मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Phone Charging करतानाही खबरदारी घेणं महत्त्वाचं, वाचा काय आहे कारण आणि वापरा या टिप्स

Phone Charging करतानाही खबरदारी घेणं महत्त्वाचं, वाचा काय आहे कारण आणि वापरा या टिप्स

तुम्हाला तुमचा स्मार्टफोन चार्ज (How to Charge your smartphone) करण्याची योग्य पद्धत माहीत आहे का? आज आम्ही तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्या तुम्ही तुमचा फोन चार्ज करताना (Smartphone Charging Tips) लक्षात ठेवल्या पाहिजेत.

तुम्हाला तुमचा स्मार्टफोन चार्ज (How to Charge your smartphone) करण्याची योग्य पद्धत माहीत आहे का? आज आम्ही तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्या तुम्ही तुमचा फोन चार्ज करताना (Smartphone Charging Tips) लक्षात ठेवल्या पाहिजेत.

तुम्हाला तुमचा स्मार्टफोन चार्ज (How to Charge your smartphone) करण्याची योग्य पद्धत माहीत आहे का? आज आम्ही तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्या तुम्ही तुमचा फोन चार्ज करताना (Smartphone Charging Tips) लक्षात ठेवल्या पाहिजेत.

पुढे वाचा ...

    मुंबई, 26 जानेवारी: आजच्या काळात स्मार्टफोन (Smartphone) प्रत्येकाची गरज बनली आहे. लहानांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत प्रत्येकाच्याच हातात स्मार्टफोन दिसतो. क्वचितच अशा व्यक्ती असतील, की ज्या स्मार्टफोन वापरत नाहीत. आपली सर्व कामं आपल्या स्मार्टफोनवर होत असल्याने, आपल्या फोनची बॅटरी चांगली असणं खूप महत्त्वाचं आहे. यासाठी काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर त्यासोबत अनेक अ‍ॅक्सेसरीज येतात. यातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे फोनचा चार्जर. चार्जरशिवाय फोन जास्त काळ वापरता येत नाही; पण तुम्हाला तुमचा स्मार्टफोन चार्ज (How to Charge your smartphone) करण्याची योग्य पद्धत माहीत आहे का? आज आम्ही तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्या तुम्ही तुमचा फोन चार्ज करताना (Smartphone Charging Tips) लक्षात ठेवल्या पाहिजेत.

    अनेकांना स्मार्टफोनची बॅटरी पूर्णपणे उतरल्यावर तो चार्ज करण्याची सवय असते; पण असं न करता बॅटरी कमी टक्क्यांवर आली की फोन चार्ज करावा. फोनमध्ये दिलेली लिथियम-आयन बॅटरी शून्यावर पोहोचू देऊ नये. त्यामुळे फोन चार्ज करण्यासाठी डिस्चार्ज होण्याची वाट पाहू नका.

    हे वाचा-Work From Home साठी पुरत नाही आहे मोबाइल इंटरनेट? या टिप्स फॉलो करुन वाचवा डेटा

    अनेक जण रात्रभर फोन चार्जिंगला लावून ठेवतात. फोन आवश्यकतेपेक्षा जास्त काळ चार्जिंगला लावून ठेवणंदेखील चुकीचं आहे. त्यामुळे फोन रात्रभर चार्जिंगला ठेवू नये. सध्याच्या काळात नवनवीन फीचर्स स्मार्टफोनमध्ये आले आहेत. बॅटरी पूर्ण चार्ज झाल्यावर फोन चार्ज होण्याची प्रक्रिया थांबते. त्यामुळे अगदी लेटेस्ट फोन्स असतील, तर जास्त वेळ चार्जिंगला जास्त वेळ लावले तरी फरक पडत नाही. अनेकदा प्रवास करताना फोनचं चार्जिंग संपल्यानंतर आपण रेल्वे स्टेशन, विमानतळ किंवा इतर कोणत्याही ठिकाणी चार्ज करण्यासाठी सार्वजनिक चार्जिंग पोर्ट वापर करतो; पण असं करणं धोकादायक ठरू शकतं. सार्वजनिक चार्जिंग पोर्टवरून हॅकर्स तुमचा डेटा प्राप्त करू शकतात. त्यामुळे सार्वजनिक चार्जिंग पोर्ट वापरणं टाळावं.

    हे वाचा-TRICK: Instagram अकाउंटवरुन कशाप्रकारे लॉग इन करता येईल Facebook?

    फोन चार्जिंगला लावलेला असताना त्याचा वापर करू नये. त्यामुळे फोन लवकर चार्ज होतो. संगणकाचा वापर झाल्यानंतर तुम्ही तो बंद करता, अगदी त्याचप्रमाणे मोबाइलमध्ये एखादं अॅप वापरून झाल्यानतंर ते बंद करा. नाहीतर ती अॅप्स बॅकग्राउंडमध्ये चालू राहतात आणि फोनची बॅटरी संपते. आपण फोन चार्ज करताना काही चुका हमखास करतो. या चुका टाळल्या तर फोनची बॅटरी दीर्घ काळ टिकायला नक्कीच मदत होते. स्मार्टफोन चार्जिंग करताना छोट्या-छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्याचा मोठा फायदा होतो.

    First published:

    Tags: Smartphone