नवी दिल्ली, 17 मे : हायवेवर प्रवास करताना टोल प्लाझावर लांब रांगांपासून वाचण्यासाठी सरकारने इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन सिस्टम अर्थात FASTag लागू केला. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचण्यासह टोल भरण्यासाठीची पद्धतही सोपी झाली. FASTag आपल्या मोबाइलवरुनच रिचार्ज करता येतो. पण कधी FASTag रिचार्ज करताना एखादी चूक मोठी नुकसान करू शकते. त्यामुळे काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
Paytm, PhonePe किंवा कोणत्याही इतर पेमेंट App वरुन FASTag रिचार्ज करण्यापूर्वी तुमच्या गाडीचा नंबर टाकावा लागेल. जर तुम्ही चुकून दुसरा एखादा नंबर टाकला तर अकाउंटमधून पैसे तर कट होतील पण रिचार्जदेखील होणार नाही.
फास्टॅग रिचार्ज करण्याआधी तुमचा फास्टॅग एखाद्या बँक अकाउंटशी लिंक असणं गरजेचं आहे. रिचार्ज करण्याआधी युजरला बँक डिटेल्स टाकावे लागतात. चुकीचे डिटेल्स भरल्यास रिचार्ज कॅन्सल होतो आणि अकाउंटमधून पैसे कट केले जातात. जर तुम्ही तुमची जुनी गाडी एखाद्याला विकली असेल तर त्याचा फास्टॅग डिअॅक्टिव्हेट करा. जर असं केलं नाही, तर गाडी तुमची नसूनही टोल प्लाझावर तुमच्या अकाउंटमधून पैसे कट होत राहतील.
जर FASTag रिचार्ज करण्यासाठी कोणतीही समस्या येत असेल, एक्स्ट्रा पैसे कट होत असतील, तर NHAI च्या 1033 या हेल्पलाइन नंबरवर कॉल करू शकता. ही हेल्पलाइन FASTAg संबंधित समस्या सोडवण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.
तसंच वेळोवेळी तुमच्या FASTag चा बॅलेन्स चेक करा. ज्यावेळी फास्टॅगमध्ये कमी पैसे असतील त्यावेळी लगेच रिचार्ज करणं फायद्याचं ठरेल. जर फास्टॅगमध्ये रिचार्ज नसेल, तर टोल प्लाझावरुन जाताना तुम्हाला दुप्पट पैसे भरावे लागू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.