मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

शेकडो स्टोअर्समधून आयफोन करण्यात आले जप्त; वाचा काय आहे कारण

शेकडो स्टोअर्समधून आयफोन करण्यात आले जप्त; वाचा काय आहे कारण

उच्च दर्जाची सिक्युरिटी आणि अत्याधुनिक फीचर्समुळे अ‍ॅपलच्या फोनला जगभरात मागणी आहे. या कंपनीवरच ही नामुष्की ओढावली आहे.

उच्च दर्जाची सिक्युरिटी आणि अत्याधुनिक फीचर्समुळे अ‍ॅपलच्या फोनला जगभरात मागणी आहे. या कंपनीवरच ही नामुष्की ओढावली आहे.

उच्च दर्जाची सिक्युरिटी आणि अत्याधुनिक फीचर्समुळे अ‍ॅपलच्या फोनला जगभरात मागणी आहे. या कंपनीवरच ही नामुष्की ओढावली आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 25 नोव्हेंबर :  उच्च दर्जाची सिक्युरिटी आणि अत्याधुनिक फीचर्समुळे अ‍ॅपलच्या फोनला जगभरात मागणी आहे. काही दिवसांपूर्वीच कंपनीनं iPhone 14 हा नवीन फोन लाँच केला आहे. या फोनला युजर्सचा चांगला प्रतिसाद मिळत असून, आता कंपनीनं iPhone 15 च्या लाँचची तयारी केली आहे. या फोनमध्ये लायटनिंग चार्जिंग पोर्टची जागा यूएसबी टाइप सी पोर्टला देण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. मात्र, चार्जिंग पोर्टमध्ये बदल करण्यापूर्वीच कंपनी आपल्या पूर्वीच्या चार्जरमुळे अडचणीत आली आहे.

रिटेल बॉक्समध्ये चार्जरशिवाय आयफोन विकणं अ‍ॅपलला महागात पडलं आहे. ब्राझीलमधील विविध स्टोअरमधून असे शेकडो आयफोन जप्त करण्यात आले आहेत. कारण, तिथे कंपनी चार्जरशिवाय आपला स्मार्टफोन विकत होती. ब्राझील सरकारच्या आदेशानंतर ही जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. चार्जरशिवाय आयफोन विकल्याबद्दल कंपनीवर कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ नाही. या पूर्वीही याच कारणामुळे कंपनीला ब्राझीलमध्ये दोनदा दंड ठोठावण्यात आला आहे. ‘टीव्ही 9 भारतवर्ष’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

अ‍ॅपलनं iPhone 12 सीरीजसह चार्जर शिपिंग बंद केलं आहे. हा फोन लाँच झाल्यानंतर काही दिवसांनी ब्राझील सरकारने या निर्णयावर आक्षेप घेतला होता. तेव्हा ब्राझील सरकारनं आयफोन जप्तीची कारवाई केली होती. कंपनीनं सरकारला आयफोन परत करण्याची विनंती केली होती. या प्रकरणाचा अंतिम निर्णय होईपर्यंत फोन विकण्याची परवानगीही मागितली होती. कंपनीच्या म्हणण्यानुसार सरकारनं परवानगी दिली होती.

आता पुन्हा याच कारणामुळे कंपनीवर ब्राझीलमध्ये कारवाई झाली आहे. 9To5Mac वेबसाईटनं दिलेल्या वृत्तानुसार, ब्राझीलमध्ये अनेक स्टोअरमधून आयफोन जप्त करण्यात आले आहेत. ब्राझीलमधील अधिकाऱ्यांनी केलेल्या या कारवाईला 'ऑपरेशन डिस्चार्ज' असं सांकेतिक नाव देण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आयफोन कॅरिअर स्टोअर्स तसंच कंपनीच्या अधिकृत रिसेलर स्टोअरवर कारवाया करण्यात आल्या आहेत.

ब्राझिलियन अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, जोपर्यंत बॉक्समध्ये चार्जर ऑफर केला जात नाही तोपर्यंत कंपनीला ब्राझीलमध्ये आयफोन विकण्यास बंदी घालण्यात आली होती. नंतर नवीन स्टॉक मार्केटमध्ये येईपर्यंत फक्त फोन विकण्याची परवानगी देण्यात आली. चार्जर नसल्यामुळे ग्राहकांना जास्त पैसे खर्च करावे लागतात. ही बाब नियमांच्या विरुद्ध आहे.

ऐकावं ते नवलच! समुद्रात पडलेला आयफोन 1 वर्षाने सापडला, बटण दाबताच घडला 'चमत्कार'

आयफोनसोबत चार्जर हवाच

कंपनी पर्यावरण वाचवण्याच्या गोष्टींचा हवाला देऊन पैसे वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. ब्राझील सरकारच्या म्हणण्यानुसार, फोनची बॅटरी चार्ज करण्यासाठी चार्जर ही एक महत्त्वाची अॅक्सेसरी आहे. त्याशिवाय आयफोन काम करू शकत नाही. त्यामुळे आता न्यायालयाच्या निर्णयानुसार अ‍ॅपलला आयफोन बॉक्समध्ये चार्जर द्यावा लागणार आहे.

तुमच्या स्मार्टफोनवर अजूनही 5G नेटवर्क मिळत नाही? वाचा कारण अन् सोपा उपाय

यापूर्वीही कारवाई

बॉक्समध्ये चार्जर न दिल्याबद्दल, कर्जदार, ग्राहक आणि करदात्यांच्या संघटनेनं कंपनीविरुद्ध साओ पाउलो राज्य न्यायालयात खटला दाखल केला होता. न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, चार्जरशिवाय प्रीमिअम डिव्हायसेस विकून कंपनी गैरवर्तन करत आहे. यानंतर अ‍ॅपलला ऑक्टोबर महिन्यामध्ये 100 दशलक्ष ब्राझिलियन रियाल (सुमारे 150 कोटी रुपये) दंड ठोठावण्यात आला होता. त्यानंतर, पुन्हा न्यायालयात अपील करण्याचा इशारा कंपनीनं दिला होता. सप्टेंबर महिन्यामध्येही अ‍ॅपलला सुमारे 2.5 दशलक्ष डॉलरचा दंड ठोठावण्यात आला होता.

First published:

Tags: Iphone, Technology