नवी दिल्ली, 22 डिसेंबर : अमेरिकी टेक्नोलॉजी कंपनी अॅपल (Apple) आता कारचं उत्पादन करण्याच्या तयारीत आहे. ही कार अॅडव्हान्स बॅटरी टोक्नोलॉजीवर आधारित असेल. अॅपल 2024 पर्यंत कारचं उत्पादन सुरू करू शकत असल्याची माहिती आहे.
न्यू एजेन्सी रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, कंपनी प्रोजेक्ट टायटन या नावाने 2024 पासून ऑटो सेक्टरमध्ये पाऊल टाकण्यासाठी काम करत असून कंपनीने आपल्या वाहनाचं एक डिझाइनही तयार केलं आहे. परंतु सध्या कंपनीने आपलं लक्ष त्यावरून हटवून, सॉफ्टवेअरवर केंद्रीत केलं आहे.
रॉयटर्सने सुत्रांच्या हवाल्याने सांगितलं की, सध्या अॅपलने या प्रोजेक्टची माहिती स्वत:हून सार्वजनिक केलेली नाही. 2018 मध्ये अॅपलचे माजी वरिष्ठ कर्मचारी डोग फील्ड, हा ऑटो प्रोजेक्ट पाहण्यासाठी कंपनीतही आले होते. त्यानंतर याप्रकरणी मोठी प्रगती झाली असल्याची माहिती आहे. न्यूज एजेन्सीने सुत्रांच्या हवाल्याने सांगितलं की, आता कंपनीचं लक्ष्य ग्राहकांसाठी एक उपयोगी वाहन बनवण्याचं आहे.
गुगलशी स्पर्धा -
अॅपलला सामन्य जनतेसाठी उपयोगी वाहन बनवताना अनेक दिग्गज कंपन्यांशी स्पर्धा करावी लागू शकते. गुगलची मूळ कंपनी अल्फाबेट इंकनेही Waymo नावाने रोबो टॅक्सी तयार केली आहे. ही कार ड्रायव्हरलेस कार असल्याची माहिती आहे.
अॅपलला एक अशी बॅटरी डिझाइन करायची आहे की, जी बॅटरीची किंमत कमी करेल आणि वाहनाचे ऑपरेटिंग तास वाढवेल. परंतु कंपनीने याबाबत कोणतीही माहिती देण्यास नकार दिला आहे. अॅपल जगभरात एक प्रसिद्ध ब्रँड आहे, ज्याचे फोन, टॅबलेट, फिटनेस बँडपर्यंतचे सर्वच प्रोडक्ट अतिशय प्रमियम क्वालिटीचे असून ग्राहकांमध्ये याची जबरदस्त क्रेझ आहे.