मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Best 5G Phones In India: 20 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतात 'हे' 5 सर्वोत्तम 5G स्मार्टफोन, फिचर्सही दमदार

Best 5G Phones In India: 20 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतात 'हे' 5 सर्वोत्तम 5G स्मार्टफोन, फिचर्सही दमदार

Best 5G Phones In India: 20 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतात 'हे' 5 सर्वोत्तम 5G स्मार्टफोन, फिचर्सही दमदार

Best 5G Phones In India: 20 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतात 'हे' 5 सर्वोत्तम 5G स्मार्टफोन, फिचर्सही दमदार

Best 5G Phones in India: भारतात लवकरच 5G इंटरनेट सेवा सुरु होणार आहे. अनेक स्मार्टफोन कंपन्यांनी आतापर्यंत अनेक 5G स्मार्टफोन लॉन्च केले आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Suraj Sakunde

मुंबई, 31 ऑगस्ट: भारतात लवकरच 5G इंटरनेट सेवा सुरु होणार आहे. अनेक स्मार्टफोन कंपन्यांनी आतापर्यंत अनेक 5G स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. चीनी कंपनी Realme ने दोन वर्षांपूर्वी भारतात पहिला 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. त्याच वेळी, अमेरिकन टेक कंपनी मीडियाटेकने (MediaTek) भारतीय बाजारासाठी नवीन 5G स्मार्टफोन चिपसेट लॉन्च केला आहे, जो स्वस्त स्मार्टफोनमध्ये वापरला जाईल. जर तुम्ही 5G हाय स्पीडची वाट पाहत असाल, तर तुम्ही येथे दिलेल्या लिस्टमध्ये दिलेला कोणताही स्मार्टफोन खरेदी करू शकता, जो बजेटमध्ये उपलब्ध असेल आणि 20 हजारांपेक्षा कमी किमतीत (Best 5G Phones In India under 20,000) खरेदी करू शकता.

1- रियलमी नार्झो 30 5G-

रियलमी नार्झो 6.5 इंच स्क्रीन 90HZ डिस्प्लेसह येतो. या स्मार्टफोनमध्ये 5000mah बॅटरी आहे. 4GB + 64GB RAM / ROM सह, तुम्हाला तो 14,999 रुपयांमध्ये खरेदी करता येऊ शकेल.

2- Moto G51 5G-

मोटो G51 5G स्मार्टफोनमध्ये 6.8-इंचाचा फुल HD+ डिस्प्ले मिळेल. 50MP + 8MP + 2MP ट्रिपल रिअल कॅमेरा आणि 13MP सेल्फी कॅमेराचा सेटअप आहे. स्मार्टफोनची बॅटरी देखील 5000mAh आहे, तर किंमत 12,249 रुपये आहे.

3- Poco M4 Pro 5G-

या स्मार्टफोनमध्ये 6.6-इंचाचा फुल HD+ डिस्प्ले आहे. 50MP + 8MP ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. हा स्मार्टफोन 3 स्टोरेज व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. या स्मार्टफोनचं 4GB + 64GB व्हेरिएंट 12,499 रुपयांना उपलब्ध असेल.

हेही वाचा- Smartphone Hack: सावधान! स्मार्टफोनमध्ये ‘ही’ चिन्हे दिसत असतील, तर समजून जा तुमचा फोन हॅक झालाय

4- Redmi Note 10T 5G

या स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा डिस्प्ले, 5000mah बॅटरी आणि 48-MP ट्रिपल रिअर कॅमेरा आहे. हा स्मार्टफोन 2 प्रकारांमध्ये उपलब्ध असेल, पहिला 4GB + 64GB असेल, जो 11,999 रुपयांना उपलब्ध असेल तर दुसरा 6GBRAM + 128GB स्टोरेज मॉडेल 13,999 रुपयांना मिळेल.

5- Samsung Galaxy M13 5G-

या स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा डिस्प्ले, 5000mAh बॅटरी असेल आणि किंमत 13,999 रुपये असेल. सेल्फीसाठी ड्युअल कॅमेरा 50MP + 2MP मागील आणि 5MP फ्रंट कॅमेरा असेल.

First published:

Tags: Smartphone