मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Explainer : चीनचा झुरोंग रोव्हर मंगळावर उतरला!

Explainer : चीनचा झुरोंग रोव्हर मंगळावर उतरला!

या रोव्हरला घेऊन चीन चंतियानवेन - वन हे यान गेल्या जुलैमध्ये चीनमधून निघालं होतं. ही मोहीम म्हणजे चीनच्या अवकाश कार्यक्रमातला मैलाचा दगड ठरणार आहे.

या रोव्हरला घेऊन चीन चंतियानवेन - वन हे यान गेल्या जुलैमध्ये चीनमधून निघालं होतं. ही मोहीम म्हणजे चीनच्या अवकाश कार्यक्रमातला मैलाचा दगड ठरणार आहे.

या रोव्हरला घेऊन चीन चंतियानवेन - वन हे यान गेल्या जुलैमध्ये चीनमधून निघालं होतं. ही मोहीम म्हणजे चीनच्या अवकाश कार्यक्रमातला मैलाचा दगड ठरणार आहे.

नवी दिल्ली, 6 मे: तांत्रिक प्रगतीमध्ये चीन (China) सातत्याने नवनवी शिखरं पादाक्रांत करत आहे. शनिवारी सकाळी चीनच्या यानाने मंगळाच्या (Mars) भूमीला स्पर्श करून झुरोंग (Zhurong) नावाचा आपला रोव्हर (Rover) तिथे यशस्वीपणे उतरवला. चीनची ही पहिलीच मंगळ मोहीम असून, या पहिल्याच मोहिमेत चीनने अनेक विक्रम केले आहेत. मंगळाभोवती परिभ्रमण करणं, यान उतरवणं आणि रोव्हरद्वारे रोव्हिंग करणं यासगळ्या गोष्टी पहिल्याच मोहिमेत यशस्वीपणे करणारा चीन हा पहिलाच देश ठरला आहे. याआधी अमेरिका (USA) आणि रशिया (Russia) या देशांच्या मंगळ मोहिमा यशस्वी झाल्या आहेत; मात्र त्यांनाही पहिल्याच मोहिमेत एवढं यश मिळालं नव्हतं.

मंगळाच्या उत्तरेकडे असलेल्या, लाव्हापासून बनलेल्या पठारावर रोव्हर उतरवण्यात लँडरला (Lander) यश आलं. युटोपिया प्लॅनिटिया (Utopia Platinia) या नावाने ते पठार ओळखलं जातं.

चायना नॅशनल स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशनच्या (China National Space Administration) हवाल्याने क्झिनुआ (Xinhua) या चीनच्या अधिकृत सरकारी वृत्तसंस्थेने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तसंच, पूर्वनियोजित ठिकाणी रोव्हर उतरवण्यात यश आल्याचं सीसीटीव्ही या चीनच्या सरकारी प्रसारण माध्यमाने सांगितलं. 'निहाओ मार्स' (Nihao Mars) असं चीनच्या या मंगळ मोहिमेचं नाव असून, त्यावर आधारित एका विशेष टीव्ही कार्यक्रमात याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

आतापर्यंत चीनने अंतराळवीर अवकाशात पाठवले आहेत, चंद्रावर यान पाठवलं आहे आणि आता मंगळावर रोव्हर उतरवण्यात यश मिळवलं आहे. त्यामुळे या मंगळ मोहिमेमुळे चीनच्या अवकाशातल्या साम्राज्याच्या महत्त्वाकांक्षा पुन्हा एकदा दिसून आल्या आहेत.

वाचा: Alert! मोबाईलचा रात्री वापर टाळा; होतील दुष्परिणाम

चिनी पुराणकथां मधल्या अग्निदेवतेवरून झुरोंग असंनाव रोव्हरला देण्यात आलं आहे. काही महिन्यांपूर्वीच अमेरिकेने पाठवलेला पर्सिव्हरन्स नावाचा रोव्हर मंगळावर उतरला होता. त्यापाठोपाठ चीनचा झुरोंग मंगळावर आला असून, पृथ्वीबाहेरच्या वातावरणातही शक्तिप्रदर्शन करण्याचा दोन महासत्ता असलेल्या देशांचा हा प्रयत्न मानला जातो.

झुरोंग या रोव्हरला सहा चाकं असून, तो सौर ऊर्जेवर चालणारा आहे. या रोव्हरचं वजन अंदाजे 240 किलोग्रॅम असून, हा रोव्हर मंगळाच्या पृष्ठभागावरच्या दगडांचे नमुने गोळा करून, त्यांचं विश्लेषण करणार आहे. पृष्ठभागावर उतरलेला रोव्हर तीन महिने तिथे राहणार असून, तिथले फोटोग्राफ्स टिपणार आहे. तसंच, तिथली भौगोलिक माहिती, नमुने गोळा करणार आहे.

