मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /तुमच्या स्मार्टफोनवर अजूनही 5G नेटवर्क मिळत नाही? वाचा कारण अन् सोपा उपाय

तुमच्या स्मार्टफोनवर अजूनही 5G नेटवर्क मिळत नाही? वाचा कारण अन् सोपा उपाय

5G Network, 5G Services, Smartphone, 5G Network in smartphone, 5G Network problem, 5G Network issue, 5G Network issue solution, 5g नेटवर्क, 5g नेटवर्क सोल्युशन, 5g नेटवर्क

5G Network, 5G Services, Smartphone, 5G Network in smartphone, 5G Network problem, 5G Network issue, 5G Network issue solution, 5g नेटवर्क, 5g नेटवर्क सोल्युशन, 5g नेटवर्क

या वर्षी 1 ऑक्टोबर या दिवशी नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर झालेल्या इंडियन मोबाईल काँग्रेसच्या सहाव्या आवृत्तीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतात 5G नेटवर्क लाँच केल्याची अधिकृत घोषणा केली.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, 23 नोव्हेंबर:  टेलिकम्युनिकेशन सेक्टरमध्ये सध्या मोठी स्पर्धा आहे. टेलिकम्युनिकेशन सेक्टरमधील मेजर प्लेयर असलेल्या रिलायन्स जिओनं भारतामध्ये 5G डेटा नेटवर्क आणण्याची घोषणा मागील वर्षी केली होती. नंतर त्यात भारती एअरटेलनही उडी घेतली. या वर्षी 1 ऑक्टोबर या दिवशी नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर झालेल्या इंडियन मोबाईल काँग्रेसच्या सहाव्या आवृत्तीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतात 5G नेटवर्क लाँच केल्याची अधिकृत घोषणा केली. 5G नेटवर्क कमालीचा स्पीड, लोअर लेटन्सी आणि डेटा नेटवर्कला अधिक सक्षम करतं. 5G आपल्या नेटवर्क स्लाइसिंगद्वारे भव्य मशीन टाईप कम्युनिकेश आणि व्हर्च्युअल नेटवर्क लागू करण्याची शक्यताही मोठ्या प्रमाणात वाढवतं. त्यामुळे देशात 5G नेटवर्कची गरज भासू लागली होती. सध्या भारतातील मोजक्या शहरांमध्ये रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलनं आपल्या ग्राहकांना 5G नेटवर्क देऊ केलं आहे. मात्र, अजूनही अनेक युजर्सना आपल्या 5G एनएबल्ड फोनवर हे नेटवर्क कसं मिळवायचं याबद्दल फार माहिती नाही.

    काही वर्षांपूर्वी भारतात 4G नेटवर्कची सुरुवात झाली तेव्हा कोणीही त्याचा फारसा विचार केला नाही. मोबाईल नेटवर्क हे अखंडपणे वेगवान 4G लाँग-टर्म इव्होल्युशन (LTE) नेटवर्कशी जोडलेलं असताना युजर्सनी आपले फोन वापरणं सुरू ठेवलं. त्यामुळे व्हाईस-ओन्ली 3जी नेटवर्कचा वापर हळूहळू बंदही झाला आहे. आता देशात 5G लाँच झाल्यामुळे अनेकांना ते वापरण्याचे वेध लागले आहेत. मात्र, मोबाईल फोन 5G नेटवर्कसाठी सक्षम असूनही आणि 5G नेटवर्क उपलब्ध असलेल्या शहरात राहत असूनही अनेकांना त्याचा वापर करता येत नाही. कारण, जोपर्यंत फोन ब्रँड तुम्हाला सॉफ्टवेअर अपडेट पाठवत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमच्या फोनवर 5G सिग्नल दिसणार नाही. स्मार्टफोन हे शक्य तितकं सर्वोत्तम नेटवर्क सिग्नल शोधण्यासाठी प्रोग्राम केलेले असतात. काही वेळा तुमच्या लक्षात आलं असेल की, जर तुम्ही सतत खराब नेटवर्क असलेल्या भागात फोन वापरत असाल तर तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते.

