नवी दिल्ली, 30 ऑगस्ट : Mahindra & Mahindra SUV खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. Mahindra ची एसयूव्ही (Mahindra SUV) अर्ध्याहून कमी किमतीत खरेदी करण्याची संधी आहे. या SUV वर 6 महिन्यांची वॉरंटी आणि 7 दिवसांचं फ्री ट्रायलही मिळेल. त्यामुळे कमी किमतीत चांगली कार खरेदी करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.
Mahindra XUV500 -
Cars24 वेबसाईटवर XUV500 कमी किमतीत खरेदी करण्याची संधी आहे. या SUV ची किंमत 4,91,399 रुपये आहे. जर नवी कोरी Mahindra XUV500 कार खरेदी करायची असेल, तर त्याची एक्स शोरुम किंमत 14 लाखांपासून 20 लाखांपर्यंत आहे. Cars24 वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, ही SUV केवळ 1,66,731 किलोमीटर चालली आहे. तसंच Cars24 वर असलेलं हे मॉडेल 2014 चं आहे. त्याशिवाय Cars24 वेबसाईटकडून या एसयूव्हीवर 6 महिन्यांची वॉरंटी आणि 7 दिवसांचं फ्री ट्रायल दिलं जातं आहे.
Mahindra Scorpio -
Cars24 वेबसाईटवर लिस्टेट असलेल्या Mahindra Scorpio SUV चं 2013 चं मॉडेल आहे. Cars24 वर या गाडीची किंमत 4,19,099 लाख रुपये आहे. ही SUV आतापर्यंत केवळ 89,139 किलोमीटर चालली आहे. Cars24 वेबसाईटकडून या SUV वर EMI ऑप्शनही देण्यात आला आहे. तसंच Cars24 वेबसाईटकडून लिस्टेट असलेल्या Mahindra Scorpio वर 6 महिन्यांची वॉरंटीही दिली जात आहे.
Mahindra TUV300 -
Cars24 वर लिस्टेट असलेल्या Mahindra TUV300 या SUV चं हे 2017 चं मॉडेल आहे. ही कार 5,97,299 लाख रुपयांत खरेदी करता येईल. ही SUV केवळ 29,124 किलोमीटर चालली आहे. तसंच गाडी खरेदीसाठी EMI ऑप्शनही देण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Tech Mahindra