Home /News /technology /

Facebook लॉगिन करताच बँक अकाऊंट होणार रिकामं! तुम्ही तर करत नाही ना 'ही' चूक

Facebook लॉगिन करताच बँक अकाऊंट होणार रिकामं! तुम्ही तर करत नाही ना 'ही' चूक

जगभरातील फेसबुक अकाऊंट्स (Facebook Accounts) सध्या धोक्यात आहेत. फेसबुक युझर्सला लक्ष्य करण्यासाठी हॅकर्सनी विशेष पद्धत तयार केलीय.

    मुंबई, 26 जून : जगभरातील फेसबुक अकाऊंट्स (Facebook Accounts) सध्या धोक्यात आहेत. फेसबुक युझर्सला लक्ष्य करण्यासाठी हॅकर्सनी विशेष पद्धत  तयार केलीय. जगभरातील 50 लाखांपेक्षा जास्त युझर्सना टार्गेट करण्यात आले आहे. विशेषत: मोबाईलमधून फेसबुक मेसेंजर वापरणाऱ्यांना यामध्ये टार्गेट करण्यात येत आहे. अँटी फिशिंग ब्राऊझर एक्सटेन्शन PIXM च्या निक एस्कोली यांनी या हल्ल्याचा खुलासा केला आहे. अनेक वेबसाईट या फेसबुक लॉगिन पेजसारख्या आहेत. त्यामध्ये युझर्स फेसबुक समजून आपली सर्व माहिती भरतात, असे त्यांच्या संशोधन टीमला आढळले आहे. या वेबसाईटच्या लिंकचा मेसेंजरच्या माध्यमातून वेगानं प्रसार होत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. विशेष म्हणजे हा प्रकार गेल्या वर्षभरापासून सुरू असून आत्ता तो उघडकीस आला आहे. हॅकर्सची मोठी कमाई या माध्यामातून हॅकर्स मोठी कमाई करत असल्याचं या रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आलंय. एखाद्या युझर त्याची फेसबुकची माहिती नकली वेबसाईटवर भरली तर त्यांना एका जाहिरातीच्या पेजशी जोडले जाते. त्यानंतर हॅकर्स या नकली लॉगिन पेजवरील एका युझर्सच्या माध्यमातून महिना शेकडो डॉलर्स कमाऊ शकतात. Smartwatch ने FASTag स्कॅन करून होऊ शकते चोरी? VIRAL VIDEO मधील दावा किती खरा? 'या' पद्धतीनं वाचवा तुमचं अकाऊंट -कोणत्याही संशयास्पद ऑनलाईन मेसेजवरील लिंकवर अथवा अटॅचमेंटवर क्लिक करू नका -एखादा मेसेज किंवा वेबसाईट तुम्हाला विश्वासर्ह वाटली नाही तर कृपया वेळीच सावध व्हा. त्यावरील सुचनांप्रमाणे व्यवहार करणे टाळा -कोणत्याही अनोळखी वेबसाईटवर फेसबुक लॉगिन करू नका -तुम्हाला या पद्धतीचा नकली वेबसाईट आढळली तर तातडीनं त्याची माहिती सायबर क्राईम सेलला द्या.
    Published by:Onkar Danke
    First published:

    Tags: Cyber crime, Facebook

    पुढील बातम्या