• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • चार जणांसाठी एकच रिचार्ज, 150 जीबी डेटासह अनलिमिटेड कॉलिंग

चार जणांसाठी एकच रिचार्ज, 150 जीबी डेटासह अनलिमिटेड कॉलिंग

टेरिफ चार्जेस वाढल्यानंतर कंपन्यांमध्ये पुन्हा एकदा रिचार्जच्या किंमतीवरून स्पर्धा रंगली आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 13 मार्च : गेल्या काही महिन्यांपासून देशातील टेलिकॉम कंपन्या आर्थिक संकटात सापडल्या आहेत. त्यातच कंपन्यांमध्ये टेरिफ वॉरही सुरु आहे. एअरटेलने वेगवेगळ्या किंमतीमध्ये पोस्टपेड प्लॅन दिले आहेत. यातील 999 रुपयांच्या प्लॅनमध्ये 150 जीबी डेटा मिळतो. याशिवाय या प्लॅनमध्ये चौघांना जोडता येतं. कंपनीने हा बेस्ट पोस्टपेड प्लॅन असल्याचं म्हटलं आहे. एअरटेलच्या या प्लॅनमध्ये चौघांना अॅड करता येतं. म्हणजेच यात 3 रेग्युलर सिमसह 1 डेटा अॅड ऑन वापरता येते. या प्लॅनमध्ये युजर्सना 150 जीबी डेटा मिळतो. याशिवाय अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंगची सुविधा मिळते. एअरटेलच्या या पॅकमध्ये एक वर्षासाठी मोफत अॅमेझॉन प्राइम आणि झी5 मेंबरशिपसुद्धा मिळते. 999 रुपयांच्या पोस्टपेड फॅमिली प्लॅनमध्ये हॅडसेट प्रोटेक्शनशिवाय एअरटेल एक्स्ट्रीमचे फायदेही मिळतात. यात Airtel Thanks च्या सेवाही दिल्या जातात. कंपनीने त्यांच्या इतर प्लॅनच्या तुलनेत हा प्लॅन युजर्स पसंद करत असल्याचं म्हटलं आहे. स्वस्त प्रीपेड प्लॅन्स Airtel चे प्रीपेड ग्राहकांसाठी 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीत 3 प्लॅन आहेत. यात 19 रुपयांचा सर्वात स्वस्त रिचार्जवर कोणत्याही नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉलिंग दिलं जात आहे. या रिचार्जची मुदत दोन दिवस आहे. यावर 200 एमबी डेटा मिळतो. हे वाचा : डेटासाठी बंपर ऑफर, 247 रुपयांच्या रिचार्जवर दररोज 3 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉल स्मार्ट रिचार्जमध्ये 79 रुपयांचा प्लॅन आहे. यात 64 रुपयांचा टॉकटाइम मिळेल. तसंच 200 एमबी डेटा 28 दिवसांसाठी मिळणार आहे. या प्लॅनमध्ये कॉलिंग दर एका मिनिटासाठी 60 पैसे इतका आहे. या प्लॅनशिवाय 49 रुपयांचा 28 दिवसांसाठी एक प्लॅन लाँच केला आहे. यामध्ये 100 एमबी डेटा आणि 38.52 रुपयांचा टॉकटाइम मिळतो. हे वाचा : Jio, Vodafone, Airtel चे 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे प्लॅन, डेटासह फ्री कॉलिंग
  Published by:Suraj Yadav
  First published: