मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Alert: 15 मेनंतर WhatsApp वापरता येणार नाही, डिलीट होऊ शकतं अकाउंट

Alert: 15 मेनंतर WhatsApp वापरता येणार नाही, डिलीट होऊ शकतं अकाउंट

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, युजर्सला कंपनीच्या या पॉलिसीचा स्वीकार करावा लागेल. कारण ही पॉलिसी रिजेक्ट करण्याचा कोणताही पर्याय उपलब्ध नाही. व्हॉट्सअ‍ॅपची नवी प्रायव्हसी पॉलिसी 8 फेब्रुवारी रोजी लागू होणार होती. परंतु ही तारीख वाढवून 15 मे करण्यात आली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Karishma
नवी दिल्ली, 4 मे : इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपचा (WhatsApp) वापर करत असाल, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. 15 मे पूर्वी नव्या प्रायव्हसी पॉलिसीचा (Privacy Policy) स्वीकार करावा लागले, अन्यथा व्हॉट्सअ‍ॅप वापरण्यास समस्या येऊ शकते किंवा व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट बंदही होऊ शकतं. जानेवारी 2021 मध्ये कंपनीने आपल्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये बदल केले होते. या पॉलिसीअंतर्गत युजर्ससाठी नवे नियम-अटी रोल आउट करण्यात आले होते. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, युजर्सला कंपनीच्या या पॉलिसीचा स्वीकार करावा लागेल. कारण ही पॉलिसी रिजेक्ट करण्याचा कोणताही पर्याय उपलब्ध नाही. व्हॉट्सअ‍ॅपची नवी प्रायव्हसी पॉलिसी 8 फेब्रुवारी रोजी लागू होणार होती. परंतु ही तारीख वाढवून 15 मे करण्यात आली आहे. अनेक वादांनंतर, तसंच युजर्समधील गोंधळाच्या वातावरणानंतर ही प्रायव्हसी पॉलिसी तीन महिन्यांसाठी टाळण्यात आली होती. बंद होणार WhatsApp - 15 मे रोजी WhatsApp नवी पॉलिसी लागू करणार आहे. जर एखाद्या युजरने व्हॉट्सअ‍ॅपच्या प्रायव्हसी पॉलिसीचा स्वीकार केला नाही, तर युजर 15 मेनंतर व्हॉट्सअ‍ॅपवर कोणताही मेसेज पाठवू शकणार नाही किंवा मेसेज येणारही नाहीत. 120 दिवसांनंतर डिलीट होणार अकाउंट - 15 मेपूर्वी युजर्स अँड्रॉईड आणि आयफोनमधून आपली चॅट हिस्ट्री डाउनलोड करू शकतात. मात्र 120 दिवसांनंतर इनअ‍ॅक्टिव्ह अकाउंट्सची चॅट हिस्ट्री मेसेज, कॉल्स, फोटो, व्हिडीओ सर्व डिलीट होईल. WhatsApp च्या New Privacy Policy बाबत संपूर्ण देशभरातून विरोध करण्यात आला आहे. भारतात व्हॉट्सअ‍ॅपचे सर्वाधिक युजर्स आहेत. नव्या पॉलिसीबाबत युजर्सकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. व्हॉट्सअ‍ॅपची नवी पॉलिसी सर्व युजर्सना ऍक्सेप्ट करावी लागणार आहे. आपली खासगी माहिती, चॅट शेअर होण्याच्या भीतीने अनेकांनी WhatsApp ला इतर पर्याय शोधले आहेत. मात्र WhatsApp ने याचं खंडन करतं, प्रायव्हेट चॅट शेअर होणार नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. सर्व चॅट end-to-end encryption ने प्रोटेक्टेड असतात. त्यामुळे कोणीही युजरचं प्रायव्हेट चॅट अ‍ॅक्सेस करू शकत नसल्याचा दावा Whatsapp ने केला आहे. तसंच प्रत्येक चॅटमध्ये व्हॉट्सअ‍ॅप end-to-end encryption चं लेबल देतं, जेणेकरुन युजर्सला त्यांचं चॅट सुरक्षित असल्याचं समजेल.
First published:

Tags: Whatsapp, Whatsapp News

पुढील बातम्या