मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

तुम्हीही डाउनलोड केलं का GB WhatsApp? लगेच करा डिलीट, अन्यथा बसेल मोठा फटका

तुम्हीही डाउनलोड केलं का GB WhatsApp? लगेच करा डिलीट, अन्यथा बसेल मोठा फटका

यासाठी सर्वात आधी फोनच्या ब्राउजरमध्ये http://wa.me/xxxxxxxxxx किंवा http://api.whatsapp.com/send?phone=xxxxxxxxxx टाईप करा. इथे xxxxxxxxxx च्या जागी त्या व्यक्तीचा नंबर टाईप लागेल, ज्याला मेसेज करायचा आहे.

यासाठी सर्वात आधी फोनच्या ब्राउजरमध्ये http://wa.me/xxxxxxxxxx किंवा http://api.whatsapp.com/send?phone=xxxxxxxxxx टाईप करा. इथे xxxxxxxxxx च्या जागी त्या व्यक्तीचा नंबर टाईप लागेल, ज्याला मेसेज करायचा आहे.

व्हॉट्सअ‍ॅपच्या नावाशी साधर्म्य असलेलं GB WhatsApp नावाचं एक अ‍ॅप उपलब्ध आहे. नावामुळे हे अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपचाच एखादा प्रकार असल्याचं वाटतं, मात्र ते वापरल्यास युजरचं (User) मोठं नुकसान होऊ शकतं.

नवी दिल्ली, 29 जून: व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) बहुतेकांच्या रोजच्या जगण्याचा भाग झालेला आहे. ऑफिसपासून ते मित्रांशी टाइमपासच्या गप्पांपर्यंत, मुलांच्या शाळेतल्या अभ्यासापासून ते अनेक बातम्यांचे अपडेट्स देण्यापर्यंत वेगवेगळ्या उद्देशाने व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्स वापरले जातात. अनेक विविध कारणांसाठी व्हॉट्सअ‍ॅप वापरलं जातं असताना, त्यातून काही जणांची फसवणूक होण्याचे प्रकारही घडतात. जे लोक बारकाईने एखादी गोष्ट पाहत नाहीत, ते लोक अशा फसवणुकीला बळी पडण्याचं प्रमाण जास्त असतं.

व्हॉट्सअ‍ॅपची लोकप्रियताही या नियमाला अपवाद नाही. व्हॉट्सअ‍ॅपच्या नावाशी साधर्म्य असलेलं GB WhatsApp नावाचं एक अ‍ॅप उपलब्ध आहे. नावामुळे हे अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपचाच एखादा प्रकार असल्याचं वाटतं, मात्र ते वापरल्यास युजरचं (User) मोठं नुकसान होऊ शकतं. GB WhatsApp हे अ‍ॅप तुम्ही वापरत असला असेल, तर ते लगेच अनइन्स्टॉल (Uninstall) करा.

नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, हे अ‍ॅप युजर्सचा डेटा चोरतं. त्यामुळे या अ‍ॅपपासून सावध राहण्याची गरज आहे. हे अ‍ॅप म्हणजे एक प्रकारे WhatsApp चं क्लोन आहे. कारण ते व्हॉट्सअ‍ॅपप्रमाणेच चॅटिंग, कॉलिंग सारख्या सुविधा युजर्सना देतं. त्याशिवाय आणखीही काही सुविधा या अ‍ॅपमध्ये दिल्या जातात. त्यामुळे हे अ‍ॅप मूळ व्हॉट्सअ‍ॅपपेक्षाही खूप चांगलं असल्यासारखं अनेकांना वाटतं. तसंच, हे अ‍ॅप वापरणाऱ्यांना व्हॉट्सअ‍ॅपचाच हा एखादा प्रकार असल्याचं वाटतं. त्यामुळे त्यांना हा फसवणुकीचा प्रकार असल्याची शंकाही येत नाही.

वाचा - कोणालाही कळणार नाही काय सर्च केलं; Google Search History साठी असा ठेवा पासवर्ड

हे अ‍ॅप युजर्सची माहिती चोरतं. त्या माहितीचा गैरवापर होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. हे अ‍ॅप वापरणाऱ्यांचं ओरिजिनल व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट ब्लॉक केलं जाण्याचा धोका आहे. त्यामुळे GB WhatsApp वापरू नये. मुख्य म्हणजे हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवर (Google Play Store) उपलब्ध नाही. एपीके फाइल (APK file) डाउनलोड करून हे अ‍ॅप इन्स्टॉल करावं लागतं. तुम्हाला कोणाकडून या अ‍ॅपची एपीके फाइल (Apk File) मिळाली किंवा हे अ‍ॅप मूळ व्हॉट्सअ‍ॅपपेक्षा चांगलं असल्यामुळे त्याची एपीके फाइल डाउनलोड करण्याचा सल्ला कोणी दिला, तर तो ऐकू नका.

(वाचा - Smartphone मधून ही कामं करता? या गोष्टींपासून सतर्क राहा; अन्यथा फ्रॉडचा धोका)

केवळ हेच नव्हे, तर कोणतंही अ‍ॅप, गुगल प्ले स्टोअर किंवा अधिकृत अ‍ॅप स्टोअरमधूनच डाउनलोड करावं. कारण त्या अ‍ॅप स्टोअरमध्ये जी अ‍ॅप्स उपलब्ध असतात, त्यांपासून धोका नसल्याची खात्री केल्यावरच ती अ‍ॅप्स तिथे प्रसिद्ध केलेली असतात.

First published:

Tags: Tech news, Technics, Technology, Whatsapp, Whatsapp alert