीसी 18 ला दिलेल्या माहितीनुसार, चिनी पुरवठादार या ट्रायलमध्ये सहभागी नसतील, हे स्पष्ट आहे. त्यामुळे टेलिकॉम इक्विपमेंट कंपनी हुवैई ही देखील या ट्रायलमध्ये सहभागी होणार नाही. जेव्हा भारताने 5G रोलआऊटवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवले, त्यावेळी ही घोषणा करण्यात आली आहे. काही महिन्यांपासून भारतात 5Gच्या अनुषंगाने हालचाली सुरु आहेत. परंतु, त्यास अधिकृत दुजोरा मिळण्याची आणि 5G परीक्षणासाठी स्पेक्ट्रमचे वाटप होण्याची प्रतिक्षा होती. जिओ करतोय स्वदेशी 5नेटवर्क विकसित एक स्वदेशी 5G नेटवर्क विकसित करणार असल्याच्या चर्चेस रिलायन्स जिओने (Reliance Jio) यापूर्वी दुजोरा दिला आहे. याकरिता कंपनी मॅसिव्ह एमआयएमओ आणि 5G नेटवर्कसाठी आवश्यक स्मॉल सेल उपकरणांच्या निर्मितीवर काम करीत आहे. जिओ भारत सरकारच्या आत्मनिर्भर भारत या अभियानातंर्गत ही यंत्रणा पूर्णतः मेड इन इंडिया (Made In India) या तत्वावर उभारत आहे. एअरटेलने हैद्राबादमध्ये घेतली होती चाचणी जानेवारीत भारती एअरटेलने (Airtel) हैद्राबाद येथे कर्मशिअल नेटवर्कवर 5Gची तपासणी यशस्वी झाल्याचा दावा केला होता. तसेच आमचे 5G नेटवर्क तयार आहे. आता केवळ सॉफ्टवेअर अपडेट सक्षम करणे आणि स्विच बदलण्यासाठी नियामकांची मंजूरी आवश्यक आहे,असे नमूद केले होते. वाचा: Gmail अकाउंट हॅक झाल्यास असं करा रिकव्हर; जाणून घ्या या सोप्या 8 स्टेप्स या मेगाहर्टझवर (Megahertz) होऊ शकते टेस्टींग तथापि भारतात 5G मोबाईल नेटवर्क चाचण्यांसाठी कोणते बॅन्ड (Band) असतील हे पाहणे आता बाकी आहे. लवकरच टेलिकॉम कंपन्या हे नेटवर्क व्यावसायिक रुपात ग्राहकांसाठी रोलआउट करण्यासाठी सज्ज होती. भारतात 5G नेटवर्क 1800 मेगाहर्टझ, 2100 मेगाहर्टझ, 2300 मेगाहर्टझसह 800 आणि 900 मेगाहर्टझ बॅण्डलाही कव्हर करेल अशी आशा आहे. परंतु, हे बॅण्ड कंपनी निहाय वेगवेगळे असतील. कंपन्यांनी लॉन्च केलेत 5Gफोन्स भारतात गतवर्षी अनेक फोन कंपन्यांनी 5G कनेक्टिव्हिटी असलेले मॉडेल्स लॉन्च केले आहेत. भारत सरकार देखील मेक इन इंडिया या अभियानातंर्गत भारताला ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब निर्माण करण्याच्या तयारीत आहे. वाचा: Alert: 15 मेनंतर WhatsApp वापरता येणार नाही, डिलीट होऊ शकतं अकाउंट या क्षेत्रांना होईल मदत मागील वर्षी डिलाईटने आपल्या 5G द कॅटॅलिस्ट टू डिजिटल रेव्ह्युल्युशन इन इंडिया या अहवालात म्हटलं होतं की, भारतात 5G नेटवर्क सुरु झाल्यानंतर कारखान्यांना रिअल टाईम पुरवठादार आणि ग्राहकांशी संपर्क साधण्याची संधी मिळेल. तसेच हे कारखाने अधिक कार्यक्षम होतील अशी आशा आहे. 5G नेटवर्कमुळे रिमोट मेडीसीन, स्मार्ट सिटीज, र्व्हच्युअल बॅंकींग, 4 के आणि 8 के स्ट्रिमिंग सबस्क्रिप्शन, आगमेंटेंड रिअलिटी, बिग डेटा एनालिटीक्स आणि आर्टीफिशिअल इंटेलिजन्स या क्षेत्रांना मोठा फायदा होईल, अशी आशा व्यक्त होत आहे. 5Gच्या स्पर्धेत अन्य विकसित देशांच्या तुलनेत भारत पिछाडीवर भारत 5G नेटवर्कच्या स्पर्धेत विकसित देशांच्या तुलनेत पिछाडीवर आहे. गेल्यावर्षी नेटवर्क चाचणी पुरवठादार VIAVIच्या आकडेवारीनुसार, 5G नेटवर्क 34 देशांमधील 378 शहरांमध्ये उपलब्ध आहे आणि संख्या सातत्याने वाढत आहे. त्यावेळी दक्षिण कोरियाने 85 शहरांमध्ये हे नेटवर्क सुरु केले आहे. चीनमधील 57, युएस मधील 5, युके मधील 31 शहरांमध्ये यापूर्वीच 5G नेटवर्क सेवा सुरु झालेली आहे.
    First published: