WhatsApp वरूनसुद्धा कोरोना लशीसाठी नोंदणी करता येते? काय आहे व्हायरल मेसेजमागील सत्य

WhatsApp वरूनसुद्धा कोरोना लशीसाठी नोंदणी करता येते? काय आहे व्हायरल मेसेजमागील सत्य

तुम्हालासुद्धा असा मेसेज आला आहे का? आणि खरंच व्हॉट्सअपच्या (corona vaccine registration via whatsapp) माध्यमातून कोरोना लसीकरणासाठी नोंदणी करता येते का?

  • Share this:

मुंबई, 14 एप्रिल: कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने देशात लसीकरणाच्या  (COVID-19 vaccination)  मोहिमेने वेग धरला आहे.लसीकरणासाठी पात्र असणाऱ्या व्यक्तीला को-विन (Co-WIN) पोर्टल किंवा आरोग्य सेतू अ‌ॅपच्या (Aarogya Setu App) मदतीने नोंदणी करण्यास सांगितलं जातं आहे. पण सध्या व्हॉट्सअ‍ॅपच्या (WhatsApp) माध्यमातूनही कोरोना लशीसाठी रजिस्ट्रेशन करता येतं (Corona vaccine registration via whatsapp), असे मेसेज फिरत आहेत. तुम्हालासुद्धा असा मेसेज आला आहे का? आणि खरंच व्हॉट्सअपच्या माध्यमातून कोरोना लसीकरणासाठी नोंदणी करता येते का?

व्हॉट्सअ‍ॅपवरून येणाऱ्या मेसेजमध्ये म्हटल्यानुसार कोरोना लस घेण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपद्वारे  नोंदणी करता येते. हे अगदी चॅटिंग करण्यासारखं सोपं आहे. नोंदणी करायची असल्यास 9745697456 या नंबरवर Hi असा मेसेज टाका आणि जसं आम्ही सांगतो तसं करा. या नंबरवरून लोकांकडून सुरुवातीला आधार कार्डच्या डिटेल्स मागितले जातात. तसंच तुमच्या पिन कोड नंबरच्या मदतीने रुग्णालय शोधायचं आहे,असं सांगितले जातं. त्यामुळे लोक सहजपणे या मेसेजवर विश्वास ठेवतात.

पण हा मेसेज खोटा असून अनेक लोक याला बळी पडले आहेत. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार को-विन आणि आरोग्य सेतू या दोन पर्यायांशिवाय इतर कोणत्याही ठिकाणी लसीकरणासाठी नोंदणी करता येऊ शकत नाही.

हे वाचा - अनोख्या मायक्रोचिपचा शोध, रक्तातून फिल्टर करुन बाहेर काढणार कोरोना विषाणू

व्हॉट्सअ‍ॅपवर फिरणाऱ्या या मेसेजमधील दावा खोटा असल्याचे प्रेस इन्फर्मेशन ब्युरोने (Press Information Bureau )सांगितले असून, भारत सरकारने या व्हॉट्सअ‍ॅप फॉरवर्ड मेसेजच्या बाबतीत जनतेला सतर्क केलं आहे. पीआयबीने जारी केलेल्या एका पत्रकात म्हटले आहे,की कोरोना लसीकरणाची नोंदणी केवळ को-विन पोर्टल आणि आरोग्य सेतू अ‍ॅपद्वारेच करता येईल. कोणीही व्हॉट्सअ‍ॅपवरून तुम्हाला लसीकरणाच्या नोंदणीबद्दल सांगत असेल तर अशा लोकांपासून सावध रहा,ते  तुम्हाला फसवू शकतात, असा सल्लादेखील पीआयबीने दिलाआहे.

हे वाचा - नियम धाब्यावर, परवानगी नसताना कोविड रुग्ण दाखल, बीएएमस डॉक्टरांकडून उपचार

नागरिकांना को-विन पोर्टलच्या माध्यमातून लसीकरणासाठी नोंदणी करण्यास केंद्र सरकारने सांगितलं आहे. या पोर्टलवर आरोग्य सेतूच्या माध्यमातूनही जाता येतं. सरकार सध्या 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व नागरिकांना लस उपलब्ध करून देत आहे. पहिल्या टप्प्यात डॉक्टर्स,आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्स. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात 60 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील आणि 45 वर्षांपेक्षा जास्त मात्र गंभीर आजार असणाऱ्या लोकांना कोरोनाची लस देण्यात आली. तर आता 45 वर्षांपेक्षा जास्त सर्वांना कोरोना लस दिली जात आहे.

First published: April 14, 2021, 8:03 AM IST

ताज्या बातम्या