Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

WhatsApp वर Amul कडून 6000 रुपये जिंकण्याचा मेसेज आला? सावध व्हा, रिकामं होईल बँक अकाउंट

WhatsApp वर Amul कडून 6000 रुपये जिंकण्याचा मेसेज आला? सावध व्हा, रिकामं होईल बँक अकाउंट

सध्या डेअरी प्रॉडक्ट्स बनवणाऱ्या Amul या कंपनीच्या नावाने लोकांना टार्गेट केलं जात आहे. अमूलच्या नावे अनेकांना दरमहा 6 हजार रुपये कमवण्याची संधी देणारा एक मेसेज येत आहे. जर तुम्हाला देखील असा मेसेज आला असेल तर वेळीच सावधान होण्याची गरज आहे.

सध्या डेअरी प्रॉडक्ट्स बनवणाऱ्या Amul या कंपनीच्या नावाने लोकांना टार्गेट केलं जात आहे. अमूलच्या नावे अनेकांना दरमहा 6 हजार रुपये कमवण्याची संधी देणारा एक मेसेज येत आहे. जर तुम्हाला देखील असा मेसेज आला असेल तर वेळीच सावधान होण्याची गरज आहे.

सध्या डेअरी प्रॉडक्ट्स बनवणाऱ्या Amul या कंपनीच्या नावाने लोकांना टार्गेट केलं जात आहे. अमूलच्या नावे अनेकांना दरमहा 6 हजार रुपये कमवण्याची संधी देणारा एक मेसेज येत आहे. जर तुम्हाला देखील असा मेसेज आला असेल तर वेळीच सावधान होण्याची गरज आहे.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर : सध्या देशासह जगभरात डिजिटल व्यवहार (Digital Transactions) आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर झपाट्यानं वाढत आहे. त्यामुळे सायबर गुन्हे (Cyber Crime) आणि फसवणुकीच्या (Digital Fraud) घटनांमध्येही वाढ होत आहे. तुमची आर्थिक फसवणूक (fraud) करण्यासाठी आणि तुमची वैयक्तिक माहिती चोरण्यासाठी हॅकर्स अनेक मार्गांचा अवलंब करतात. सध्या डेअरी प्रॉडक्ट्स बनवणाऱ्या Amul या कंपनीच्या नावाने लोकांना टार्गेट केलं जात आहे. अमूलच्या नावे अनेकांना दरमहा 6 हजार रुपये कमवण्याची संधी देणारा एक मेसेज येत आहे. जर तुम्हाला देखील असा मेसेज आला असेल तर वेळीच सावधान होण्याची गरज आहे.

काय आहे हा मेसेज -

अमूलच्या नावाने येणाऱ्या मेसेजमध्ये एक लिंक येते. या लिंकवर जर तुम्ही क्लिक केलं, तर तुम्ही अमूलचा लोगो असलेल्या एका वेबसाइटवर पोहोचता. तिथे 'अमूल 75वा वर्धापन दिन' आणि त्याच्या खाली मोठ्या अक्षरात 'अभिनंदन' असं लिहिलेलं दिसतं. त्याच्या खाली 'तुम्हाला प्रश्नावलीद्वारे 6 हजार रुपये मिळवण्याची संधी मिळेल' असं लिहिलेलं असतं. त्या खाली तुम्हाला एक प्रश्न दिसतो. याचं उत्तर दिल्यानंतर तुम्हाला आणखी तीन प्रश्न विचारले जातात.

नंतर, तुमच्या स्क्रीनवर अमूलच्या लोगोप्रमाणे डिझाइन केलेले 9 बॉक्स दिसतात. तुम्हाला यापैकी कोणत्याही एका बॉक्सवर क्लिक करण्यासाठी तीन संधी दिल्या जातात. जर तुम्ही बॉक्सवर क्लिक करून ही लिंक 20 मित्र किंवा 5 व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये शेअर केली, तर 6 हजार रुपये मिळतील, असा मेसेज दिला जातो.

अशा प्रकारे अतिशय हुशारीनं फसवणूक करण्याचं काम हॅकर्सनं केलं आहे. विशेष म्हणजे वेबसाईटच्या पेजवर खाली काही कमेंट्स देखील दाखवण्यात आल्या आहेत. ज्यात अनेक लोकांनी 6 हजार रुपये मिळाले असल्याचं सांगितलं आहे. काहींनी तर ही योजना खूप चांगली असल्याची ही कमेंट केली आहे. ही संपूर्ण साइट अतिशय काळजीपूर्वक तयार केली गेली आहे की सुशिक्षित व्यक्ती देखील सहज जाळ्यात अडकू शकते.

Sim Card द्वारे एका सेकंदात खाली होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट, खबरदारी घ्या

अमूलकडून सावधानतेचा इशारा -

आपल्या नावाने नागरिकांची फसवणूक होत असल्याचं अमूलच्या लक्षात आल्यानंतर कंपनीने जनहितार्थ एक ट्विट केलं आहे. 'अमूलच्या नावानं व्हॉट्सअॅप आणि इतर सोशल मीडियावर स्पॅम (SPAM) लिंकसह एक बनावट मेसेज शेअर केला जात आहे. या लिंकवर अजिबात क्लिक करू नका. अमूल बक्षिसाची कोणतीही मोहीम चालवत नाही. ही माहिती तुमच्या मित्र आणि कुटुंबासोबत शेअर करा,' असं या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

WhatsApp चं नवं अपडेट, आता अधिकच सिक्योर होणार तुमचं Chat

हॅकर्स तुमच्या पैशावर मारू शकतात डल्ला -

ई-सायबर प्लॅनेटने (Ecyberplanet) तज्ञांनी दिलेल्या माहितीच्या आधारे सांगितलं, की अमूलच्या नावे शेअर होत असलेल्या लिंकमध्ये एक व्हायरस आहे. त्याद्वारे हॅकर्स तुमचे पैसे, वैयक्तिक डेटा किंवा इतर माहिती शोधत असल्याची शक्यता आहे. जेव्हा तज्ञांनी या लिंकचा अॅड्रेस शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती अमूलची अधिकृत वेबसाइट नसल्याचं लक्षात आलं. हॅकर्स आपला फोन किंवा कॉम्प्युटरमध्ये मालवेअर किंवा व्हायरस इन्स्टॉल करण्यासाठी या लिंकचा वापर करू शकतात. जर तुम्हाला अज्ञात क्रमांकावरून असा मेसेज आला असेल तर तत्काळ व्हॉट्सअॅपवर रिपोर्ट करून ब्लॉक करा, असा सल्ला देखील ई-सायबर प्लॅनेटने दिला आहे.

First published:

Tags: Cyber crime, Financial fraud, Whatsapp alert