नवी दिल्ली, 9 दिल्ली : अॅपलने (Apple) 8 मार्च रोजी त्यांच्या पीक परफॉर्मन्स नावाच्या एका व्हर्चुअल स्प्रिंग इव्हेंटमध्ये iPhone SE लाँच केला आहे. हा फोन स्वस्त असल्याचं सांगत कंपनीने लाँच केलाय. या फोनची अमेरिकेतील किंमत 33 हजार असून ज्यांना भारतात हा फोन घ्यायचाय त्यांना या फोनसाठी तब्बल 43,900 रुपये मोजावे लागणार आहेत. या फोनमध्ये खूप चांगले आणि नवीन फीचर्स देण्यात आले आहे. परंतु फोनची डिझाईन मात्र जुनीच आहे. कंपनीने 2020 मध्ये आलेल्या या फोनला रिलाँच केलंय, त्यामुळे डिझाईन बदलण्यात आलेली नाही.
तुम्हाला जर या किमतीत iPhone SE आवडला नसेल, तर याच किमतीत तुमच्यासाठी परवडणारे फोनचे काही ऑप्शन आहेत. याच किमतीत अशाच फीचर्ससह चांगल्या डिझाईनमध्ये उपलब्ध असलेले पाच फोन कोणते आहेत?
Samsung Galaxy S20 FE 5G
भारतीय बाजारात या फोनची किंमत 36,999 रुपये आहे. फोनमध्ये 2400×1080 पिक्सेल रिझोल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेटसह 6.5-इंची FHD+ सुपर AMOLED Infinity-O डिस्प्ले देण्यात आला आहे. डिस्प्ले कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 द्वारे सुरक्षित आहे. या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर आहे. तसंच फोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज आहे.
हा Android 11 वर आधारित कंपनीच्या One UI 3.1 वर चालतो. फोनमध्ये 4500mAh बॅटरी आहे, जी 15W फास्ट चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. डिव्हाइस IP68 डस्ट आणि वॉटर रेजिस्टेंट रेटिंगसह येते. 4G वेरिएंट प्रमाणेच, Galaxy S20 FE मध्ये मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. त्यामध्ये 12-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 8-मेगापिक्सेल टेलीफोटो लेन्ससह 12-मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर आहे. तसंच सेल्फीसाठी 32 मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात आला आहे.
iQOO 9 5G -
iQOO 9 5G या फोनच्या 8GB + 128GB वेरिएंटची किंमत 42,990 रुपये आहे, तर 12GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 46,990 रुपये आहे. फोनमध्ये 120Hz चा स्क्रीन रिफ्रेश रेट, 300Hz टच सॅम्पलिंग रेट आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह 6.56-इंची FHD+ 10-बिट AMOLED डिस्प्ले आहे. हा फोन Qualcomm Snapdragon 888 चिपसेटसह 12GB LPDDR5 RAM आणि 256GB UFS 3.1 स्टोरेजसह येतो.
फोनमध्ये 4350mAh बॅटरी आहे, जी 120W Flash Charge होते. हा Funtouch OS 12 चालवतो. फोटोग्राफीसाठी, यामध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये सोनी IMX 598 सेन्सरसह 48 मेगापिक्सलचा जिम्बल कॅमेरा, 120-डिग्री फील्ड ऑफ व्ह्यूसह 13-मेगापिक्सेल वाइड-अँगल लेन्स आणि 13-मेगापिक्सेल 50mm पोर्ट्रेट लेन्स 2x ऑप्टिकल झूमसोबत उपलब्ध आहे. सेल्फीसाठी, यात 16-मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. हा फोन iQoo 9 लीजेंड आणि अल्फा कलर वेरियंटमध्ये येतो.
OnePlus 9RT 5G
या फोनची भारतातील किंमत 42,999 रुपये आहे. फोन 1080×2400 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.62-इंची फ्लुइड AMOLED डिस्प्ले, 120Hz चा स्क्रीन रिफ्रेश रेट आणि 20:9 च्या आस्पेक्ट रेशो आहे. हा फोन कॉर्निंग गोरिल्ला ग्लाससह येतो. यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 चिपसेट असून फोन 12GB पर्यंत रॅम आणि 256GB स्टोरेजमध्ये उपलब्ध आहे. हा फोन Android 11 वर आधारित Oxygen OS वर चालतो.
फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये सोनी IMX766 सेन्सर आणि इलेक्ट्रॉनिक इमेज स्टॅबिलायझेशन फिचरसह 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, 16 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल सेन्सर आणि 2 मेगापिक्सेल मॅक्रो लेन्स आणि ड्युअल एलईडी फ्लॅश यांचा समावेश आहे. सेल्फीसाठी सोनी IMX471 सेन्सरसह 16-मेगापिक्सेल कॅमेरा आहे. फोनमध्ये 4500mAh बॅटरी असून ती वार्प चार्ज 65T ला सपोर्ट करते. OnePlus 9RT नॅनो सिल्व्हर आणि हॅकर ब्लॅक कलर वेरियंटमध्ये येतो.
Xiaomi 11T Pro
Xiaomi 11T Pro हा स्मार्टफोन भारतात 43,999 या किमतीत उपलब्ध आहे. यामध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.67-इंची फ्लॅट 10bit AMOLED ट्रू-कलर डिस्प्ले मिळतो. तो पॅनेल इन-हाऊस अॅडाप्टिव्ह सिंकला सपोर्ट करतो, जे फोनवर प्ले होत असलेल्या कंटेटच्या आधारावर रिफ्रेश रेट Adjust करतो. फोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस कोटिंग आहे. हा फोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन 888 चिपसेटवर काम करतो.
फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 108-मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर, f/2.2 अपर्चरसह 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि f/2.4 अपर्चरसह टेलीमॅक्रो लेन्स आहे. तिन्ही 8K व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सक्षम आहेत आणि त्यांना "एंड-टू-एंड" HDR10+ सपोर्ट आहे. हा फोन 5000mAh बॅटरीसह येतो आणि तो 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. शिवाय कंपनीने नवीन Xiaomi 11T सीरिजवर तीन Android सिस्टम अपग्रेडसह चार वर्षांपर्यंत सिक्युरीटी पॅच ऑफर करण्याचं सांगितलं आहे. फोन साइड-माउंट फिंगरप्रिंट सेन्सरसह येतो. Mi 11T Pro मध्ये Harman Kardon द्वारे ट्यून केलेले ड्युअल स्टीरिओ स्पीकर असून यात डॉल्बी अॅटमॉस आणि डॉल्बी व्हिजनसाठी सपोर्टदेखील आहे.
Apple iPhone 11
Apple iPhone 11 हा फोन सध्या अमेझॉनवर 49,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. हा फोन 2019 मध्ये लाँच करण्यात आला होता. iPhone 11 मध्ये 6.1-इंची ऑल-स्क्रीन लिक्विड रेटिना डिस्प्ले, 12-मेगापिक्सेल वाइड-एंगल लेन्स आणि 12-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड लेन्सचा समावेश असलेला ड्युअल-कॅमेरा सेटअप आहे. सेल्फीसाठी 12 मेगापिक्सेल कॅमेरा देखील आहे. हे Apple च्या सिनेमॅटिक व्हिडीओ स्टेबलायझेशनसह 4K 60fps व्हिडीओ रेकॉर्ड करण्यास देखील सक्षम आहे.
तर, iPhone SE आवडला नसेल तर त्याला पर्याय म्हणून तुम्ही या पाच फोनपैकी एक विकत घेऊ शकता. iPhone SE पेक्षा चांगले फिचर्स आणि डिझाईनमध्ये हे फोन उपलब्ध आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Iphone, Oneplus, Samsung galaxy, Smartphone, Tech news