मुंबई, 23 नोव्हेंबर : कार खरेदी करणे, हे अनेकांचे स्वप्न असते. परंतु बऱ्याचवेळा कारची खरेदी करण्यात बजेट महत्त्वाची भूमिका बजावत असल्यानं अनेकजण स्वस्त कारला प्राधान्य देतात. तुम्हीही स्वस्त कार खरेदी करण्याचा विचार करीत असाल, तर तुम्हाला आम्ही काही कारची माहिती देणार आहोत, ज्यांची किंमत 5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे.
ह्युंदाई सँट्रो
ह्युंदाई सँट्रो ही 2000 च्या दशकातील सर्वात लोकप्रिय कार होती. 2018 मध्ये नवीन मॉडेलसह ही कार बाजारात पुन्हा विक्रीसाठी आली. सँट्रो पेट्रोल इंजिन आणि सीएनजी-पेट्रोल अशा दोन पर्यायासह येते. सध्या ही कार एरा एक्झिक्युटिव्ह, मॅग्ना एक्झिक्युटिव्ह, मॅग्ना, स्पोर्ट्स एक्झिक्युटिव्ह, स्पोर्ट्स आणि एस्टा अशा सहा वेगवेगळ्या व्हेरियंटमध्ये येते.
या कारची किंमत 4.89 लाख रुपयांपासून सुरू होते. कारला 1.1 लिटर इनलाइन चार-सिलेंडर पेट्रोल इंजिन मिळते, जे 68bhp पॉवर आणि 99Nm टॉर्क निर्माण करते. तर सीएनजीवर चालणारे इंजिन 59bhp आणि 85Nm टॉर्क जनरेट करते. पेट्रोल इंजिन पाच-स्पीड मॅन्युअल किंवा ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले आहे, तर सीएनजी व्हेरियंट केवळ पाच-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येतो.
ही कार 30.48 kmpl चा मायलेज देते. याशिवाय, ही कार टचस्क्रीन, रिअर एसी व्हेंट्स, ड्युअल-टोन इंटीरियर, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल ओआरव्हीएम, ऑल-फोर पॉवर विंडो यांसारख्या वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे.
इलेक्ट्रिक वाहन घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, सरकारच्या निर्णयानं होणार फायदा
बजाज क्यूट
टू-व्हिलर आणि थ्री-व्हिलर गाड्यांच्या उत्पादनात देशातील प्रमुख उत्पादकांपैकी एक असलेल्या बजाज कंपनीनेही क्यूटच्या मदतीने फोर-व्हिलर वाहनांच्या बाजारपेठेत प्रवेश केला आहे. आकारातील सर्वात लहान कारपैकी एक असणाऱ्या बजाज क्यूटच्या पेट्रोल व्हेरियंटची किंमत 2.48 लाख रुपयांपासून तर सीएनजी व्हेरियंटची किंमत 2.78 लाख रुपयांपासून सुरू होते.
क्यूटमध्ये 216.6cc, फोर-स्ट्रोक, सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन आहे, जे 13.1PS पॉवर आणि 18.9Nm टॉर्क निर्माण करते. दुसरीकडे, सीएनजी व्हेरियंटमध्ये 11PS पॉवर आणि 16.1Nm टॉर्क निर्माण करतो. कारचे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. बजाजनं पेट्रोल व्हेरियंटसाठी 35 kmpl आणि सीएनजी व्हेरियंटसाठी 43 kmpl मायलेजचा दावा केला आहे.
मारुती ऑल्टो 800
मारुती ऑल्टो 800 ही ऑटोमोबाईल मार्केटमधील 5 लाखांखालील सेगमेंटमध्ये बऱ्याच काळापासून सर्वाधिक पसंतीची कार आहे. या हॅचबॅक 5-सीटरची किंमत 3.39 लाख रुपयांपासून सुरू होते, आणि ही कार 796cc इंजिनसह येते. मारुती अल्टो 0.8 लीटर पेट्रोल इंजिनसह येते, आणि पेट्रोल व्हेरियंट कार 47bhp पॉवर आणि 69Nm टॉर्क निर्माण करते. तर, या कारला सीएनजी मोडवर स्विच केल्यावर, तीच मोटर 40bhp आणि 60Nm टॉर्क निर्माण करते. कार 31.5 kmpl चा मायलेज देते. कारच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर, तिच्या केबिनला मध्यभागी सात-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमसह टू-टोन डॅशबोर्ड, रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स, फ्रंट आणि रियर बॉटल होल्डर, पॉवर विंडो, रिमोट कीलेस एंट्री आणि फ्रंट ड्युअल एअरबॅग्ज आहेत.
रेनॉ क्विड
फ्रेंच कार निर्माता कंपनी रेनॉल्टनं भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये रेनॉ क्विड लाँच करून 5 लाखांपेक्षा कमीच्या सेगमेंटमध्ये कंपनीच्या प्रतिस्पर्ध्यांना चांगली स्पर्धा निर्माण केली आहे. या कारची किंमत 4.64 लाखांपासून सुरू होते, आणि ती 22.25 kmpl चा मायलेज देते.
Google Mapsमध्ये आलंय तुमच्या गाडीशी संबंधित जबरदस्त फीचर, ‘हा’ होणार फायदा
क्विड कार दोन इंजिन पर्यायांसह येते. तिचे 0.8-लीटर तीन-सिलेंडर पेट्रोल मोटर 53bhp पॉवर आणि 72Nm टॉर्क जनरेट करते, तर 1.0-लीटर तीन-सिलेंडर पेट्रोल मोटर 67bhp पॉवर आणि 91Nm टॉर्क निर्माण करते. ट्रान्समिशन पर्यायांमध्ये पाच-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि एमटी समाविष्ट आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Car