Home /News /technology /

बॅग किंवा पँटच्या खिशात नाही तर हाताच्या मनगटावर राहणार HAND SANITIZER

बॅग किंवा पँटच्या खिशात नाही तर हाताच्या मनगटावर राहणार HAND SANITIZER

WatchOut कंपनीने हँड सॅनिटाझयर असलेला बँड तयार केला आहे.

    राका मुखर्जी/मुंबई, 10 ऑगस्ट : घराबाहेर पडताच मास्क आणि हँड सॅनिटायझर (HAND SANITIZER) आपलं कोरोनाव्हायरसपासून (CORONAVIRUS) बचाव करण्यात मदत करतात. कोणत्याही वस्तूंना हात लावल्यानंतर किंवा एखाद्या ठिकाणी स्पर्श केल्यानंतर आपण हँड सॅनिटायझर लावतो. मात्र हे हँड सॅनिटायझर एकतर आपल्या बॅगेत असतं किंवा पँटच्या खिशात. म्हणजे हात सॅनिटायझ करण्यापूर्वी बॅग आणि आपल्या कपड्यांना हातांचा स्पर्श होतोच याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? आपले हात सॅनिटायझ करण्यापूर्वी जर आपल्या हातांवर व्हायरस असेल तर आपल्या नकळत ते बॅग किंवा कपड्यांवर जाऊ शकतात. मग अशावेळी बॅग किंवा पँटच्या खिशापेक्षा आपल्या हातातच हँड सॅनिटायझर कायम असेल तर? वॉचआऊट WatchOut  या कंपनीने असं हँड सॅनिटाझयर तयार केलं आहे. वॉचआऊट कंपनीने हँड सॅनिटायझर बँड तयार केला आहे. हे एक घड्याळाप्रमाणे दिसणारं रबरी बँड आहे, ज्यामध्ये सॅनिटायझर आहे. या बँडच्या कडेला एका छोटं बटण आहे, जे एकदाच दाबता त्यातून सॅनिटाइझ स्प्रे होईल. याने तुम्ही तुमचे हात किंवा काही अंतरावरील पृष्ठभाग, वस्तूही सॅनिटाइझ करू शकता. वॉचआऊटचे सहसंस्थापक अॅलेन क्लेपफिझ्ज म्हणाले, "जेव्हा आपल्याला खरंच गरज असते, तेव्हा लगेच हँड सॅनिटायझर मिळत नाही. त्यावर हँड सॅनिटायझर बँड उत्तम असा पर्याय आहे" हे वाचा - लिफ्टमध्ये बटणांना स्पर्श करण्याची नाही गरज; फक्त बोट दाखवून चालणार लिफ्ट भारतात हळूहळू लॉकडाऊन शिथील केला जातो आहे. त्यामुळे घराबाहेर साबण आणि पाण्याने हात धुणं शक्य नाही. जेव्हा आपण घराबाहेर पडतो तेव्हा अशा अनेक वस्तूंना नकळत आपला स्पर्श होतो जिथं कित्येकांनी हात लावलेला असतो. अशा ठिकाणी हा हँड सॅनिटायझर आपल्याला फायदेशीर ठरू शकतो. फक्त या हँड सॅनिटायझर बँडमध्ये कमी प्रमाणात सॅनिटायझर राहतं. काही वेळच तुम्ही वापरू शकता आणि ते पुन्हा रिफिल करावं लागतं. शिवाय यातून तुम्ही स्प्रे करू शकता त्यामुळे फक्त लिक्विड हँड सॅनिटायझर वापरता येतो, जेल हँड सॅनिटायझर वापरू शकत नाही. हे वाचा - लिहिता लिहिता डिसइन्फेक्ट होणार हात; कोरोनाला दूर ठेवण्यासाठी Sanitizer Pen ची मदत वॉचआऊटचे सहसंस्थापक थॉमस वर्गा म्हणाले, "कोरोना महासाथीमुळे आपलं आयुष्य बदललं आहे. याच नव्या आयुष्याच एक भाग म्हणजे हँड सॅनिटायझर आपल्याला नव्या सवयी आत्मसात कराव्या लागतील आणि या नव्या जीवनशैलीशी जुळवून घेण्याचे  मार्ग आपल्याला शोधायला हवेत"
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Coronavirus, Sanitizer

    पुढील बातम्या