मॉस्को, 30 जानेवारी : ऐजीच्या जीवावर बैजी उदार, अशी मराठीत म्हण आहे. त्यात वडिलांकडे कोट्यावधींची संपत्ती असेल तर गोष्ट वेगळी असेल. मात्र रशियाच्या सर्वात श्रीमंत असलेल्या कोट्यावधींचा मुलगा चक्क भाड्याच्या घरात राहत आहे. मिखाईल फ्रीडमॅन हे रशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये 11व्या क्रमांकावर आहेत. मात्र त्यांचा मुलगा अलेक्झांडर मॉस्कोच्या बाहेरील बाजूस दोन खोल्यांचा फ्लॅटमध्ये भाड्याने राहतो.
ब्लुमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार मिखाईल फ्रीडमॅन यांचा मुलगा अलेक्झांडर फ्रीडमॅन हे वडिलांच्या पैशावर नाही तर स्वत: नोकरी करतो. 19 वर्षीय अलेक्झांडरने, “मी स्वत:च्या पैशांनी मी खातो, राहतो, झोपतो, कपडे विकत घेतो,” असे सांगितले.
लंडनजवळील एका कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर गेल्या वर्षी ज्युनियर अलेक्झांडर मॉस्कोला परतला. पाच महिन्यांपूर्वी, त्याने पाच कर्मचाऱ्यांसोबत एसएफ डेव्हलपमेंट नावाची कंपनी सुरू केली. तर मिखाईलचा दुसरा व्यवसाय मॉस्को रेस्टॉरंट्समध्ये हुक्का उत्पादनांचे वितरण करतो. त्यानंतर त्याने ब्लॉगरपॅस ही एक ऑनलाइन मार्केटिंग कंपनीही सुरू केली.
अलेक्झांडरनं ब्लुमबर्गला दिलेल्या माहितीत, "माझ्या वडिलांनी मला सांगितले की आपल्या देशात व्यवसाय आणि राजकारणात गुंतागुंत आहे,", असे सांगितले. तसेच, अलेक्झांडरच्या वडिलांचा आपली संपत्ती धर्माकडे देण्याचा विचार आहे. तसेच, मी कोणाचाही वारसा नाही आहे असे समजून जगलो आहे, असेही मिखाईलनं सांगितले.
मिखाईल फ्रिडमॅन सप्टेंबरमध्ये न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीच्या स्टर्न स्कूल ऑफ बिझिनेसमध्ये जाण्याचा विचार करीत होता, परंतु त्याने वर्षभर घेण्याचे ठरविले. आता तो संपूर्णपणे त्याच्या कंपन्यांमध्ये स्वत: ला झोकून देण्यासाठी संपूर्णपणे एनवाययू सोडून जायचा की नाही याचा विचार करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.