मुंबई, 23 नोव्हेंबर : बदलत्या काळाची ओळख समजल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनाची खरेदी करायचं असेल तर तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. भारतीय नागरिकांच्या आवश्यकतेनुसार भारतीय नागरिकांच्या आवश्यकतेनुसार, इलेक्ट्रिक वाहनांसाठी नव्या बॅटरी बनवण्यात येणार आहेत. यासाठी केंद्र सरकारच्या डीएसटी म्हणजेच सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभाग आणि सीएसई अर्थात सायन्स अँड एन्व्हायर्न्मेंट सेंटरने एकत्र येऊन काम करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. सीएईकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, भारतात नवीन बॅटरीचं तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी आराखडा तयार केला जाईल. त्यानंतर या प्रक्रियेला पाठिंबा मिळावा म्हणून तज्ज्ञ उद्योगांचं व्यासपीठ निर्माण करण्यात येणार आहे. सीएसईच्या संशोधन विभागाच्या कार्यकारी संचालक अनुमिता रॉय चौधरी म्हणाल्या की, भारतात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘फास्टर अॅडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिक व्हेइकल्स’ (एफएएमई) सोबत काम केलं जात आहे. पण, यासाठी लागणारा खर्च, सुरक्षा आणि चार्जिंग सुविधेशी निगडीत अनेक आव्हानं अद्याप कायम आहेत. सीएसईच्या दुसऱ्या एक अधिकारी मौसमी मोहंती म्हणाल्या की, या आव्हानांना तोंड देऊन त्यातून नवे मार्ग शोधून काढणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे. ई वाहनांची मागणी वाढली अवजड उद्योग विभागाने इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहनांच्या तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘नॅशनल इलेक्ट्रिक मोबिलिटी मिशन प्लॅन’ (एनईएमएमपी) 2020 चा एक भाग म्हणून 2015 मध्ये ‘फेम’ योजना बनवली होती. जगभरातील वाढतं प्रदूषण आणि पेट्रोल-डिझेलवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी भारतासह जगातील अनेक देशांत इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. याच अनुषंगाने सरकारकडूनही देशात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध प्रकारच्या योजना बनवल्या जात आहेत. Tataच्या नव्या CNG कारची दमदार एंट्री, Swift अन् i10ला फोडणार घाम 185 टक्के वाढली विक्री मागील महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर दरम्यान इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. वार्षिक आधारावर विचार करता जवळपास 185 टक्क्यांपर्यंत इलेक्ट्रिक वाहनांची विक्री वाढली. या दरम्यान 1,11,971 इलेक्ट्रिक वाहनं विकली गेली. यात प्रवासी वाहनांची संख्याही समाविष्ट आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन ऑफ इंडियानं (फाडा) दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात 39 हजार 329 इलेक्ट्रिक वाहनं विकली गेली. मागील महिन्यात एकूण इलेक्ट्रिक वाहनांची विक्री 178 टक्के वाढून 3,745 पर्यंत पोहोचली. गेल्या वर्षी याच महिन्यात 1,346 वाहनं विकली गेली होती. बुलेट ट्रेनपेक्षाही वेगानं धावते ‘ही’ इलेक्ट्रिक कार, क्रोएशियन EVनं रचला विश्वविक्रम व्यावसायिक वाहनांच्या विक्रीतही वाढ फाडाने दिलेल्या आकडेवारीनुसार, इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत 125.64 टक्के वाढ होऊन ती 274 इतकी झाली. इलेक्ट्रिक दुचाकींचा विचार करता ऑक्टोबरमध्ये यात 269.06 टक्के वाढ नोंदवली गेली. एकूण 73,169 दुचाकींची विक्री झाली असून, मागील वर्षी याच महिन्यात 19,826 दुचाकी विकल्या गेल्या होत्या. तीन चाकी इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीतही 92.87 टक्के वाढ झाली. 34,793 तीन चाकी वाहनांची विक्री झाली. गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात 18,040 वाहनांची विक्री झाली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.