मराठी बातम्या /बातम्या /विदेश /लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या व्यक्तीसोबतच्या संबंधांमुळे बिल गेट्स आणि मेलिंडांचा घटस्फोट? काय आहे प्रकरण

लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या व्यक्तीसोबतच्या संबंधांमुळे बिल गेट्स आणि मेलिंडांचा घटस्फोट? काय आहे प्रकरण

गेल्या काही दिवसांपासून मीडिया आणि सोशल मीडियावर मायक्रोसॉफ्टचे(Microsoft) को-फाउंडर आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एकबिल गेट्स (Bill Gates)आणि त्यांची पत्नी मेलिंडा गेट्स (Melinda Gates)यांच्या घटस्फोटाची चर्चा आहे.

गेल्या काही दिवसांपासून मीडिया आणि सोशल मीडियावर मायक्रोसॉफ्टचे(Microsoft) को-फाउंडर आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एकबिल गेट्स (Bill Gates)आणि त्यांची पत्नी मेलिंडा गेट्स (Melinda Gates)यांच्या घटस्फोटाची चर्चा आहे.

गेल्या काही दिवसांपासून मीडिया आणि सोशल मीडियावर मायक्रोसॉफ्टचे(Microsoft) को-फाउंडर आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एकबिल गेट्स (Bill Gates)आणि त्यांची पत्नी मेलिंडा गेट्स (Melinda Gates)यांच्या घटस्फोटाची चर्चा आहे.

    नवी दिल्ली, 10 मे : गेल्या काही दिवसांपासून मीडिया आणि सोशल मीडियावर मायक्रोसॉफ्टचे(Microsoft) को-फाउंडर आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एकबिल गेट्स (Bill Gates)आणि त्यांची पत्नी मेलिंडा गेट्स (Melinda Gates)यांच्या घटस्फोटाची चर्चा आहे. गेल्या आठवड्यात या दोघांनी लग्नानंतर 27 वर्षांनी विभक्त होण्याचा निर्णय जाहीर केला होता. लग्नाच्या इतक्या वर्षांनी असं काय झालं की दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. याबद्दल सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. वॉल स्ट्रीट जर्नलच्या एका अहवालानुसार, या घटस्फोटाचं एक मोठं कारण लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या जेफरी एपस्टीन (Jeffrey Epstein) यांच्यासोबत बिल गेट्स यांचे असणारे संबंध हे आहे.

    वॉल स्ट्रीट जर्नलने काही कागदपत्रांसह दावा केलाय कीबिल गेट्स आणि एपस्टीनयांचे 8 वर्षांपासून संबंध आहेत. दोघांची पहिली भेट 2013 मध्ये झाली होती. न्यूयॉर्क टाइम्सने 2019 च्या ऑक्टोबर महिन्यात दावा केला होता की गेट्स आणि एपस्टीनयांची अनेक वेळा भेट झाली आहे. तसंच या वृत्तपत्रानं एपस्टीन गेट्स यांच्या न्यूयॉर्क (New York) येथील घरी थांबले होते, असाही दावा केला होता.

    हे ही वाचा-कोरोना लस पेटंटमुक्त होणार, भारताने सादर केलेला प्रस्ताव अमेरिकेकडून मान्य

    " isDesktop="true" id="549471" >

    एवढंच नव्हे, तर बिल गेट्स यांचं मेलिंडासोबत लग्न होण्याआधी ॲन विनब्लाड (Ann Winblad) नावाच्या एका महिलेसोबत अफेयर होतं. दोघांनी काही वर्ष एकमेकांना डेट केलं, त्यानंतर त्यांचं ब्रेकअप(break up)झालं. ॲनपासून वेगळं झाल्यानंतर बिल गेट्स यांनी मेलिंडासोबत लग्न केलं होतं. मात्र, त्यानंतरही ॲन आणि बिल एकमेकांना विसरू शकले नव्हते. टाइम मॅगझिनमध्ये 1997 मध्ये आलेल्या एका वृत्तानुसारबिल गेट्स आणि मेलिंडायांच्यादरम्यान एक करार झाला होता. त्यामध्ये स्पष्ट लिहिलं होतं की, बिल गेट्स वर्षातून एकदा ॲनसोबत सुट्टीवर जातील, यावर मेलिंडा यांनी आक्षेप घ्यायला नको.

    मेलिंडासोबत लग्नांनंतरही बिल गेट्स दरवर्षी ॲनसोबत सुट्टीवर जायचे. न्यूयॉर्क पोस्टच्या अहवालानुसार ॲन आणि बिल गेट्स दोघंही एका महागड्या बीच हाऊसवर जायचे. या बीच हाऊसचं (beach house) तीन दिवस आणि तीन रात्रीचं भाडं दोन लाख रुपये आहे. याठिकाणी पर्यटकांची गर्दी असायची. मात्र, बिल आगाऊ बुकिंग करून ठेवायचे. या बीच हाऊसमध्ये सर्व सोई-सुविधा उपलब्ध आहेत. बिल गेटस् यांचं 1987 मध्ये ॲनशी ब्रेकअप झालं होतं. मात्र, त्यानंतर दोघंही एकमेकांसोबत होते.

    First published:
    top videos

      Tags: Bill gates