Home /News /technology /

पहिली Made In India लॅपटॉप चार्जिंग पॉवरबँक, जाणून घ्या काय आहे किंमत

पहिली Made In India लॅपटॉप चार्जिंग पॉवरबँक, जाणून घ्या काय आहे किंमत

लॅपटॉप लाँच होणारी भारतातील पहिली मेड इन इंडिया पॉवर बँक आत्मनिर्भर भारतअंतर्गत मॅन्युफॅक्चर आणि डेव्हलप करण्यात आली आहे.

  नवी दिल्ली, 4 डिसेंबर : इलेक्ट्रॉनिक ब्रँड EVM ने भारतीय बाजारात, लॅपटॉप चार्ज होणारी पहिली पॉवरबँक लाँच केली आहे. याआधी बाजारात मोबाईल, हेडफोन आणि स्पीकर चार्ज होणाऱ्या पॉवरबँक उपलब्ध आहेत. परंतु EVM ने लॅपटॉप लाँच होणारी भारतातील पहिली मेड इन इंडिया पॉवरबँक आणली आहे. 20000mAh कॅपेसिटी असणाऱ्या या पॉवरबँकने सी-पोर्ट असणारे लॅपटॉप चार्ज करता येणार आहेत. मुंबई बेस्ड EVM चे ब्रँड ओनर्स पिन पेरिफेरल्सकडून जाहीर करण्यात आलेल्या या पॉवरबँकचं नाव ENLAPPOWER आहे. EVM इंडियाचे सेल्स हेड याग्नेश पांड्या यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रोडक्ट आत्मनिर्भर भारतअंतर्गत मॅन्युफॅक्चर आणि डेव्हलप करण्यात आलं आहे. या मेड इन इंडिया लॅपटॉप चार्जिंग पॉवरबँकने, USB टाइप-सी कनेक्टर्सच्या मदतीने एकत्र 3 डिव्हाइसेज चार्ज करता येऊ शकतात. अल्ट्रा-ब्लॅक प्रीमियम मेटल बॉडी असणाऱ्या या डिव्हाइसला फ्लाईटच्या कॅरी ऑन लगेजसोबतही घेऊन जाता येणार आहे. ENLAPPOWER पॉवरबँकवर कंपनी संपूर्ण तीन वर्षांची वॉरंटी देत आहे. या लॅपटॉप पॉवरबँकची किंमत 9999 रुपये इतकी आहे.

  (वाचा - Weekend धमाल! आज रात्री 12 वाजल्यापासून फ्रीमध्ये पाहता येणार Netflix)

  EVM ENLAPPOWER पॉवरबँकने, एकसाथ यूएसबी टाईप-सी पोर्ट असणाऱ्या तीन गोष्टी चार्ज केल्या जाऊ शकतात. या पॉवरबँकसोबत चार फूट लांब केबल मिळेल. या पॉवरबँकची बॉडी अल्ट्रा ब्लॅक प्रीमियम मेटल असल्याने याचा लूकही क्लासी आहे.

  (वाचा - ..अन्यथा अडचणी वाढणार; वाहनांवरील Number Plate बाबत RTO ची महत्त्वपूर्ण घोषणा)

  Macbook, Macbook Air, Macbook Pro, MS Surface Pro, Dell XPS 13, HP Spectre x360, Lenovo IdeaPad, LG Gram आणि Asus Zenbook 13 हे लॅपटॉप चार्ज करता येणार आहेत. या लॅपटॉप पॉवरबँकने यूएसबी टाइप-सी कनेक्टिविटी असणारे सर्व स्मार्टफोन चार्ज करता येणार आहेत.
  Published by:Karishma Bhurke
  First published:

  पुढील बातम्या