Coronavirus पासून वाचण्यासाठी एकच सुरक्षित जागा, NASA ने दिली माहिती

Coronavirus पासून वाचण्यासाठी एकच सुरक्षित जागा, NASA ने दिली माहिती

कोरोना व्हायरसमुळे जगभरात दहशत निर्माण झाली आहे. सर्वच देशांनी कोरोनाची धास्ती घेतली असल्याचं दिसत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 22 मार्च : सध्या जगात कोरोनामुळे लॉकडाउनची स्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा हाहाकार माजला असून अनेक देशांत भीतीचं वातावरण आहे. आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान, अमेरिकन अंतराळ संस्था नासानं एक अशी जागा सांगितलं आहे जिथं राहणारे लोक आजारी पडत नाहीत. त्यासाठी एक खास तंत्रज्ञान कारणीभूत आहे. नासाने सांगितलेल्या या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना गंभीर आजार झाल्याची कोणतीच माहिती नाही. आतापर्यंत फक्त एकदा 52 वर्षांपूर्वी एका व्यक्तीला ताप आला होता.

जगातील 164 देशांमधील 2 लाख लोक कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. आतापर्यंत 11 हजारपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. अशा या धोकादायक असेललेल्या कोरोना व्हायरससह इतर अनेक आजारांपासून सुरक्षित ठेवणारं ठिाकाण नासाने सांगितलं आहे. नासाने सांगितलेल्या त्या जागेचं नाव आहे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक.

नासाने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक कशा पद्धतीने आजारांना दूर ठेवतं ते सांगितलं आहे. आजारांशी लढण्यासाठी नासा एक खास अशी हेल्थ स्टेबलायझेशन सिस्टीम वापरते. या तंत्रज्ञानाच्या मदतीनं स्पेस स्टेशनमध्ये राहणाऱ्या अंतराळवीरांच्या आरोग्यावर देखरेख केली जाते.

अंतराळ स्थानक हे पृथ्वीच्या खालच्या कक्षेत फिरत असते. या ठिकाणी अंतराळात जाणारे अंतराळवीर काही काळ थांबतात. इथंच अनेक महत्वाचे शोध आणि प्रयोग हाताळले जातात. पृथ्वीच्या चहुबाजूंनी फिरणाऱ्या एका सॅटेलाइटप्रमाणे हे स्थानक आहे.

1968 मध्ये लाँच करण्यात आलेल्या अपोलो 7 मिशनवेळी अंतराळवीर वॅली शीराला या अंतराळ स्थानकात राहिल्यानंतर ताप आला होता. शीरासोबत डॉन एफ. इसल आणि वॉल्टर कनिंघम हेसुद्धा होते. दरम्यान, आता मे महिन्यात स्पेस एक्स कंपनीच्या रॉकेटमधून काही अंतराळवीरांना स्पेश स्टेशनवर पाठवण्यात येणार आहे. त्याआधी 10 दिवस त्यांना देखरेखीखाली ठेवण्यात येईल. त्यांच्या आरोग्याची तपासणी केली जाईल.

First published: March 22, 2020, 5:44 PM IST

ताज्या बातम्या