Appleचा सर्वात स्वस्त iPhone SE 2020 लॉन्च, वाचा काय आहे किंमत आणि फीचर्स

iPhone SE 2020 स्मार्टफोनच खास वैशिष्ट्य म्हणजे हा वॉटर प्रूफ आहे.

iPhone SE 2020 स्मार्टफोनच खास वैशिष्ट्य म्हणजे हा वॉटर प्रूफ आहे.

  • Share this:
    अमेरिकन कंपनी Apple ने एक नवा iPhone लॉन्च केला आहे. विशेष म्हणजे सर्वात स्वस्त iPhone SEचे अपडेट व्हर्जन आहे. म्हणून या स्मार्टफोनला iPhone SE 2020 असे संबोधले जात आहे. Appleने हा स्मार्टफोन तीन कलर व्हेरिएंटमध्ये बाजारात उतरवला आहे. अमेरिकेत या स्मार्टफोनसाठी प्री ऑर्डर्स सुरु करण्यात आली आहे. iPhone SE 2020 सोबत कंपनीने पुन्हा एकदा टच आयडी फीचर परत आणले आहे. छोटी स्क्रीन, वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट आणि टच आयडीसारखे फीचर्स देऊन मिड रेंज सेग्मेंटमध्ये आपलं स्थान आणखी मजबूत करण्याचा Apple प्रयत्न आहे. iPhone SE 2020 मध्ये काय आहे खास? डिस्प्ले: > iPhohe SE 2020 मध्ये 4.7 इंचाचा रेटिना LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनीने हाच डिस्प्ले iPhone 11 मध्येही दिला आह . या स्मार्टफोनमध्ये Apple A13 Bionic प्रोसेसर आहे. iPhone 11 मध्येही हेच प्रोसेसर आहे. या फोनमध्ये 12 मेगापिक्सलचा सिंगल रियर कॅमेरा आहे. मात्र, यात फेस आयडी सपोर्ट देण्यात आलेला आहे. डिझाइन: >iPhone SE 2020 च्या बॉडीबाबत सांगायचं झाल्यास या एअरोस्पेस ग्रेड एल्यूमिनियम आणि ड्यूरेबल ग्लासचा वापर करण्यात आला आहे. फ्रंट आणि बॅक पॅनलमध्येही हेच मेटेरियल वापरण्यात आलं आहे. बॅक पॅनलवर देण्यात आलेला Apple लोगो सात लेयरच्या कलर प्रोसेसने बनवण्यात आला आहे. कॅमेरा: > iPhone SE 2020 मध्ये 12 मेगापिक्सलचा सिंगल रियर कॅमेरा आहे. याचे अपर्चर f/1.8 आहे. A13 Bionic चिपसेटसोबत असलेला कॅमेरा अनेक कॉप्युटेशनल फोटॉग्राफीला अनलॉक करतो असा दावा कंपनीने केला आहे. कॅमेऱ्यात पोर्ट्रेट मोडचं ऑप्शन देण्यात आलं आहे. आता मात्र सर्वच कंपन्या हे फीचर देतात. मात्र, Appleने यात सहा प्रकारचे पोर्टेट लायटिंग इफेक्ट्स दिले आहेत. कॅमऱ्याच्या डेप्थ कंट्रोलसाठी मशीन लर्निंगचा वापर करण्यात आला आहे. या 4K व्हिडीओ रेकॉर्ड करता येतो. त्यात 30fps सपोर्ट देखील देण्यात आला आहे. A13 Bionic चिपसेट A13 Bionic चिपसेटमध्ये मशीन लर्निंगवर अधिक फोकस करण्यात आलं आहे. यात डेडिकेटेड 8 कोअर न्यूरल इंजीन आहे. त्यात एका सेकंदात 5 ट्रिलियलन टास्क परफॉर्म करण्याची क्षमता आहे. वॉटर अॅण्ड डस्ट प्रूफ या स्मार्टफोनच वैशिष्ट्य म्हणजे हा वॉटर प्रूफ आहे. यात IP67 रेटिंग आहे. कंपनीने दावा केला आहे की, 1 मीटर खोल पाण्यात 30 मिनिटे ठेऊ शकतात. तसेच हा फोन डस्ट रेजिस्टेंट आहे. iPhone SE 2020 वायरलेस चार्जिंग सपोर्ट करतो. रेड, ब्लॅक आणि व्हाइट या तीन कलर व्हेरिएंट्समध्ये कंपनीने हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. किंमत भारतीय बाजारात iPhone SE 2020ची किंमत 42,500 रुपये असेल. हा फोन दोन व्हेरिएंटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल. बेसिक व्हेरिएंटमध्ये 64GB तर अपग्रेड व्हेरिएंटमध्ये 256GB स्टोरेज देण्यात आले आले आहे. वायरलेस आणि फास्ट चार्जिंग Apple नुसार, यात Qiसर्टिफाइड वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट आहे. फास्ट चार्जिंगलाही हा फोन सपोर्ट करतो. 30 मिनिटांत हा स्मार्टफोन 50 टक्क्यांपर्यंत चार्ज करु शकतात. ड्युअल सिम आणि WiFi 6 कनेक्टिव्हिटीसाठी या स्मार्टफोनमध्ये ड्युअल सिम सपोर्ट आहे. यात एक ई-सिम असेल. दुसरे फिजिकल सिम टाकू शकतात. स्मार्टफोनला Gigabit-Class LTEसह WiFi 6 चा सपोर्ट देण्यात आला आहे.
    First published: