मुंबई, 25 जून : सोशल मीडियावर सध्या फास्टॅगचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. ज्यात स्मार्टवॉचचा वापर करून फास्टॅगवरून चोरी होत असल्याचा दावा केला जातो आहे. देशात गाड्यांवर फास्टॅग बंधनकार करण्यात आलेला असल्याने या व्हिडीओमुळे वाहनचालकांची चिंता वाढली आहे. फास्टॅगच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे (FASTag scam with smartwatch).
टोल प्लाझावर टोल कलेक्शन सोपं आणि सुरक्षित बनवण्यासाठी तसंच टोलनाक्यावर लागणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा आणि ट्रॅफिक टाळण्यासाठी गाड्यांवर फास्टॅग लावणं देशात बंधनकारक करण्यात आलं. हा एक स्टिकर आहे, ज्यावर एक कोड असतो. हा स्टिकर बँक अकाऊंट किंवा ई-वॉलेटला जोडलेला असतो. जो स्कॅन करून तुमचा टोल घेतला जातो. पण हाच फास्टॅग स्मार्टवॉचनने स्कॅन करून चोरी केली जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
हे वाचा - Shocking! आकाशातून थेट जमिनीवरील कारवर कोसळलं विमान; भयंकर अपघाताचा VIDEO VIRAL
व्हिडीओत पाहू शकता एक मुलगा कारची काच साफ स्वच्छ करताना दिसत आहे. त्याच्या हातात एक स्मार्टवॉच दिसत आहे. काच साफ करता करता तो हे वॉच फास्टटॅगवर टेकवतो आणि त्यानंतर आपल्या कामाचे पैसे न घेताच तिथून पळू लागतो. कारचालक त्याला हाक मारून मागे बोलवतो. तुझ्या कामाचे पैसे घेणार नाही का? असं विचारतो. मुलाच्या चेहऱ्यावर थोडी भीतीही दिसते आहे.
Please be careful with your vehicle! This can happen anywhere anytime! Hope @FASTag_NETC will address this asap. #SCAMALERT #FASTTAG #FASTTAGSCAM pic.twitter.com/4WZdzbBAHf
— Isha Arora (@ishaarorafly) June 25, 2022
त्यानंतर कारचालक त्याला त्याच्या हातातील स्मार्टवॉचबाबत विचारतो, तेव्हा तो मुलगा तिथून भीतीने तिथून पळून जातो.
हे वाचा - 10 महिन्यांनी सापडला नदीत पडलेला आयफोन; फोनची अवस्था पाहून सर्वच थक्क
कारचालकाने हा एक स्कॅम असल्याचा म्हटलं आहे. असं स्मार्टवॉचने फास्टटॅग स्कॅन करून पैशांची चोरी केली जात असल्याचा दावा त्याने केला आहे. हे नेमकं कसं केलं जातं हेसुद्धा त्याने सांगितलं आहे. आपल्यासोबत हे पहिल्यांदा नाही, याआधीही घडलं असल्याचं तो म्हणाला.
असं खरंच होऊ शकतं का? याबाबत फास्टटॅगने ट्वीट केलं आहे. फास्टॅगवर कोणतंही अनधिकृत डिव्हाइस ट्रान्झॅक्शन करू शकत नाही. असं म्हटलं आहे.
Hi, NETC FASTag transaction can only be initiated by the registered merchants (Toll & Parking Plaza operators) which are onboarded by NPCI only from the respective geo-locations. No unauthorized device can initiate any financial transactions on NETC FASTag. It is absolutely safe.
— FASTag NETC (@FASTag_NETC) June 24, 2022
याचा वापर फक्त रजिस्टर्ड मर्चेंट्स म्हणजे टोल आणि पार्किंग प्लाझा ऑपरेटरच करू शकता. त्यामुळे हे पूर्ण सुरक्षित असतं. याशिवाय पेटीएमनेही ट्विट करत अॅप सुरक्षित असल्याचं म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Fastag, Viral, Viral videos