• Home
  • »
  • News
  • »
  • technology
  • »
  • नवीन मोबाईल घ्यायचाय? हे आहेत 6 हजार रुपयांच्या आतले बजेट स्मार्टफोन

नवीन मोबाईल घ्यायचाय? हे आहेत 6 हजार रुपयांच्या आतले बजेट स्मार्टफोन

स्मार्टफोन ही आता आपल्या रोजच्या गरजेची वस्तू झाली आहे. कोरोना आणि लॉकडाउनमुळे तर स्मार्टफोनच्या (Budget Smartphones) वापरात आणि उपयुक्ततेत अधिक वाढ झाली.

  • Share this:
मुंबई, 1 एप्रिल : स्मार्टफोन ही आता आपल्या रोजच्या गरजेची वस्तू झाली आहे. कोरोना आणि लॉकडाउनमुळे तर स्मार्टफोनच्या (Budget Smartphones) वापरात आणि उपयुक्ततेत अधिक वाढ झाली. तुम्हाला नवा स्मार्टफोन घ्यायचा असेल आणि तुमचं बजेट कमी असेल, तर आम्ही तुम्हाला 6 हजार रुपयांपर्यंत बजेट असलेल्या 8 स्मार्टफोनची माहिती देणार आहोत. 1. सॅमसंग गॅलेक्सी M01 कोअर (Samsung Galaxy M01 Core) सॅमसंगच्या या फोनला 5.3 इंचाचा डिस्प्ले असून, आठ मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा, तर पाच मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. दोन जीबी रॅम असून, स्टोरेज क्षमता 16 जीबी आहे. क्वाड कोअर प्रोसेसर असून, 3000 mAh क्षमतेची बॅटरी आहे. 2. रेडमी 7A (Redmi 7A) 5.45 इंचाचा HD+ डिस्प्ले या फोनला देण्यात आला असून, त्याचा ऍस्पेक्ट रेशो 18:9 आहे. फ्रंट कॅमेरा 5 मेगापिक्सेलचा, तर बॅक कॅमेरा 12 मेगापिक्सेलचा आहे. बॅटरीची क्षमता 4000 mAh असून, रॅम दोन जीबी, तर प्रोसेसर ऑक्टाकोअरचा आहे. 3. रियलमी सी2 (Realme C2) या फोनला 6.1 इंचाचा HD+ रिझॉल्युशनचा स्क्रीन असून, ड्यूड्रॉप नॉच देण्यात आला आहे. सेल्फी कॅमेरा पाच मेगापिक्सेलचा असून, बॅक कॅमेरे 13 आणि दोन मेगापिक्सेलचे आहेत. रॅम तीन जीबी, प्रोसेसर ऑक्टाकोअर, तर बॅटरीची क्षमता 4000 mAh आहे. 4. ऑनर 9S (Honor 9S) या फोनचा 5.45 इंचाचा डिस्प्ले 1440 x720 पिक्सेलचा आणि HD+ रिझॉल्युशनचा आहे. फ्लॅश सुविधेसह पाच मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आणि आठ मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा आहे. दोन जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेजसह मीडियाटेक हीलियो पी 22 SoC आहे. अँड्रॉइड 10वर आधारित मॅजिक यूआय 3.1वर हा फोन चालतो. बॅटरीची क्षमता 3020 mAh आहे. 5. शाओमी रेडमी 6 (Xiaomi Redmi 6) या फोनची स्क्रीन 5.45 इंची असून, HD+ आहे. त्याचा ऍस्पेक्ट रेशो 18:9 आहे. मेटॅलिक फिनिशच्या या फोनला चांगल्या ग्रिपसाठी आर्क डिझाइन देण्यात आलं आहे. यात हीलियो P22 प्रोसेसर असून तो ऑक्टाकोअर आहे. रॅम तीन जीबी असून, बॅटरीची क्षमता 3000 mAh आहे. फ्रंट कॅमेरा पाच मेगापिक्सेलचा असून, बॅक कॅमेरे 12 + 5 मेगापिक्सेलचे आहेत. 6. शिओमी रेडमी गो (Xiaomi Redmi Go) या फोनला पाच इंचाचा HD डिस्प्ले असून, त्याचं रिझॉल्युशन 720×1280 पिक्सेल, तर ऍस्पेक्ट रेशो 16:9 आहे. 3000 mAh क्षमतेची बॅटरी असून, रॅम एक जीबी, तर प्रोसेसर क्वाड कोअर आहे. आठ मेगापिक्सेलचा बॅक कॅमेरा, तर पाच मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा फोनला आहे. 7. लाव्हा Z1 (Lava Z1) हा फोन मीडियाटेक हीलिओ A20 प्रोसेसरवर चालतो आणि क्वाडकोअर आहे. त्याला मिलिट्री ग्रेड सर्टिफिकेशन मिळालं असून, त्यात ड्रॉप रेझिलन्स क्षमता आहे. त्यात पाच मेगापिक्सेल रिअर आणि पाच मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. दोन जीबी रॅम आणि 16 जीबी स्टोरेज क्षमता आहे. बॅटरी क्षमता 3100 mAh आहे. 8. पॅनासोनिक ELUGA I7 (Panasonic ELUGA I7) या फोनला 5.46 इंची HD+ डिस्प्ले असून, त्याचं रिझॉल्युशन 1440x720 पिक्सेल आहे. दोन जीबी रॅम आणि 16 जीबी स्टोरेज क्षमता आहे. फोन ड्युएल सिमचा असून, फ्रंट आणि बॅक असे दोन्ही कॅमेरे प्रत्येकी आठ मेगापिक्सेलचे आहेत. 4000 mAh क्षमतेची बॅटरी असून, मीडियाटेक MT6737H क्वाड-कोअर CPU आहे.
First published: