नवी दिल्ली, 17 मे: मायक्रोसॉफ्टचे(Microsoft co founder)सहसंस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक बिल गेट्स (Bill Gates)आणि त्यांची पत्नी मेलिंडा गेट्स (Melinda Gates)यांनी विभक्त होणार असल्याचं (Bill and Melinda Gates divorce) काही दिवसांपूर्वी जाहीर केलं. तेव्हापासून बिल गेट्स यांच्याबद्दलच्या अनेक बातम्या समोर येत आहेत. अशातच न्यूयॉर्क टाईम्सने गेट्स यांच्या बाबतीत एक खुलासा केला. त्यांच्या रिपोर्टनुसार लग्न झाल्यानंतरही बिल गेट्स त्यांच्या कंपनीतील काही महिला कर्मचाऱ्यांना डेटवर येण्यास विचारायचे. एवढंच नव्हे, तर ते त्यांच्या ऑफिसमधील एका महिला कर्मचाऱ्यासोबत रिलेशनशिपमध्ये होते, असाही दावा न्यूयॉर्क टाईम्सने केला आहे.
न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार,बिल गेट्स आणिमेलिंडा यांचं लग्न 1994 मध्ये झालं. त्यानंतर 2000मध्येबिल गेट्स यांचीमायक्रोसॉफ्टमध्ये काम करणाऱ्या एका महिलेशी जवळीक निर्माण झाली होती. या अफेअरची माहिती 2019 मध्ये त्यावेळी समोर आली जेव्हा या महिलेने कंपनीच्या बोर्डाला पत्र लिहून तिच्या आणि बिल यांच्याबद्दल सांगितलं. त्यांच्या या पत्राची दखल घेत बोर्डाने या प्रकरणाची चौकशी केली होती. तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत या महिलेला पूर्ण सहकार्य केलं होतं. असं म्हटलं जातंय की, चौकशी पूर्ण व्हायच्या आधीच बिल गेट्सयांनी कंपनीतून राजीनामा दिला. मात्र, या प्रकरणाचा आणि बिल गेट्स यांच्या राजीनाम्याचा काहीच संबंध नव्हता,असं स्पष्टीकरण कंपनीच्या एका प्रवक्त्याने दिलं होतं.
बिल गेट्स यांच्याबद्दल खळबळजनक दावे; घरी व्हायच्या न्यूड पार्टी
2020 मध्ये बिल गेट्स यांनी मायक्रोसॉफ्ट आणि बर्कशायर हॅथवेच्या संचालक मंडळामधून राजीनामा दिला होता. बर्कशायर हॅथवे बिल गेट्सचे मित्र आणि जगातील प्रसिद्ध इन्व्हेस्टर वॉरेन बफे (Warren Buffett) सांभाळत आहेत. तसंच बिल गेट्स यांनी राजीनामा दिल्यानंतरही ते सत्या नडेला यांचे टेक अडव्हाझर राहतील, असं सांगितलं होतं.
'या' व्यक्तीसोबतच्या संबंधांमुळे बिल गेट्स आणि मेलिंडांचा घटस्फोट? काय आहे प्रकर
दरम्यान, न्यूयॉर्क टाइम्सला एका महिलेनं सांगितलं होतं की, "मी बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनमध्ये (Bill and Melinda Gates Foundation) काम केलंय. मी एकदा बिल गेट्स यांच्यासोबत वर्क ट्रिपसाठी न्यूयॉर्कला गेले होते. तेव्हा बिल गेट्स यांनी मला म्हटलं होतं की, मला कामाशिवाय तुला बाहेर एकदा भेटायचं आहे, तू माझ्यासोबत बाहेर जेवायला येणार का?"
बिल गेट्स आणि मेलिंडा यांनी घटस्फोट घेणार असल्याचं जाहीर केल्यानंतर बिल गेट्स यांच्याबद्दल रोज नवनवे खुलासे होत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bill gates, Microsoft