Home /News /technology /

कार घेण्याचं स्वप्न होईल पूर्ण! ही कंपनी देत आहे Down Payment शिवाय गाडी खरेदी करण्याची संधी

कार घेण्याचं स्वप्न होईल पूर्ण! ही कंपनी देत आहे Down Payment शिवाय गाडी खरेदी करण्याची संधी

या कार खरेदीवर 5 वर्षांची अनलिमिटेड किलोमीटर वॉरंटी मिळणार आहे. त्याशिवाय 5 वर्ष अनलिमिटेड किलोमीटरचं रोड साईड असिस्टेंटही मिळेल. तसंच कंपनीकडून 5 सर्व्हिस विदआउट लेबर कॉस्ट उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

  नवी दिल्ली, 4 डिसेंबर : कार खरेदी करायच्या विचारात असाल, तर तुमच्यासाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. ब्रिटनची प्रसिद्ध ऑटो कंपनी मॉरिस गॅरेजेजने (Morris Garages)आपल्या भारतीय ग्राहकांसाठी जबरदस्त ऑफर आणली आहे. Morris Garages ने आपल्या लोकप्रिय एसयूव्ही MG Hector वर जबरदस्त ऑफर जाहीर केली आहे. MG Hector ही गाडी कोणतंही डाउन पेमेंट न करताच, थेट खरेदी करता येणार आहे. डाउन पेमेंटशिवायच केवळ EMI वर ही गाडी घेता येणार आहे. गाडी खरेदी केल्यानंतर प्रति महिना 22,222 रुपये EMI भरावा लागेल.

  (वाचा - ..अन्यथा अडचणी वाढणार; वाहनांवरील Number Plate बाबत RTO ची महत्त्वपूर्ण घोषणा)

  या कार खरेदीवर 5 वर्षांची अनलिमिटेड किलोमीटर वॉरंटी मिळणार आहे. त्याशिवाय 5 वर्ष अनलिमिटेड किलोमीटरचं रोड साईड असिस्टेंटही मिळेल. तसंच कंपनीकडून 5 सर्व्हिस विदआउट लेबर कॉस्ट उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

  (वाचा - पहिली Made In India लॅपटॉप चार्जिंग पॉवरबँक, जाणून घ्या काय आहे किंमत)

  MG Hector ची किंमत - भारतात MG Hector ची सुरुवातीची दिल्ली एक्स शोरूम किंमत 12 लाख 83 हजार इतकी आहे. याच्या टॉप मॉडेलची किंमत 18 लाख 8 हजार रुपये आहे. 5 सीटर MG Hector च्या डिझेल इंजिनमध्ये 4 वेरिएंट आणि हायब्रिड पेट्रोल वेरिएंटमध्ये 2 मॉडेल भारतीय बाजारात उपलब्ध आहेत.

  (वाचा - 27 वर्षांपूर्वी गोठवून ठेवलेल्या भ्रूणातून दिला चिमुरडीला जन्म)

  MG Hector पेट्रोल वेरिएंटमध्ये 1.5 लीटर टर्बो इंजिन मिळेल. जो 143 पीएस पॉवर 250 NM टॉर्क जनरेट करेल. हायब्रिड पेट्रोल वेरिएंटमध्ये 1.5 लीटर टर्बो इंजिन, 143 पीएस पॉवर 250 NM टॉर्क जनरेट करेल. याच्या डिझेल वेरिएंटमध्ये 2.0 लीटर डिझेल टर्बो इंजिन मिळेल, जे 170 पीए पॉवर आणि 350 NM टार्क जनरेट करेल.
  Published by:Karishma Bhurke
  First published:

  Tags: Car

  पुढील बातम्या