मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

आता नेटवर्क नसतानाही करता येणार कॉल, मेसेज; वाचा iPhone 13 मध्ये येणाऱ्या या जबरदस्त टेक्नोलॉजीबाबत

आता नेटवर्क नसतानाही करता येणार कॉल, मेसेज; वाचा iPhone 13 मध्ये येणाऱ्या या जबरदस्त टेक्नोलॉजीबाबत

Phone 13 अर्थ ऑर्बिट म्हणजेच LEO सॅटेलाईट कम्युनिकेशन फीचरसह येऊ शकतो, जो तुमच्या फोनमध्ये नेटवर्क (No Network) नसल्यासही कॉल आणि SMS पाठवण्यासाठी मदत करेल.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 31 ऑगस्ट : अ‍ॅपलने (Apple) आयफोन 12 मध्ये (iPhone 12) 5G कनेक्टिव्हिटी दिली होती. आता यावर्षात लाँच होणाऱ्या आयफोनमध्ये कंपनी आपल्या 5G टेक्नोलॉजीला एक पाउल पुढे घेऊन जाणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, आयफोन 13 मध्ये (iPhone 13) नव्या सेल्युलर रेडिओ टेक्नोलॉजीचा वापर केला जाणार आहे. iPhone 13 अर्थ ऑर्बिट म्हणजेच LEO सॅटेलाईट कम्युनिकेशन फीचरसह येऊ शकतो, जो तुमच्या फोनमध्ये नेटवर्क (No Network) नसल्यासही कॉल आणि SMS पाठवण्यासाठी मदत करेल.

LEO टेक्नोलॉजीच्या मदतीने आयफोनमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा सेल्युलर कनेक्टिव्हिटी अपग्रेड येणार आहे. या टेक्नोलॉजीच्या मदतीने फोन सॅटेलाईटआधारे कम्युनिकेशन क्रिएट करेल. ज्यावेळी फोन 4G किंवा 5G नेटवर्क रेंजबाहेर असेल, त्यावेळी देखील हे शक्य होईल. 2019 मध्ये ब्लूमबर्गने अ‍ॅपल लवकरच आयफोनमध्ये LEO सॅटेलाईट कम्युनिकेशन मोडचा वापर करणार असल्याचं रिपोर्ट केलं होतं.

मिळालेल्या माहितीनुसार, आयफोन (iphone) याचा वापर वेगवान डेटा ट्रान्सफर करण्यासाठी करेल. केवळ iPhone 13 नाही, तर AR हेडफोन आणि इतर प्रोडक्ट्समध्येही याचा वापर केला जाऊ शकतो.

iPhone 13 खरेदी करणाऱ्यांसाठी Good News, या तारखेला करता येणार Pre-Order

LEO सॅटेलाईट कम्युनिकेशन फीचर क्वॉलकॉम X60 बेसबँड मॉडेम चिपमुळे शक्य होणार आहे, जो कम्युनिकेशनला सपोर्ट करतो. LEO मोडच्या मदतीने कॉल आणि मेसेज एक्सचेंज केले जाऊ शकतात. ही सुविधा इमरजेन्सीसाठी आणण्यात येत आहे. यासाठी अ‍ॅपल चार्जेस घेणार की नाही याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

दरम्यान, iPhone 13 सीरिज Apple A15 चिपसेटसह लाँच केला जाईल. A14 चं हे अपग्रेडेड वर्जन असेल. त्याशिवाय या मॉडेलमध्ये नवा फेस आयडी हार्डवेअर दिला जाईल, ज्याच्या मदतीने फेस मास्क किंवा चष्मा असूनही फोन अनलॉक केला जाऊ शकतो.

First published:

Tags: Apple, Iphone, Tech news