या रोव्हरला घेऊन चीन चंतियानवेन - वन हे यान गेल्या जुलैमध्ये चीनमधून निघालं होतं. ही मोहीम म्हणजे चीनच्या अवकाश कार्यक्रमातला मैलाचा दगड ठरणार आहे.

यायानाने फेब्रुवारी महिन्यात मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला होता. नंतर या यानाबद्दल चीनच्या सरकारी माध्यमांमधून कोणतीच माहिती देण्यात आली नव्हती. त्यानंतर थेट 14 मे 2021 रोजी जाहीर करण्यात आलं, की त्यांचं यान मंगळाला स्पर्श करण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचलं आहे.

लँडिंगची प्रक्रिया खूप कठीण आणि आव्हानात्मक मानली जाते. त्या गुंतागुंतीच्या प्रक्रियेला 'सेव्हन मिनिट्स ऑफ टेरर' (Seven Minutes of Terror) अर्थात 'थराराची सात मिनिटं' असं म्हटलं जातं. कारण मंगळावरून रेडिओ सिग्नल्स पृथ्वीवर पोहोचायला जेवढा वेळ लागतो, त्यापेक्षाही कमी कालावधीत ही प्रक्रिया पार पडते. त्यामुळे या मधल्या कालावधीत यानाशी किंवा रोव्हरशी कोणताही संपर्क असत नाही. यानाचा वेग कमी करून ते पृष्ठभागाच्या दिशेने उतरलं आणि पॅराशूटच्या साह्याने लँडिंग करण्यात आलं, असं सांगण्यात आलं.

वाचा: Google Pay चं मोठं पाऊल; आता अमेरिकेतूनही भारतात गुगल पेद्वारे पैसे पाठवता येणार

यापूर्वी मंगळावर रोव्हर उतरवण्याचे अमेरिका, रशिया आणि काही युरोपीय देशांचे प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. 2016मध्ये रशिया-युरोपच्या संयुक्त मोहिमेतल्या शिया परेल्ली यानाचं मंगळावर क्रॅश लँडिंग (Crash Landing) झालं होतं.

अगदी अलीकडे म्हणजे फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेच्या नासा (NASA) या संस्थेने परसिव्हरन्स (Perseverance) नावाचा आपला रोव्हर यशस्वीपणे मंगळावर उतरवला आहे. त्यानंतर आतापर्यंत तो मंगळाच्या पृष्ठभागावर फिरून आपलं माहिती गोळा करण्याचं काम करतो आहे.

अमेरिकेच्या या रोव्हरने एका छोट्या रोबॉटिक हेलिकॉप्टरचं उड्डाणही मंगळावर घडवून आणलं. अशा तऱ्हेने दुसऱ्या ग्रहावर उड्डाण घडवून आणण्याची ती पहिलीच वेळ होती.

अमेरिका आणि रशियाचे अंतराळवीर गेली अनेक वर्षं अंतराळाचा वेध घेत आहेत. या देशांच्या अनेक मोहिमाही आतापर्यंत झाल्या आहेत. त्या देशांच्या पंक्तीत बसण्याचा प्रयत्न करणाऱ्या चीननेही आजपर्यंत चांगलं यश प्राप्त केलं आहे.

चीनने आपल्या नव्या अवकाश स्थानकाचं (Space Station) पहिलं मोड्युल गेल्याच महिन्यात यशस्वीपणे लाँच केलं आहे. 2022पर्यंत तिथे मानवी अंतराळवीरांची टीम पाठवण्याची चीनची इच्छा असून, नंतर चंद्रावर माणूस पाठवण्याची मनीषा चीनने बाळगली आहे.

गेल्याच आठवड्यात चीनचं लाँग मार्च 5 बी नावाचं रॉकेट नियंत्रण सुटल्याने हिंदी महासागरात कोसळलं होतं. त्यावरून अमेरिका आणि अन्य देशांनी चीनवर टीका केली होती. अंतराळातला कचरा पृथ्वीवर आला, तर तो मानवी जीवनाचं आणि मालमत्तेचं नुकसान करू शकतो. त्यामुळे त्या संदर्भात काही नियम ठरवण्यात आले असून, त्याचं उल्लंघन चीनने केल्याचं त्या देशांचं म्हणणं होतं.

First published:

Tags: China, Mars