मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /जुन्या Android फोनची विक्री करण्यापूर्वी या 10 गोष्टी विसरू नका, पूर्ण न केल्यास बसेल फटका

जुन्या Android फोनची विक्री करण्यापूर्वी या 10 गोष्टी विसरू नका, पूर्ण न केल्यास बसेल फटका

बदलत्या गरजांमुळे आपण साहजिकच सध्या वापरात असलेला अँड्रॉइड फोन (Android Phone) विकून नवा स्मार्टफोन घेण्याचा विचार करू लागतो. जुन्या अँड्रॉइड फोनची विक्री करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणं आवश्यक असतं, अन्यथा अडचणी निर्माण होऊ शकतात.

बदलत्या गरजांमुळे आपण साहजिकच सध्या वापरात असलेला अँड्रॉइड फोन (Android Phone) विकून नवा स्मार्टफोन घेण्याचा विचार करू लागतो. जुन्या अँड्रॉइड फोनची विक्री करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणं आवश्यक असतं, अन्यथा अडचणी निर्माण होऊ शकतात.

बदलत्या गरजांमुळे आपण साहजिकच सध्या वापरात असलेला अँड्रॉइड फोन (Android Phone) विकून नवा स्मार्टफोन घेण्याचा विचार करू लागतो. जुन्या अँड्रॉइड फोनची विक्री करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणं आवश्यक असतं, अन्यथा अडचणी निर्माण होऊ शकतात.

पुढे वाचा ...

    मुंबई, 10 मार्च: स्मार्टफोनची (Smartphone) नवनवीन मॉडेल्स बाजारात सातत्याने दाखल होत असतात. यापैकी बहुतांश मॉडेल्समध्ये अनेक नव्या तांत्रिक बाबींचा समावेश असतो. बदलत्या गरजांमुळे आपण साहजिकच सध्या वापरात असलेला अँड्रॉइड फोन (Android Phone) विकून नवा स्मार्टफोन घेण्याचा विचार करू लागतो. जुन्या अँड्रॉइड फोनची विक्री करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणं आवश्यक असतं, अन्यथा अडचणी निर्माण होऊ शकतात.

    1. तुमचा जुना फोन क्लीन करा आणि सर्व अ‍ॅक्सेसरीज बॉक्समध्ये ठेवा, यामुळे चांगली किंमत मिळेल

    जुना अँड्रॉइड फोन विकून नवा स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टींची पूर्तता करणं गरजेचं आहे. जुन्या फोनची योग्य किंमत मिळावी यासाठी तो पुसून स्वच्छ करावा. यासाठी डिसइन्फेक्टिव्ह सोल्यूशनच (Disinfective Solution) वापरावं लागतं असं काही नाही; पण डिव्हाइसच्या पृष्ठभागावर जमा झालेली धूळ आणि बॅक्टेरिया स्वाफ करण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. तुमच्या जुन्या फोनसोबत मिळालेल्या अ‍ॅक्सेसरीज (Accessories) आणि पॅकिंग बॉक्स सुस्थितीत असतील तर विक्री करतेवेळी फोन अ‍ॅक्सेसरीजसह पॅकिंग बॉक्समध्ये ठेवावा.

    हे वाचा-iPhone 13 स्वस्तात खरेदीची संधी, पाहा काय आहे जबरदस्त डील

    2. कॉन्टॅक्ट बॅकअप आवश्यक

    तुम्ही अँड्रॉइडचा फोन आणि गुगल अ‍ॅप्स (Google Apps) वापरत असाल तर फोनची विक्री करण्यापूर्वी कॉन्टॅक्ट बॅकअप (Contact Backup) घेणं आवश्यक आहे. तुमचे कॉन्टॅक्ट जीमेल अकाउंटसोबत सिंक (Sync) नसतील तर https://contacts.google.com/ वर जाऊन तुम्ही ते मॅन्युअली सिंक करू शकता.

    3. मेसेज आणि कॉल रेकॉर्डचा बॅकअप

    तसंच तुम्ही फोनमधले मेसेज आणि कॉल रेकॉर्डचाही बॅकअप घेऊ शकता. एसएमएस बॅकअप अँड रिस्टोअर यांसारख्या थर्डपार्टी सॉफ्टवेअरचा वापर करून मेसेजचा बॅकअप घेता येतो. तुम्ही तुमचे मेसेज गुगल डेस्कवर सेव्ह करूनही बॅकअप घेऊ शकता आणि नंतर नव्या फोनमध्ये ते रिस्टोअर करू शकता.

    4. मायक्रोएसडी कार्ड तपासून मगच फोनमधून काढा

    फोनमध्ये मायक्रोएसडी कार्डचा (MicroSD Card) वापर करत असाल, तर त्यातला डाटा सुरक्षित आहे की नाही हे तपासून मगच फोनमधून काढावं.

