डॉमिनोज इंडियावर Cyber Attack! 10 लाख क्रेडिट कार्ड डिटेल्ससह ग्राहकांची माहिती डार्क वेबवर

डॉमिनोज इंडियावर Cyber Attack! 10 लाख क्रेडिट कार्ड डिटेल्ससह ग्राहकांची माहिती डार्क वेबवर

ज्यांनी App वरून ऑर्डर केली आहे अशा ग्राहकांचं नाव देखील डॉमिनोज इंडियाच्या या यादीमध्ये आहे. इस्रायली सायबरक्राइम इंटेलिजन्सचे सहसंस्थापक एलन गल यांनी या घटनेचा खुलासा केला आहे. दरम्यान Dominos India कडून याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 एप्रिल: डॉमिनोज इंडिया (Domino's India) वर सायबर हल्ला (Cyber Attack) झाल्याची माहिती समोर येते आहे. तुमच्या आवडीच्या पिझ्झा आउटलेटवर सायबर हल्ला करून 13 जीबीचा अंतर्गत डेटा (Internal Data) चोरल्याची माहिती मिळते आहे. यामध्ये आयटी, लीगल, फायनान्स, मार्केटिंग, कर्मचाऱ्यांची माहिती तसंच विविध ऑपरेशन्सची माहिती इ. माहितीचा समावेश आहे. हॅकर्सचा दावा आहे की ही माहिती त्यांमा 18 कोटी ऑर्डर डिटेल्सच्या मदतीने मिळाली आहे. यामध्ये ग्राहकांचे (Customers) फोन क्रमांकं (Phone numbers), ई-मेल आईडी (Email id), पेमेंट डिटेल्स (Payments details), डेबिड (Debit) आणि क्रेडिट (Credit) कार्डच्या माहितीचा समावेश आहे. यामध्ये साधारण 10 लाख क्रेडिट कार्ड डिटेल्स डार्क वेबवर गेल्याची माहिती समोर आली आहे.

ज्यांनी App वरून ऑर्डर केली आहे अशा ग्राहकांचं नाव देखील डॉमिनोज इंडियाच्या या यादीमध्ये आहे. इस्रायली सायबरक्राइम इंटेलिजन्सचे सहसंस्थापक एलन गल  (Alon Gal) यांनी या घटनेचा खुलासा केला आहे. दरम्यान Domino's India कडून याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. Gal यांचा दावा आहे की, डॉमिनोज इंडियाचा हॅक झालेला डेटा डार्क वेबवर विक्रीसाठी आहे आणि हॅकर्स याममधून कोट्यवधींची कमाई करत आहेत.

बिटकॉइनच्या माध्यमातून अघोषित किंमतीवर विकली जाते माहिती

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार,अशा प्रकारचा डेटा डार्क वेबवर बिटकॉइन (Bitcoin)या क्रिप्टोकरन्सीद्वारे अघोषित किमतीला विकला जात आहे. या डेटासाठी हॅकर्स टेलिग्रामच्या माध्यमातून संपर्क साधत आहेत. युझर्सचा डेटा स्टोअर करण्यासाठी पेमेंट कार्ड इंडस्ट्री डाटा सिक्युरिटी स्टँडर्डचा (PCIDSS) वापर करते. हॅकर कार्ड फिंगरप्रिंट बनवण्यासाठी हॅश अल्गोरिदमचा (Hash Algorithm) वापर करू शकतात,तर ते मास्क्ड कार्डनंबरही डिक्रिप्ट (Decrypt) करू शकतात. अशा परिस्थितीत सगळ्याच कार्डधारकांची खाती धोक्यात येऊ शकतात,असं तज्ज्ञ म्हणतात.

चार वर्षात दहापटींनी वाढले सायबर हल्ले

स्टॅटिस्टा वर प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार 2020 पर्यंत भारतात इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या सुमारे 70 कोटी होती. येणाऱ्या पाच वर्षांच्या काळात ही संख्या 97.4  कोटींपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. भारत जगातील सर्वात मोठी ऑनलाइन बाजारपेठ आहे, रंजक बाब म्हणजे भारतातील इंटरनेट युजर्सची संख्या इतकी आहे की जगातील बर्‍याच विकसित देशांची लोकसंख्याही एवढी नाही.

(हे वाचा-पोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करुन मिळवा मोठा फायदा, 5.8 टक्के आहे व्याजदर)

या अहवालानुसार, 2017 मध्ये भारतात 53,117 सायबर हल्ले झाले होते. 2018 मध्ये त्यात वाढ होऊन एकूण 2,08,456 सायबर हल्ले झाले. 2019 मध्ये या हल्ल्यांची संख्या 3,94,499 एवढी होती. ऑगस्ट 2020 पर्यंत सायबर हल्ल्यांची संख्या 6,96,938 इतकी होती.

Published by: Janhavi Bhatkar
First published: April 20, 2021, 8:24 AM IST

ताज्या बातम्या