अनोख्या मायक्रोचिपचा शोध, रक्तातून फिल्टर करुन बाहेर काढणार कोरोना विषाणू

अनोख्या मायक्रोचिपचा शोध, रक्तातून फिल्टर करुन बाहेर काढणार कोरोना विषाणू

अमेरिकेचं संरक्षण विभाग पेंटागॉनच्या (Pentagon) शास्त्रज्ञांनी एका अनोख्या मायक्रोचिपची (Microchip) निर्मिती केली आहे. या तंत्रज्ञानाच्या निर्मितीमुळे रुग्णाच्या शरिरातील कोरोना विषाणूला शोधणं अधिक सोपं होणार आहे.

  • Share this:

वॉशिंग्टन, 13 एप्रिल: सध्या भारत आणि अमेरिकेसह जगातील अनेक देश कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनशी (corona virus new strain) लढत आहेत. जगातून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी जगभरात वैज्ञानिकांची फौज दिवस रात्र कार्यरत आहे. अशातच कोरोनाशी झगडणाऱ्या देशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. अमेरिकेचं संरक्षण विभाग पेंटागॉनच्या (Pentagon) शास्त्रज्ञांनी एका अनोख्या मायक्रोचिपची (Microchip) निर्मिती केली आहे. या तंत्रज्ञानाच्या निर्मितीमुळे रुग्णाच्या शरिरातील कोरोना विषाणूला शोधणं अधिक सोपं होणार आहे. या मायक्रोचिपच्या साह्याने कोरोना विषाणूची लागण झाली आहे की नाही? याची माहिती त्वरित उपलब्ध होणार आहे.

त्याचबरोबर या मायक्रोचिपच्या साह्याने रक्ताचं शुद्धीकरण करून रक्तातील कोरोना विषाणूला शरिराच्या बाहेर काढलं जाऊ शकणार आहे. त्यामुळे कोरोना विषाणूच्या लढाईत हे तंत्रज्ञान संजीवनी ठरणार आहे. न्युयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, हे नवीन तंत्रज्ञान डिफेन्स अॅडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट एजन्सीने (DRPA) विकसित केलं आहे. कोविड -19 विषाणूचा हा शेवट असेल असा दावाही संबंधित टीमचं नेतृत्व करणारे तज्ज्ञ आणि निवृत्त कर्नल डॉ. मॅट हेपबर्न यांनी केला आहे.

डॉ. मॅट हेपबर्न यांच्या दाव्यानुसार, 'आता आपण भविष्यातील कोणत्याही जैविक आणि रासायनिक हल्ल्यासाठी पुर्णपणे तयार आहोत. या मायक्रोचिपला शरीराच्या कोणत्याही भागात त्वचेच्या खाली लावता येऊ शकतं. ही चिप शरीरात सुरू असलेल्या प्रत्येक रासायनिक क्रियेवर बारीक नजर ठेवेल. या चिपद्वारे पाठवण्यात येणारे संकेत एखाद्या व्यक्तीला एखाद्या विषाणूचं संक्रमण कधी होईल याचीही आगाऊ माहिती दिली जाणार आहे.'

मायक्रोचिप काम कसं करणार?

डॉ. हेपबर्न यांच्या दाव्यानुसार, 'संबंधित मायक्रोचिपला एका जेलमध्ये टाकलं जाईल. या चिपचा आकार शरीरातील एखाद्या पेशीएवढा असेल. या चिपला अशाप्रकारे विकसित करण्यात आलं आहे, की ही चिप रुग्णाच्या रक्ताची तपासणी करून याचे संकेत देईल. ज्यामुळे विषाणूची लागण झाली आहे की नाही? याची माहिती अवघ्या 3 ते 5 मिनिटांच्या आत मिळेल. याशिवाय पेंटागॉनमधील एका सैन्य रुग्णावर या चिपचा प्रयोग करण्यात आल्याचा दावाही हेपबर्न यांनी केला आहे.

हे ही वाचा-भारताला मिळाली तिसरी कोरोना लस, Sputnik V च्या आपात्कालीन वापरास परवानगी

या तंत्रज्ञानाद्वारे संबंधित रुग्णाच्या शरीरातील विषाणूला पूर्णपणे नष्ट करण्यात आलं असून त्यांची प्रकृती आता ठिक आहे. त्याच बरोबर अमेरिकेच्या फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने या मायक्रोचिपला आपत्कालीन वापराची परवानगी दिली आहे.

Published by: News18 Desk
First published: April 13, 2021, 12:23 PM IST

ताज्या बातम्या