मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /गँगरेप झालेल्या तरुणीनं केली आत्महत्या, अंत्यसंस्कारावेळी झाला उलगडा; सुसाईड नोट वाचून बसला धक्का

गँगरेप झालेल्या तरुणीनं केली आत्महत्या, अंत्यसंस्कारावेळी झाला उलगडा; सुसाईड नोट वाचून बसला धक्का

तिनं आत्महत्या केल्यामुळे दुःखाचा डोंगर कोसळला होता. तेवढ्यात तिच्या खिशात एक चिठ्ठी सापडली. ती वाचून तर सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली.

जयपूर, 28 डिसेंबर: एका अल्पवयीन मुलीवर (Minor Girl) दोघांनी सामूहिक बलात्कार (Gang Rape) केल्यानंतर तिने स्वतःचं जीवन संपवण्याचा (Suicide) निर्णय घेतला. गळफास लावून आत्महत्या केली आणि त्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून (Suicide Note) स्वतःच्या खिशात ठेवली. ही चिठ्ठी जेव्हा घरच्यांनी वाचली, तेव्हा सर्व प्रकरणाचा उलगडा झाला आणि सर्वांनाच जबर धक्का बसला. 

अशी घडली घटना

राजस्थानच्या बाडमेरमध्ये एका अल्पवयीन तरुणीनं गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मुलीचे वडील बाडमेरमध्ये मजुरी करत होते आणि मुलीच्या शिक्षणासाठी पैसे कमावत होते. गेल्या काही वर्षांपासून या भागात भाड्याच्या घरात राहून मुलांच्या शिक्षणावर त्यांनी लक्ष केंद्रीत केलं होतं. अल्पवयीन तरुणी शाळेत येत-जात असताना परिसरातील एका आरोपीची तिच्यावर नजर होती. 

आरोपीने साधला डाव

मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी आरोपीने तरुणीला पकडून स्वतःच्या घरात नेलं आणि तिथं तिच्यावर लैंगित अत्याचार केले. त्याच्यासोबत त्याचा मित्रदेखील यात सहभागी होता. दोघांनी तरुणीवर अत्याचार केले आणि तिचे अश्लिल फोटो काढले. या प्रकाराची वाच्यता केली, तर बदनामी करण्याची धमकी या दोघांनी तिला दिली होती. या घटनेनंतर प्रचंड दबावाखाली असलेल्या या तरुणीनं स्वतःचं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेत गळफास घेतला. 

हे वाचा -

खिशात ठेवली चिठ्ठी

गळफास घेण्यापूर्वी आपल्याबाबत जे जे घडलं ते तिनं एका चिठ्ठीवर लिहिलं आणि ती चिट्ठी स्वतःच्या खिशात ठेवली. लेकीनं आत्महत्या केल्याचं समजल्यावर शोकमग्न झालेले तिचे वडील आणि कुटुंबीय तिचा मृतदेह मूळ गावी घेऊन गेले. त्यावेळी घरमालकानं पोलिसांना या घटनेची कल्पना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तेवढ्यात काही महिलांना मुलीच्या खिशात एक चिठ्ठी सापडली. ती त्यांनी मुलीच्या वडिलांकडे दिली. पोलिसांनीदेखील ही चिठ्ठी पाहिली असता तिच्यावर झालेल्या अत्याचारामुळेच बदनामीच्या भितीतून तिने आत्महत्या केल्याचं समोर आलं. 

पोलीस तपास सुरू

पोलिसांनी या प्रकऱणी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरु केला आहे. दोन्ही आरोपी सध्या फरार आहेत. 

First published:
top videos

    Tags: Crime, Gang Rape, Rape on minor, Suicide