    हे वाचा-iPhone SE आवडला नाही? हे आहेत जबरदस्त फीचर्स असलेले पर्यायी Smartphone

    5. सिमकार्ड तपासा

    फोन विक्री करण्यापूर्वी त्यातलं सिमकार्ड (Sim card) काढलं आहे ना, हेदेखील एकदा तपासावं.

    6.  WhatsApp चा बॅकअप आवश्यक

    नव्या फोनचा वापर सुरू करण्यापूर्वी व्हॉट्सअ‍ॅप चॅट (Whatsapp Chat) सेव्ह करण्यासाठी गुगलवर व्हॉट्सअ‍ॅप सेटिंगवरून चॅट बॅकअप घ्यावा. या वेळी महत्त्वाच्या काही फाइल्सचा समावेश करायचा की नाही हे देखील तुम्ही ठरवू शकता. नव्या फोनवर व्हॉट्सअ‍ॅप इन्स्टॉल केल्यानंतर हा चॅट बॅकअप रिस्टोअर करता येतो.

    हे वाचा-मुंबईत दिसली Batman ची बाईक, मारुती अल्टोपेक्षाही आहे जास्त पॉवर; काय आहे किंमत

    7. फोटो, व्हिडीओ आणि अन्य मीडिया फाइल्सचा बॅकअप क्लाउड किंवा एक्सटर्नल डिव्हाइसवर घ्या

    जुन्या फोनमधले फोटोज, व्हिडीओ किंवा अन्य मीडिया फाइल्सचा बॅकअप घेण्यासाठी तुम्ही गुगल फोटो, गुगल ड्राइव्ह, मायक्रोसॉफ्ट वन ड्राइव्ह, ड्रॉपबॉक्स यांसारख्या विश्वसनीय क्लाउड सेवेचा वापर करू शकता. तसंच मीडिया फाइल्स (Media Files) हार्ड डिस्क ड्राइव्ह किंवा एसएसडीमध्ये (SSD) फिजिकली ट्रान्सफर करू शकता. विक्री करण्यापूर्वी फोनमध्ये आपल्या वैयक्तिक मीडिया फाइल्स नाहीत ना, हे तपासणं आवश्यक आहे.

    8. फॅक्टरी रिसेट करण्यापूर्वी सर्व अकाउंटमधून लॉग आउट करा

    स्मार्टफोन फॅक्टरी रिसेट (Factory Reset) केल्यास त्यावरचा सर्व डाटा जात असला, तरी तुम्ही यामुळे गुगल अकाउंटवरून लॉगआउट होऊ शकत नाही. त्यामुळे फॅक्टरी रिसेट करण्यापूर्वी सर्व अकाउंटमधून लॉगआउट केलं आहे ना, हे एकदा तपासून पाहावं. यासाठी फोनच्या सेटिंगमध्ये अकाउंट शोधून लॉग-इन अकाउंट तपासू शकता. तसंच जीमेल सेटिंग्जमधल्या अकाउंटवर जाऊनही हे तपासता येतं.

    हे वाचा-सर्वात स्वस्त iPhone SE लाँच पण भारतात मिळणार 11000रुपये महाग, पाहा स्पेसिफिकेशन

    9. तुमचा फोन एनक्रिप्टेड आहे का तपासा

    फॅक्टरी रिसेट करण्यापूर्वी तुम्ही तुमचा अँड्रॉइड फोन एन्क्रिप्ट केला होता का, हे तपासावं. जर नसेल तर तो मॅन्युअली एन्क्रिप्ट करता येतो. एन्क्रिप्शनमुळे कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीला फॅक्टरी रिसेटनंतर तुमचा डाटा सहजासहजी अ‍ॅक्सेस करता येत नाही. बहुतांश जुने फोन नसले, तरी नवे अँड्रॉइड फोन एन्क्रिप्टेड असतात.

    10. फॅक्टरी रिसेट अवश्य करा

    जुन्या फोनमधल्या सर्व डेटाचा बॅकअप घेतल्यानंतर आणि फोन एन्क्रिप्टेड केल्यानंतर तुम्ही तो फॅक्टरी रिसेट करू शकता. फोन सेटिंग्जमध्ये रिसेट हा ऑप्शन शोधावा. त्यातला 'इरेज ऑल डाटा (फॅक्टरी रिसेट)' हा ऑप्शन निवडावा. असं केल्यानं तुमच्या स्मार्टफोनमधला सर्व डेटा डिलीट होईल. जुन्या फोनची विक्री करण्यापूर्वी या सर्व गोष्टींची काळजी घेतल्यास तुम्हाला भविष्यात कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही.

    First published:

    Tags: Smartphone, Smartphones