नवी दिल्ली, 8 डिसेंबर : जर तुम्हाला चीनी मोबाईल फोन्सवर (Chinese Mobile Phones) विश्वास नसेल, तर तुमचं हे म्हणणं खरं आहे. नुकतंच चीनच्या एका स्मार्टफोन कंपनीने अशी गोष्ट केली आहे, ज्याने सर्वच जण हैराण आहेत. चीनी कंपनीने मुद्दाम 20 कोटी लोकांच्या स्मार्टफोनमध्ये व्हायरस टाकला आहे. मोठे पैसे कमवण्यासाठी अशा प्रकारे व्हायरस टाकण्याचा प्रकार त्यांनी केला. नुकताच या गोष्टींचा खुलासा झाला असून मोठी खळबळ माजली आहे.
चीनची मोबाईल बनवणारी कंपनी जिओनी (Gionee) यात दोषी आढळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिओनी स्मार्टफोन कंपनीने जवळपास 20 कोटी स्मार्टफोनमध्ये, स्वत:च जाणूनबुजून मालवेअर व्हायरस टाकला आणि याद्वारे मोठी कमाई केली. या बेकायदेशीर कामासाठी चीनच्या एका कोर्टाने, स्मार्टफोन निर्माता कंपनी जिओनीला दोषी ठरवत मोठा निर्णय दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चीनी कंपनी जिओनीची सहयोग कंपनी शेनझेन झिपू टेक्नोलॉजीने (Shenzhen Zhipu Technology Co. Ltd) युजर्सच्या मोबाईलमध्ये अपडेटच्या नावाखाली, ट्रोजन हॉर्स व्हायरल (Trojan Horse Virus on Mobile phones) टाकला. हा व्हायरस फोनमध्ये कोणत्याही माहितीशिवाय, नको असेलल्या जाहीराती दाखवण्यास आणि दुसऱ्या मॅलिशियस ऍक्टिव्हिटीज सुरू करण्यात मदत करत होता. कंपनीने अशा जाहीरातींच्या मदतीने जवळपास 4.2 मिलियन डॉलरची कमाई केली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मोबाईल निर्माता कंपनी जिओनीकडून, मोबाईल फोनमध्ये इतक्या मोठ्या संख्येने व्हायरस, डिसेंबर 2018 ते ऑक्टोबर 2019 या काळात टाकला गेला होता. एका ऍपच्या माध्यमातून कंपनीने मुद्दाम ट्रोजन हॉर्स मालवेअरने (Trojan Horse malware) मोबाईल फोन संक्रमित केले होते. हे काम जिओनीची सब्सिडियरी कंपनी shenzhen zhipu टेक्नोलॉजी प्रायव्हेट लिमिटेडने केलं होतं.
कोर्टाने या गुन्हात दोषी अधिकाऱ्यांना 3 ते 3.5 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्याशिवाय प्रत्येक दोषी अधिकाऱ्यावर जवळपास 22 लाख रुपये दंड लावण्यात आला आहे.