Home /News /lifestyle /

विज्ञानाच्या अविष्काराने आई होण्याचं स्वप्न पूर्ण, 27 वर्षांपूर्वी गोठवून ठेवलेल्या भ्रूणातून दिला चिमुरडीला जन्म

विज्ञानाच्या अविष्काराने आई होण्याचं स्वप्न पूर्ण, 27 वर्षांपूर्वी गोठवून ठेवलेल्या भ्रूणातून दिला चिमुरडीला जन्म

1992 मध्ये एका महिलेकडून भ्रूण डोनेट केलं गेलं होतं. फ्रीज केलं गेलेलं भ्रूण टीना नावाच्या एका महिलेमध्ये 12 फेब्रुवारी 2020 मध्ये ट्रान्सप्लांट करण्यात आलं. त्यानंतर टीनाने 26 ऑक्टोबरला मॉली नावाच्या चिमुकलीला जन्म दिला.

    वॉशिंग्टन, 4 नोव्हेंबर : अमेरिकेत एका चिमुकलीचा तब्बल 27 वर्ष जुन्या असलेल्या भ्रूणापासून जन्म झाल्याची घटना घडली आहे. एका 27 वर्ष फ्रीज केलेल्या अर्थात गोठवून ठेवलेल्या एम्ब्रियो म्हणजेच भ्रूणापासून (frozen embryos) बाळाचा जन्म झाल्याचा रेकॉर्ड झाला आहे. हे आतापर्यंतचं सर्वाधिक काळ फ्रीज केलं गेलंलं भ्रूण असल्याचं बोललं जात आहे. सीएनएनच्या एका रिपोर्टनुसार, हे प्रकरण अमेरिकेतील टेनेसी शहरातील आहे. 1992 मध्ये एका महिलेकडून भ्रूण डोनेट केलं गेलं होतं. फ्रीज केलं गेलेलं भ्रूण टीना नावाच्या एका महिलेमध्ये 12 फेब्रुवारी 2020 मध्ये ट्रान्सप्लांट करण्यात आलं. त्यानंतर टीनाने 26 ऑक्टोबरला मॉली नावाच्या चिमुकलीला जन्म दिला. रिपोर्टनुसार, 2017 मध्ये याच पद्धतीने टीनाच्या पहिल्या मुलीचा एमाचा जन्म झाला होता. टीना आणि बेन गिब्सन (Tina and Ben Gibson) या पती-पत्नीने फ्रोजन भ्रूण दत्तक घेऊन, पहिल्या मुलीला जन्म दिला होता. त्यावेळी पहिल्या मुलीचं-एमाचं भ्रूण 24 वर्ष जुनं होतं. टीनाने दिलेल्या माहितीनुसार, तिचे पती सिस्टिक फायब्रोसिसचे रुग्ण आहेत. हा आजार मुलं होण्याच्या प्रक्रियेत अडथळा आणतो. त्यामुळेच त्या पती-पत्नीने पुन्हा एकदा फ्रीज केलेल्या भ्रूणापासून बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. टीनाला या पद्धतीची माहिती तिच्या वडिलांकडून मिळाल्याचं तिने सांगितलं. त्यांना एका मॅग्झिनद्वारे एम्ब्रियो फ्रीजिंगच्या पद्धतीची माहिती मिळाली होती. टीना आणि तिच्या पतीने या संपूर्ण पद्धतीची चौकशी करून ते पुढील प्रक्रियेसाठी नॅशनल एम्ब्रियो डोनेशन सेंटरमध्ये (National Embryo Donation Center) पोहचले. National Embryo Donation Center ही एक नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन-स्वयंसेवी संस्था आहे. अशा पद्धतीने ज्या महिलांना बाळाला जन्म द्यायचा असतो, त्या महिलांमध्ये फ्रोजन भ्रूण ट्रान्सप्लांट केले जातात आणि हळू-हळू भ्रूणाची वाढ सुरू होते. ज्या जोडप्याला आपलं भ्रूण ठेवायचं नसतं, ते या संस्थेला भ्रूण दान करतात. ही संस्था दान केलेलं भ्रूण फ्रीज करून ठेवते. नंतर ज्यांना बाळ होण्यास अडचणी येतात, ते हे भ्रूण दत्तक (embryos adoption) घेतात.
    Published by:Karishma Bhurke
    First published:

    पुढील बातम्या