    '5G रेडी' फोनमध्ये 5G नेटवर्कशी कनेक्ट होण्यासाठी हार्डवेअर उपलब्ध असतं. पण, जेव्हा हे फोन भारतात पाठवले जातात तेव्हा, फोन ब्रँड्स या फोनला 5G नेटवर्कशी कनेक्ट होण्यापासून आणि बॅटरी ड्रेन होण्यापासून रोखण्यासाठी तथाकथित 'सॉफ्ट लॉक' वापरतात. अनेक फोन निर्मात्यांनी फोनवर 5G कनेक्शन सुरू कार्यरत करण्यासाठी अंतिम मुदत दिली आहे. या कालावधी दरम्यान फोनवर एक सॉफ्टवेअर अपडेट मिळेल जे तुमच्या फोनमध्ये 5G कनेक्शन सुरू करू शकते. अॅपल आणि सॅमसंगनं डिसेंबरपर्यंत भारतातील फोनवर 5G कार्यरत करण्यासाठी सॉफ्टवेअर अपडेट देण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे फोन युजर्सनी ‘सॉफ्टवेअर अपडेट’ सेक्शनकडे नियमितपणे लक्ष दिलं पाहिजे.

    हेही वाचा: प्रतीक्षा संपली! Tataच्या नव्या CNG कारची दमदार एंट्री, Swift अन् i10ला फोडणार घाम

    नेटवर्क सेटिंग्जकडे लक्ष असू द्या

    तुम्ही तुमच्या फोनवर योग्य मोबाइल डेटा नेटवर्क निवडलं आहे याची खात्री केली पाहिजे. साधारणपणे, प्रत्येक स्मार्टफोन तुम्हाला सर्वात फास्ट कनेक्टिव्हिटी देण्यासाठी त्याच्या फर्मवेअरवर उपलब्ध असलेली सर्वोच्च नेटवर्क गुणवत्ता निवडतो. मात्र, दुहेरी खात्री करण्यासाठी तुमच्या फोन नेटवर्क सेटिंग्जमध्ये जाऊन मोबाइल डेटा ऑप्शन निवडा. तुमच्या फोनमधील 5G नेटवर्क्समध्ये प्रवेश करण्यासाठी फर्मवेअर उपलब्ध असल्यास, मोबाइल डेटा सेटिंग्ज अंतर्गत ‘5G/LTE’ किंवा तत्सम लेबल तपासा. तेथील 'ऑटो कनेक्ट' ऑप्शन तुम्हाला सर्व नेटवर्कसाठी (3G/4G/5G) कव्हरेज देतो.

    सिम कार्ड बदलण्याची गरज आहे का?

    सुमारे सात वर्षांपूर्वी भारतात दाखल झालेल्या 4G नेटवर्कमध्ये अपग्रेड करण्यासाठी दूरसंचार सेवा प्रदात्यांना जुन्या नेटवर्कच्या मूलभूत पायाभूत सुविधांमध्ये पूर्णपणे बदल करावे लागले होते. त्यावेळी युजर्सलासुद्धा आपल्या पातळीवर काही बदल करावे लागले. 4G नेटवर्क वापरण्यासाठी नवीन सिम कार्ड घ्यावी लागली. यावेळी तसं करण्याची आवश्यकता नाही. कारण, 5G नेटवर्क हे 4Gच्या कोर फ्रेमवर्कवर तयार केलं गेलं आहे. म्हणून, 5G सेवांमध्ये प्रवेश करण्यासाठी तुम्हाला नवीन सिमची आवश्यकता नाही. सध्या वापरात असलेलं सिम किमान सर्व नॉन-स्टँडअलोन (एनएसए) 5G नेटवर्कसाठी कनेक्टिव्हिटी ऑफर करत राहील.

    युजर-एंड कनेक्टिव्हिटी नोड अपग्रेड करूनही 5G नेटवर्क मिळवणं शक्य आहे. मात्र, हा नेटवर्कचा मुख्य भाग नाही. स्टँडअलोन (SA) 5G नेटवर्कला नवीन सिम कार्डची आवश्यकता असल्याचे सांगितलं जात आहे. मात्र, देशात SA 5G नेटवर्क देणाऱ्या जिओच्या म्हणण्यानुसार नवीन सिमकार्ड घेण्याची गरज नाही. अगोदर उपलब्ध असलेलं 4G सिमकार्ड 5G नेटवर्क देऊ शकतं.

    तुम्ही राहत असलेल्या भागामध्ये 5G नेटवर्क अस्तित्वात आहे का?

    5G नेटवर्कचा वापर करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही राहत असलेल्या परिसरामध्ये 5G उपलब्ध आहे की नाही? हे तपासणं. नसेल तर त्याची प्रतीक्षा करावी लागेल. जिओ आणि एअरटेल या दोन्ही कंपन्यांनी 5G सेवा सुरू केल्या जात असलेल्या ठिकाणांची ग्राहकांना नियमितपणे माहिती देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे तुमच्या नेटवर्क सर्कलमध्ये 5G उपलब्ध झाल्यावर तुम्हाला कंपनीकडून त्याची सूचना मिळण्याची शक्यता आहे.

    First published:
    top videos

      Tags: 5G, Network, Smartphone