जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / चार्ज झाल्यानंतर स्मार्टफोनमध्ये झाला ब्लास्ट, भयंकर PHOTO व्हायरल

चार्ज झाल्यानंतर स्मार्टफोनमध्ये झाला ब्लास्ट, भयंकर PHOTO व्हायरल

चार्ज झाल्यानंतर स्मार्टफोनमध्ये झाला ब्लास्ट, भयंकर PHOTO व्हायरल

दोन महिन्यांपूर्वी घेतलेल्या POCO X3 Pro फोनचा ब्लास्ट झाला. या फोनचे फोटोही युजरने शेअर केले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 8 ऑगस्ट : ऑगस्ट 2018 मध्ये आलेला Xiaomi चा POCO ब्रँड Mid-range फोनमध्ये कमी काळातच प्रसिद्ध झाला. स्वस्त आणि चांगल्या फीचर्ससह येणारे POCO Smartphone पॉप्युलर ठरले. या वर्षाअखेरीस कंपनी आणखी अनेक फोन्स लाँच करण्याच्या तयारीत आहे. पण या वर्षी मार्च महिन्यात भारतात लाँच करण्यात आलेला POCO X3 Pro फोन एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. एका भारतीय युजरने POCO X3 Pro फोन चार्ज झाल्यानंतर, तो चार्जरपासून हटवल्यानंतर जवळपास 5 मिनिटांत ब्लास्ट झाल्याची घटना घडल्याचं त्याने सांगितलं आहे. युजरने दिलेल्या माहितीनुसार, दोन महिन्यांपूर्वी त्याने POCO X3 Pro फोन खरेदी केला असल्याचं सांगितलं. तसंच ब्लास्ट झालेल्या फोनचे फोटोही त्याने शेअर केले आहेत. फोटोमध्ये बॅटरी फुगलेली दिसते आहे. एका फोटोमध्ये फोनच्या ब्लास्टनंतर बेडवरील चादरही जळालेली दिसतेय. त्यावेळी त्या व्यक्तीने फोन बेडवर ठेवलेला असावा. स्फोटावेळी आजूबाजूला कोणीही नसल्याने मोठी हानी टळली आहे.

जाहिरात

बापरे हे काय विचित्र! व्यक्तीने गिळला अख्खा Nokia 3310 मोबाईल, पोटात झाले तीन तुकडे, X-Ray पाहून डॉक्टरही शॉक

POCO India ने या घटनेवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. POCO फोनमध्ये दुसऱ्यांदा अशी घटना समोर आली आहे. यापूर्वी एप्रिलमध्ये POCO X3 ब्लास्ट झाला होता. यासाठी पोको इंडियाने एक्सटर्नल फोर्सला दोषी ठरवलं होतं. आता कंपनी या प्रकरणाचीही सखोल चौकशी करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात