'हे' Mobile app तुम्हाला जीवघेण्या कोरोनाव्हायरसपासून वाचवणार

'हे' Mobile app तुम्हाला जीवघेण्या कोरोनाव्हायरसपासून वाचवणार

IIIT Delhi च्या शास्त्रज्ञांनी कोरोनाव्हायरशी लढण्यासाठी WashKaro हे मोबाइल अॅप तयार केलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली,29 एप्रिल : कोरोनाव्हायरसपासून (Coronavirus) बचाव करण्याचा एक मार्ग म्हणजे वारंवार हात धुणे (hand wash), सोशल डिस्टेन्सिंग. मात्र हा आपल्या दररोजच्या जीवनाचा भाग नसल्याने किंवा आपल्याला सवय नसल्याने अनेकदा आपण विसरतो. मात्र आता काळजी करण्याची गरज नाही, तुम्हाला हात धुवायचे आहे, सोशल डिस्टेन्सिंग ठेवायचं आहे, याची आठवण करून देणार आहे एक मोबाइल अॅप (Mobile app).

आपण हात धुण्यास विसरतो. मात्र आता तुम्हाला हात धुण्याची आठवण करून देणार आहे, ते एक मोबाइल अॅप. हे अॅप तुमचा कोरोनाव्हायरसपासून बचाव करण्यासाठी मदत करणार आहे.

हे वाचा -  कोरोनाविरोधात आशेचा किरण असलेल्या Plasma therapy बाबत ICMR चं मोठं स्पष्टीकरण

दिल्लीतल्या इंद्रप्रस्थ इन्स्टिट्युट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलजीने (IIIT Delhi) कोरोनाव्हायरशी लढण्यासाठी एक मोबाइल अॅप (mobile app) तयार केलं आहे. या मोबाइल अॅपचं नाव आहे वॉशकरो (WashKaro).

कोरोनाव्हायरस आणि त्यापासून बचाव करण्याचे मार्ग याबाबत जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) गाइडलाइन्स लक्षात घेत हे अॅप विकसित करण्यात आलं आहे. सध्या हिंदी आणि इंग्रजी भाषेत हे अॅप उपलब्ध आहे. लवकरच पंजाबी, उर्दू, तामिळ आणि तेलगू भाषेतही लाँच केलं जाणार आहे, अशी माहिती  IIIT Delhi ने दिली आहे.

हे वाचा - धक्कादायक! अ‍ॅम्ब्युलन्स नाही...मदत नाही...बापाला हातगाडीवर घेऊन धावत होता मुलगा

IIIT Delhi मधील कंप्युटेशनल बायोलॉजी प्रोफेसर तवप्रितेश सेठी आणि कॉम्प्युटर सायन्सचे प्राध्यापक पोन्नूरंगम कुमारगुरू यांनी एकत्रितरित्या हे अॅप तयार केलं आहे. प्रा. सेठी यांनी सांगितलं, "हे अॅप तुम्हाला वारंवार हात धुण्याबाबत आठवण करून देईल. सोबतच कोरोनासंबंधी गैरसमज आणि चुकीच्या माहितीपासूनही दूर ठेवेल"

"यामध्ये सिम्प्टम ट्रॅकर आहे, ज्यामुळे हे अॅप करणाऱ्यामध्ये कोरोनाव्हायरसच्या लक्षणांची माहिती मिळू शकेल. जेणेकरून तुम्ही वेळेत टेस्ट कराल आणि सुरक्षित राहू शकाल. कोरोनाव्हायरससंबंधी तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरंही तुम्हाला या अॅपमार्फत मिळतील. यावर चॅटबोटची सुविधाही उपलब्ध आहे, जी तुम्हाला सरकारी वॉट्सअॅप हेल्पलाइन नंबरशी जोडते"

हे वाचा - प्रत्येक कोरोनामुक्त व्यक्ती कोरोनाग्रस्तासाठी करू शकत नाही रक्तदान, या आहेत अटी

प्रा. कुमारगुरू यांनी सांगतिलं, "जर तुम्ही सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं उल्लंघन केलं, तरीदेखील हे अॅप तुम्हाला सिग्नल देणार. कोरोनासंबंधित अपडेट्स ऑडिओ फॉरमेटमध्ये तुम्हाला मिळतील"

संकलन, संपादन - प्रिया लाड

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 29, 2020 08:22 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading