मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /फीचर असावं तर असं! Google Mapsमध्ये आलंय तुमच्या गाडीशी संबंधित जबरदस्त फीचर, ‘हा’ होणार फायदा

फीचर असावं तर असं! Google Mapsमध्ये आलंय तुमच्या गाडीशी संबंधित जबरदस्त फीचर, ‘हा’ होणार फायदा

Google Maps चे जगभरात लाखो युजर्स आहेत. भारतातही या अॅपला खूप पसंती दिली जात आहे. Google मॅप्स अधिक युजर फ्रेंडली बनवण्यासाठी वेळोवेळी अनेक सर्व्हिस जोडल्या जातात. नुकतंच गुगलनं गुगल मॅप्समध्ये एक नवीन फीचर जोडलं आहे. हे फीचर कार चालकांना महत्त्वाची माहिती देणार आहे. अलीकडं इलेक्ट्रिक कारची मागणी वाढू लागली आहे. याचाच फायदा घेण्यासाठी गुगल मॅप्सही पुढं सरसावलं आहे.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

Google Maps मध्ये फास्ट चार्ज फीचर जोडण्यात आलं आहे. यासह युजर्सना त्यांच्या लोकेशनच्या आसपास असणाऱ्या 50 kW किंवा त्याहून अधिक क्षमतेच्या चार्जिंग स्टेशनची माहिती मिळू शकेल.

एवढंच नाही तर कार चालकांना इलेक्ट्रिक कारच्या चार्जिंग प्लगच्या आधारेसुद्धा सर्च रिझल्ट पाहता येणार आहेत. अँड्रॉइड आणि आयओएस यूजर्सना हे फीचर मिळायला सुरुवात झाली आहे.

गुगल मॅपच्या नवीन अपडेटमध्ये 'लाइव्ह व्ह्यू'चे फीचरही जोडण्यात आलं आहे. हे ऑगमेंटेड रिअॅलिटी बेस्ड टेक्नोलॉजीवर काम करते.

'लाइव्ह व्ह्यू' फीटरसह युजर्स त्यांच्या आसपासची दुकानं आणि एटीएम देखील पाहू शकतील. या फीचरमुळे सर्वसामान्यांनाही बरीच सुविधा मिळणार आहे. यासाठी तुम्हाला कॅमेरा वापरावा लागेल.

Google चे लाइव्ह व्ह्यू वैशिष्ट्य आता लंडन, लॉस एंजेलिस, न्यूयॉर्क, सॅन फ्रान्सिस्को, टोकियो आणि पॅरिसमध्ये उपलब्ध आहे. बातमीनुसार, हे फीचर भारतात या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढच्या वर्षी लॉन्च केलं जाईल.

First published:
top videos

    Tags: Google