Home /News /technology /

Ola-Uber Apps मध्ये देताय तुमची वैयक्तिक माहिती? यामुळे बसेल मोठा फटका

Ola-Uber Apps मध्ये देताय तुमची वैयक्तिक माहिती? यामुळे बसेल मोठा फटका

Ola-Uber सारखी अ‍ॅप्स वापरताना तुमची वैयक्तिक माहिती या कंपन्या जमा करून घेतात. तुम्हाला चांगल्या सुविधा देण्यासाठी ही माहिती जमा केली जाते, असं तुम्हाला सांगितलं जातं; मात्र तुमच्या वैयक्तिक माहितीचं (What will happen to your Personal Data) या कंपन्या काय करतात?

पुढे वाचा ...
मुंबई, 28 जानेवारी: पुणे, मुंबई, दिल्ली-एनसीआरसह अनेक मोठ्या शहरांमध्ये ओला, उबर, (Ola-Uber Taxi Service) रॅपिडोसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. यासोबत ग्रॅबटॅक्सी (Grabtaxi) आणि यांडेक्स गो (Yandex Go) यांसारख्या सुविधाही उपलब्ध आहेत. ही अ‍ॅप्स वापरताना तुमची वैयक्तिक माहिती या कंपन्या जमा करून घेतात. तुम्हाला चांगल्या सुविधा देण्यासाठी ही माहिती जमा केली जाते, असं तुम्हाला सांगितलं जातं; मात्र तुमच्या वैयक्तिक माहितीचं (What will happen to your Personal Data) या कंपन्या काय करतात? ग्राहकांची वैयक्तिक माहिती या कंपन्या दुसऱ्या कुणाला तरी विकतात, असं एका अभ्यासात समोर आलं आहे. या कंपन्या तुमच्या संदर्भातली सर्व वैयक्तिक माहिती थर्ड पार्टी कंपनीला विकतात. या कंपनीज तुमची वैयक्तिक माहिती जाहिरातींसाठी वापरतात. तुम्ही ज्या संदर्भात इंटरनेटवर शोधता, त्या संदर्भातल्या जाहिराती तुम्हाला मोबाइलवर सर्फिंग करताना दिसतात. हे असं दिसल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटतं; मात्र हे सारं तुमची माहिती अशा माध्यमातून विकली गेलेली असल्यामुळे होतं. हे वाचा-लवकरच येणार जगातील पहिला 200MP कॅमेरा असलेला स्मार्टफोन, देणार DSLR ला आव्हान Surfshark कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी Vytautas Kaziukonis यांनी एक अभ्यास केला. अनेक मोबाइल अ‍ॅप्सच्या माध्यमातून कंपन्या तुमच्या हालचालींवर नजर ठेवतात, असं या अभ्यासात स्पष्ट झालं. टॅक्सीईयू आणि रॅपिडो यांसारख्या कंपन्या अ‍ॅप क्रॅश झाल्यावर, तसंच मोबाइलचा कसा वापर केला जात आहे, हा सर्व डाटा कलेक्ट करतात. लीकॅब तुमचा पत्ता, लोकेशन आणि ई-मेलसारखी माहिती जमा करतं. काही कंपन्या तर अनेक गोष्टींवर लक्ष ठेवतात, असंही त्यात आढळळं आहे. या अभ्यासात ज्या 30 राइड हेलिंग अ‍ॅप्सचा (Ride Hailing Apps) समावेश केला गेला, त्यात 9 कंपन्या अशा होत्या ज्या युझरची माहिती थर्ड पार्टी अ‍ॅडव्हर्टायझिंग कंपनीला (Third Party Advertising) विकतात. यात युझरचं नाव, पत्ता, मोबाइल नंबर, ईमेल, (Name, Address, Mobile Number and Email id) अशा माहितीचा समावेश आहे. उबर आणि लिफ्टसारखी काही अ‍ॅप्स तर लिंग, जाती आणि मुलांची माहितीसुद्धा जमा करतात. हे वाचा-अर्थसंकल्पानंतर Mobile, Gadgets स्वस्त होणार? जाणून घ्या सरकार काय पाऊल उचलणार? बिझनेस स्टँडर्डच्या वृत्तानुसार, Surfshark च्या अभ्यासात अशी माहिती समोर आली आहे, की ग्रॅबटॅक्सी, यांडेक्स गो आणि उबर यांसारख्या कंपन्या आपल्या ग्राहकांची वैयक्तिक माहिती जमा करण्यात अग्रेसर आहेत. या कंपन्या सर्वांत जास्त प्रमाणात वैयक्तिक माहिती जमा करतात. ओला यात सहा क्रमांकावर आहे. रॅपिडोचं प्रमाण या बाबतीत कमी आहे. ग्रॅबटॅक्सीच्या तुलनेत रॅपिडो दहापट कमी डेटा गोळा करतं. बचाव कसा करायचा? कोणतंही अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर ते डेटा शेअरिंगसाठी परवानगी मागते. युझरचा कोणता डाटा Read करणार आणि Use करणार याची माहिती अ‍ॅप विचारून घेतं, असं Surfshark कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सांगतात. युझर्स हे काही न वाचता OK करत पुढे जातात आणि वैयक्तिक माहिती त्या अ‍ॅप्सना देतात. Kaziukonis सांगतात, की यांसारख्या अ‍ॅप्सना संवेदनशील माहिती देऊन युझर्स जोखीम घेतात. तुम्ही कोणत्या लिंकवर जात आहात किंवा कोणत्या वेबसाइटला भेट देत आहात, ही सगळी माहिती शेअर होते. सेवेच्या बदल्यात वैयक्तिक माहिती, तुमचा पत्ता या बाबी भलत्याच कोणाला तरी कळतात. यामुळे कोणत्याही अ‍ॅपला माहिती देण्याआधी सावधान राहा. त्यातल्या प्रत्येक गोष्टीला परवानगी न देता तुम्ही या सर्व त्रासांपासून वाचू शकता. तुम्ही राइड हेलिंग अ‍ॅप्सशी फक्त लोकेशन शेअर करू शकता आणि इंटरनेट वापराची परवानगी देऊ शकता; मात्र कॉन्टॅक्ट्स, फोन मेमरी आणि स्टोरेज वगैरे रीड करण्याची परवानगी या अ‍ॅप्सना देऊ नये.
First published:

पुढील बातम्या