नवी दिल्ली, 10 ऑगस्ट: देशातील दुसरी मोठी टू-व्हीलर निर्माता कंपनीने त्यांच्या सर्वात प्रसिद्ध Jupiter स्कूटरवर जबरदस्त ऑफर आणली आहे. तुम्हाला देखील स्कूटर खरेदी करायची असेल तर ही संधी सर्वात चांगली आहे. Bike Dekho वेबसाइटच्या मते तुम्ही केवळ 2,420 रुपयांच्या EMI वर ही स्कूटर घरी आणू शकता. जाणून घ्या TVS Jupiter स्कूटरबाबत सर्वकाही… TVS Jupiter ZX चे फीचर्स टीव्हीएस मोटरने या स्कूटरमध्ये डिस्क ब्रेक आणि आय-टच स्टार्ट तंत्रज्ञान वापरले आहे. याआधी टीव्हीएस ज्यूपिटरमध्ये कंपनी सायलेंट स्टार्ट फीचर वापरत असे. यासह टीव्हीएस ज्युपिटरमध्ये कंपनीने इंटेलिओ टेकनीकचा वापर केला आहे. ज्यामुळे ही स्कूटरची फ्यूअल इफिशिअन्सी अधिक चांगली बनली आहे. कंपनीने असा दावा केला आहे TVS Jupiter ZX दुसऱ्या स्कुटीपेक्षा जास्क मायलेज देईल हे वाचा- तुमच्या खात्यात नाही आले PM Kisan चे 2000? त्वरित नोंदवा या क्रमांकांवर तक्रार TVS Jupiter ZX ची किंमत बाइक देखो वेबसाइटनुसार टीव्हीएस मोटरची नवीन TVS Jupiter ZX ची किंमत मुंबई एक्स शोरुममध्ये 71,255 रुपये आहे. तर ऑन रोड प्राइस 88,616* रुपये आहे. टीव्हीएस ज्युपिटर देशातील सर्वाधिक विक्री होणार स्कूटर आहे. अशावेळी नवीन फीचर्समुळे TVS Jupiter ZX जास्त पॉवरफुल आहे. हे वाचा- Gold price: 2 दिवसात 1700 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, आज काय आहे सोन्याचा भाव? TVS Jupiter ZX चे इंजिन टीव्हीएसच्या या स्कूटरमध्ये तुम्हाला 110cc चे इंजिन मिळेल. जे 7 bhp पॉवर आणि 8Nm टॉर्क जनरेट करतं. यामध्ये दोन रायडिंग मोड देखील देण्यात आले आहेत. ज्यामध्ये इको आणि पॉवर मोड समाविष्ट आहे. या स्कूटरच्या फ्रंटमध्ये 220 mm चा डिस्क ब्रेक आणि मागील चाकासाठी 130 mm चा डिस्क ब्रेक देण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.