जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Instagram ऑर्डर करताना सावधान! चॅटद्वारे तरूणीला 7 लाखांचा गंडा

Instagram ऑर्डर करताना सावधान! चॅटद्वारे तरूणीला 7 लाखांचा गंडा

Instagram ऑर्डर करताना सावधान! चॅटद्वारे तरूणीला 7 लाखांचा गंडा

तिने दोन आयफोन आणि एक घड्याळ घेण्यासाठी ऑनलाईन सर्च केलं. त्यादरम्यान इन्स्टाग्रामवर तिला एक लिंक मिळाली. त्यावरून तिने दोन आयफोन आणि एक घड्याळ ऑर्डर केलं. पण त्या ऑर्डरदरम्यानच एका सायबर आरोपीने इन्स्टाग्रामवर तिच्याशी चॅट करण्यास सुरुवात केली.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 17 डिसेंबर : सायबर क्राईम प्रकरणात सतत वाढ होत आहे. लॉकडाउनपासून देशातील डिजिटल व्यवहारात अधिक वाढ झाली. ज्या प्रमाणात डिजिटल ट्रान्झेक्शनचं प्रमाण वाढतं आहे, त्याच वेगात देशात ऑनलाईन फ्रॉडची प्रकरणही वाढत आहेत. नुकतंच आणखी एक ऑनलाईन फ्रॉडचं प्रकरण समोर आलं असून एका तरूणीला सायबर आरोपींनी तब्बल 7 लाख 34 हजार रुपयांचा गंडा घातला आहे. इन्स्टाग्रामवर चॅटिंगदरम्यान तरूणीची विविध खात्यांच्या माध्यमातून अनेक हप्त्यांद्वारे 7.34 लाखांची फसवणूक केली आहे. ही घटना हिमाचल प्रदेशातील मंडीमध्ये घडली असून तरूणीने याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आयपीसी कलम 420 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, करगोस येथील कलाशन गावातील रहिवासी वसुधा रावत यांची ऑनलाईन फसवणूक झाली आहे. 9 डिसेंबर रोजी आई-वडिलांची मॅरेज ऍनिव्हर्सरी असल्याने त्यांना गिफ्ट द्यायचं होतं. त्यासाठी तिने दोन आयफोन आणि एक घड्याळ घेण्यासाठी ऑनलाईन सर्च केलं. त्यादरम्यान इन्स्टाग्रामवर तिला एक लिंक मिळाली. त्यावरून तिने दोन आयफोन आणि एक घड्याळ ऑर्डर केलं. पण त्या ऑर्डरदरम्यानच एका सायबर आरोपीने इन्स्टाग्रामवर तिच्याशी चॅट करण्यास सुरुवात केली. चॅट करताना त्याने फसव्या पद्धतीने तिच्याकडे पैशांची मागणी केली. या तरूणीने गुगल पे आणि विविध खात्यांच्या माध्यमातून हप्त्यांमध्ये 7,34000 रुपये जमा केले. इतकी मोठी रक्कम जमा केल्यानंतरही ऑर्डर करण्यात आलेल्या वस्तूसाठी कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. याच दरम्यान, तरूणीच्या वडिलांच्या खात्यातून 50 हजार आणि आईच्या खात्यातून 45 हजार रुपये कट झाले. त्यामुळे त्यांना ऑनलाईन फ्रॉडचा संशय आला. तरूणीलाही आयफोन आणि घड्याळाबाबत कोणताही रिस्पॉन्स न मिळाल्याने तिलाही याबाबत शंका आली आणि तिने पोलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पुढील चौकशी सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात