वॉशिंगटन, 11 मे: मायक्रोसॉफ्टचे (Microsoft founder bill gates) सहसंस्थापक बिल गेट्स (Bill Gates) आणि त्यांची पत्नी मेलिंडा (Melinda Gates) यांनी लग्नानंतर 27 वर्षांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या घटस्फोटाबद्दल बर्याच चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. यातच आता बिल गेट्स यांच्यावर दोन पुस्तकं लिहिणार्या जेम्स वॉलेस (James Wallace) यांनी गेट्स यांच्या बाहेरख्यालीपणाबद्दल दावे केले आहेत. ते सांगतात, की सुरुवातीच्या काळात गेट्स यांनी त्यांच्या सहकार्यांसोबत मिळून घरी अनेक 'वाइल्ड पार्टीज' आयोजित केल्या होत्या. या पार्टीजमध्ये स्ट्रिपर्सला बोलावलं जायचं. गेट्स यांच्या या सवयींमुळेच त्यांच्या आणि मेलिंडांच्या नात्यात दुरावा आल्याचा अंदाज जेम्स वॉलेस यांनी वर्तवला आहे.
घरी यायच्या स्ट्रिपर्स –
वॉलेस यांनी मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांच्यावर दोन पुस्तकं लिहिली आहेत.
डेली मेलला दिलेल्या मुलाखतीत वॉलेस यांनी खुलासा केला की, सुरुवातीच्या काळात मायक्रोसॉफ्टमधील कर्मचारी कामासोबतच पार्टी आणि मौजमजा करायचे. यावेळी बाहेरून स्ट्रिपर्सला बिल यांच्या घरी आणलं जायचं. बिल हे त्या काळी फक्त कॉम्प्युटरवर काम करणारे नव्हते, तर बरेच रंगेलही होते.
मीडियाने बिल यांच्या पार्टीबद्दल सांगितलं नाही
वॉलेस यांनी त्यांच्या ‘Bill Gates and the Race to Control Cyberspace’ या दुसऱ्या पुस्तकात वॉशिंग्टनच्या लॉरेलहर्स्ट येथील घरी होणाऱ्या न्यूड पार्टीजबद्दल सांगितलंय.
चालत्या Lamborghini ने घेतला पेट; 8 महिन्यांपूर्वी खरेदी केलेली आलिशान कार खाक
ते म्हणाले, तेव्हापासूनच मीडिया गेट्स यांच्या घरून केवळ टेक्नोलॉजी आणि बिझनेसबद्दल बातम्या आणायचे. ते कधीच गेट्स यांच्या घरी होणाऱ्या 'वाइल्ड पार्टीज'बद्दल काहीच लिहायचे नाहीत.
पत्रकारांशी फ्लर्ट करायचे गेट्स
वॉलेस यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेट्स यांच्या अशा प्रकारच्या सवयींमुळे दोघांच्या नात्यात दुरावा आला असू शकतो. फ्रेंच (मेलिंडा यांचे पूर्वीचं नाव) यांना गेट्सच्या या सवयींबद्दल माहिती होती. 1988 पासून ते डेटिंग करायचे. त्यामुळे अनेक वेळा त्यांच्या नात्यात चढ-उतार आले. गेट्स यांनी कमिटमेंट देण्यास नकार दिल्यानं एक वेळ तर अशी होती, की दोघांनी एक वर्षासाठी ब्रेक-अप केलं होतं, असाही दावा वॉलेस यांनी केला आहे. 1992 मध्ये दोघंही पुन्हा एकत्र आले, त्यानंतर त्यांचे संबंध सुधारले आणि त्यांनी लग्न केले. दरम्यान,गेट्स त्यांच्या बातम्या कव्हर करायला येणाऱ्या महिला पत्रकारांशी ते फ्लर्ट करायचे असाही दावा वॉलेस यांनी केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.