फेसबुक युजरसाठी मोठी बातमी, आता VIDEO पाहण्यासाठी द्यावे लागणार पैसे

फेसबुक युजरसाठी मोठी बातमी, आता VIDEO पाहण्यासाठी द्यावे लागणार पैसे

कोरोनामध्ये परफॉर्मिंग आर्टशी संबंधित लोकांना मदत करण्यासाठी फेसबुकनं हे पाऊल उचललं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 04 मे : लॉकडाऊनमध्ये सध्या सर्वात जास्त वेळ हा सोशल मीडियावर लोकं घालवत आहेत. मात्र आता Facebook युजरसाठी एक मोठी बातमी आली आहे. फेसबुकवर (Facebook) लाईव्ह व्हिडीओ पाहण्यासाठी आता युजरना पैसे द्यावे लागणार आहेत. कोरोनामध्ये परफॉर्मिंग आर्टशी संबंधित लोकांना मदत करण्यासाठी फेसबुकनं हे पाऊल उचललं आहे.

दरम्यान, फेसबुकवर लाईव्ह व्हिडीओ करण्याआधी या लोकांकडे आपला व्हिडीओ विनामूल्य ठेवायचा की शुल्क आकारायचे हे सिलेक्ट करू शकतात. लॉकडाऊनमुळे संगीतकार, विनोदकार, वैयक्तिक प्रशिक्षक, स्पीकर्स यासारखे लोक कुठेही आपली कला सादर करू शकत नाही आहेत. म्हणून ते फेसबुकवर लाइव्ह व्हिडीओद्वारे लोकांशी संपर्क साधत आहेत. द व्हर्जनं दिलेल्या वृत्तानुसार अशा परिस्थितीत फेसबुक, निर्मात्यांना आणि छोट्या व्यवसायांना लाइव्ह व्हिडीओवर प्रवेश शुल्काचा पर्याय देऊन त्यांना मदत करू इच्छित आहे.

वाचा-रुग्णालयाने दिले नॉर्मल रिपोर्ट पण Apple Watch मुळे समोर आली धक्कादायक माहिती

डोनेट बटणाचाही असणार पर्याय

फेसबुकचे नवीन टूल त्यांनाही मदत करणार आहे, जे चॅरिटीसाठी निधी जमा करू इच्छितात. यासाठी लाइव्ह व्हिडीओमध्ये डोनेट बटणाचा पर्याय देऊ शकतात. या पर्यायातून जमा झालेली 100 टक्के रक्कम फेसबुक थेट ना नफा संस्थेच्या खात्यावर पाठवते आणि यातील कोणताही हिस्सा फेसबुक स्विकारणार नाही.

वाचा-Google Photos वर डिलिट झालेले फोटो-व्हिडिओ 'असे' मिळवा परत

हे फिचर कसे असेल याबाबत अद्याप माहिती नाही

फेसबुकच्या वतीनं या नव्या फिचरबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही आहे. हे फिचर कधीपासून येणार याबाबतही कोणतीही माहिती उपलब्ध नाही आहे.

वाचा-'हे' Mobile app तुम्हाला जीवघेण्या कोरोनाव्हायरसपासून वाचवणार

First published: May 4, 2020, 2:56 PM IST
Tags: Facebook

ताज्या बातम्या