मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /14 सप्टेंबर रोजी Apple चा मेगा इव्हेंट, लाँच होणार iPhone 13 सीरिज आणि Watch 7

14 सप्टेंबर रोजी Apple चा मेगा इव्हेंट, लाँच होणार iPhone 13 सीरिज आणि Watch 7

नव्या iPhone 13 मध्ये लो अर्थ ऑरबिट (LEO) सॅटेलाईट कम्युनिकेशन कनेक्टिव्हिटी देण्यात येईल. ज्यामुळे युजर्स विना 4G आणि 5G कव्हरेजही कॉल आणि मेसेज पाठवू शकतील.

नव्या iPhone 13 मध्ये लो अर्थ ऑरबिट (LEO) सॅटेलाईट कम्युनिकेशन कनेक्टिव्हिटी देण्यात येईल. ज्यामुळे युजर्स विना 4G आणि 5G कव्हरेजही कॉल आणि मेसेज पाठवू शकतील.

नव्या iPhone 13 मध्ये लो अर्थ ऑरबिट (LEO) सॅटेलाईट कम्युनिकेशन कनेक्टिव्हिटी देण्यात येईल. ज्यामुळे युजर्स विना 4G आणि 5G कव्हरेजही कॉल आणि मेसेज पाठवू शकतील.

नवी दिल्ली, 9 सप्टेंबर : अ‍ॅपल इंक (Apple Inc) 14 सप्टेंबर रोजी स्पेशल Annual Mega Event ची घोषणा करणार आहे. याचवेळी आयफोन 13 (Apple iPhone 13) ची लाँचिंग डेट ठरवण्यात आली आहे. अ‍ॅपलने इव्हेंटचं टायटल ‘California Streaming’ असं ठेवलं आहे. कंपनीने या इव्हेंटमध्ये कोणते प्रोडक्ट लाँच केले जातील याची माहिती दिलेली नाही. परंतु यादरम्यान अ‍ॅपल दरवर्षी आपला नवा आयफोन लाँच करतं. त्यामुळे या इव्हेंटमध्ये आयफोन 13 लाँच केला जाण्याचं बोललं जात आहे.

मागील वर्षी अ‍ॅपलने इव्हेंटचं नाव ‘Spring Loaded’ ठेवलं होतं. ज्यात कंपनीने आयपॅड प्रो लाइनअपन लाँच केला होता. आता यंदाच्या इव्हेंटमध्ये नवा आयफोन, वॉच सीरिज 7 आणि एयरपॉड 3 लाँच होण्याची शक्यता आहे.

अ‍ॅपलच्या iPhone 13 बाबत अनेक लीकमधून फीचर्स समोर आले आहेत. नव्या iPhone 13 मध्ये लो अर्थ ऑरबिट (LEO) सॅटेलाईट कम्युनिकेशन कनेक्टिव्हिटी देण्यात येईल. ज्यामुळे युजर्स विना 4G आणि 5G कव्हरेजही कॉल आणि मेसेज पाठवू शकतील.

14 सप्टेंबर रोजी अ‍ॅपलच्या इव्हेंटमध्ये iPhone 13, iPhone 13 Pro, iPhone 13 Pro Max आणि iPhone 13 mini सारखे स्मार्टफोन लाँच होऊ शकतात. 14 सप्टेंबर लाँचिंगनंतर 17 सप्टेंबरपासून प्री-बुकिंग सुरू होणार असून, 24 सप्टेंबरपासून सर्व फोनची विक्री सुरू केली जाईल, अशी माहिती आहे.

चार्ज झाल्यानंतर स्मार्टफोनमध्ये झाला ब्लास्ट, भयंकर PHOTO व्हायरल

Watch Series 7 -

iPhone 13 सीरिजसह इव्हेंटमध्ये वॉच सीरिज 7 देखील लाँच केली जाऊ शकते. कंज्युमर टेक इंडस्ट्री एक्सपर्ट ब्लूमबर्गचे मार्क गरमॅन यांनी दिलेल्या माहितीनुसार, अ‍ॅपल लाँच इव्हेंटमध्ये वॉच सीरिज लाँच करेल. त्याशिवाय या घोषणेनंतर वॉच लिमिटेड मर्यादेत उपलब्ध केलं जाईल. हे वॉच नव्या डिझाईनसह लाँच होईल. तसंच वॉचमध्ये फ्लॅट डिस्प्ले, अपडेटेड स्क्रिन टेक्नोलॉजी दिली जाईल, तसंच फास्ट प्रोसेसरदेखील असणार असल्याची माहिती आहे.

First published: