मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

मुलांना कोरोना लसीपासून ‘बचावण्यासाठी’ आईनेच केलं अपहरण, वडिलांच्या तक्रारीनंतर पोहोचली तुरुंगात

मुलांना कोरोना लसीपासून ‘बचावण्यासाठी’ आईनेच केलं अपहरण, वडिलांच्या तक्रारीनंतर पोहोचली तुरुंगात

आपल्या मुलांवर कोरोनाची लस घेण्याची वेळ येऊ नये, यासाठी त्यांच्या आईनं थेट त्यांचं अपहरण केलं. या गुन्ह्यासाठी तिला जेलची हवा खावी लागत आहे.

आपल्या मुलांवर कोरोनाची लस घेण्याची वेळ येऊ नये, यासाठी त्यांच्या आईनं थेट त्यांचं अपहरण केलं. या गुन्ह्यासाठी तिला जेलची हवा खावी लागत आहे.

आपल्या मुलांवर कोरोनाची लस घेण्याची वेळ येऊ नये, यासाठी त्यांच्या आईनं थेट त्यांचं अपहरण केलं. या गुन्ह्यासाठी तिला जेलची हवा खावी लागत आहे.

  • Published by:  desk news

माद्रिद, 11 जानेवारी: आपल्या मुलांना (Sons) कोरोनाची लस (Corona vaccine) मिळू नये, यासाठी त्यांच्या आईनेच (Mother) त्यांचं अपहरण (Kidnap) केल्याची धक्कादायक घटना स्पेनमध्ये (Spain) घडली आहे. कोरोनाची लस ही मुलांच्या आरोग्यासाठी अत्यंत हानीकारक असते, असा या महिलेचा समज होता. स्पेनमध्ये लसीच्या विरोधात भूमिका घेणाऱ्यांपैकी ती एक होती. आपल्या पहिल्या पतीकडे राहणाऱ्या मुलांना लस मिळण्याची वेळ जवळ आल्याचं जेव्हा तिला समजलं, तेव्हा तिनं मुलांचं अपहरण करून त्यांना लसीपासून बचावण्याचा निर्णय घेतला. 

काय आहे प्रकार?

स्पेनची राजधानी माद्रिदमध्ये राहणाऱ्या 46 वर्षांच्या महिलेचा तिच्या पहिल्या पतीपासून घटस्फोट झाला होता. तिची दोन्ही मुलं पतीकडे राहत होती आणि स्पेन सरकारच्या धोरणानुसार लवकरच त्यांचं लसीकरण होणार होतं. मोठा मुलगा 14 वर्षांचा आणि धाकटा मुलगा 12 वर्षांचा असल्यामुळे दोघांचंही शाळेतच लसीकरण होणार होतं. स्पेन सरकारनं 12 वर्षांवरील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात केली असून जवळपास 80 टक्क्याहून अधिक मुलांचं लसीकरणही पूर्ण झालं आहे. 

असं केलं अपहरण

या महिलेनं मुलांच्या घरी जात त्यांना सोबत येण्याची सूचना केली. त्यावेळी त्यांचे वडील घरात नव्हते. वडिलांसाठी तिने एक चिठ्ठी लिहून ठेवली आणि आपण मुलांना सोबत घेऊन जात असल्याचं लिहिलं. त्याचप्रमाणं मुलांना लसीकरणापासून वाचवण्यासाठी त्यांना शाळेतून काढून टाकणार असल्याचं सांगितलं. सुरुवातील मुलं घरात दिसत नसल्यामुळे त्यांना इतरत्र शोधण्याचा प्रयत्न त्यांच्या वडिलांनी केला. मात्र मुलं कुठंच सापडली नाहीत. त्यानंतर काही काळाने त्याल चिठ्ठी सापडली आणि नेमकं काय घडलं, याचा उलगडा झाला.

हे वाचा -

पतीची कोर्टात धाव

महिलेच्या पहिल्या पतीनं या प्रकाराविरोधात पोलिसांत धाव घेतली आणि आपल्या मुलांचं अपहरण झाल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी महिलेला ताब्यात घेऊन अपहरणाचा गुन्हा नोंदवला आणि कोर्टात दाखल केलं. कोर्टानं महिलेला सध्या पोलीस कोठडी सुनावली असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. स्पेनमध्ये कोरोना लस विरोधी मोहिम फारशी यशस्वी ठरलेली नाही. मात्र काही निवडक व्यक्तींचा कोरोना प्रतिबंधक लसीला तीव्र विरोध कायम आहे.

First published:

Tags: Corona vaccination, Kidnapping, Mother, Spain