Amazon Wow Salary Days: अर्ध्या किंमतीत घरी घेऊन या TV, AC आणि फ्रिज; वाचा कधी मिळणार ही 50% पर्यंतची सूट

Amazon Wow Salary Days: अर्ध्या किंमतीत घरी घेऊन या TV, AC आणि फ्रिज; वाचा कधी मिळणार ही 50% पर्यंतची सूट

अ‍ॅमेझॉनवर Wow सॅलरी डेज (Amazon Wow Salary Days Sale 2020) सेल सुरू झाला आहे. यामध्ये घरच्या वापरातील काही महत्त्वाची उपकरणे, कंझ्यूमर इलेक्ट्रॉनिक्स, टीव्ही, फर्निचर इत्यादींवर खूप चांगल्या ऑफर्स मिळत आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 02 ऑक्टोबर : अ‍ॅमेझॉनवर Wow सॅलरी डेज (Amazon Wow Salary Days Sale 2020) सेल सुरू झाला आहे. यामध्ये घरच्या वापरातील काही महत्त्वाची उपकरणे, कंझ्यूमर इलेक्ट्रॉनिक्स, टीव्ही, फर्निचर इत्यादींवर खूप चांगल्या ऑफर्स मिळत आहेत. हा सेल 5 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. या  सेलमध्ये नो कॉस्ट ईएमआय (No-cost EMI) आणि एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. LG, Bosch, Bajaj, Bose, Sony, Dell, Mi Android TVs, Hometown, Duroflex, Sleepwell या कंपनीच्या प्रोडक्ट्सवर अधिक बचतीचा पर्याय उपलब्ध आहे. जाणून घ्या यापैकी की टॉप ऑफर्स कोणत्या आहेत.

या आहेत बेस्ट ऑफर्स

WoW Salary Days सेल मध्ये HSBC क्रेडिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड EMI च्या माध्यमातून शॉपिंग केल्यास 10 टक्के डिस्काऊंट मिळेल. याव्यतिरिक्त ग्राहकांना 10 हजाराचा शॉपिंगवर जास्तीत जास्त 1500 रुपयांची सूट मिळेल.

घरातील वापराच्या उपकरणांवर 50% पर्यंतची सूट

या सेलमध्ये घरातील वापराच्या उपकरणांवर 50 टक्के पर्यंतची सूट  मिळत आहे. या सेलमध्ये तोशिबा आणि फॉक्सस्कार यासारख्या ब्रँडच्या नुकत्या लाँच झालेले वॉशिंग मशिन उपलब्ध आहेत, त्ंयांची किंमत 7499 रुपयापासून सुरू होते आहे.

(हे वाचा-डेबिट-कार्डचे नियम बदलल्यानंतर ग्राहकांवर काय होणार परिणाम? वाचा सविस्तर)

रेफ्रिजरेटरवर 35% सूट, व्होलटास, एलजी, गोदरेज आणि सान्योसह इतर अनेक ब्रँडच्या एसीवर 40% सूट याशिवाय टीव्हीवर 30% सवलत आणि 4 के टीव्हीवर 30% सूट या सेलमध्ये मिळणे आहे. बोट, जेबीएल, एमआय आणि इतर साऊंडबारवर 30% सूट मिळत असून इतर टॉप ब्रँडच्या स्पीकर्स आणि हेडफोनवर 50% पर्यंतची सूट मिळत आहे.

कम्प्यूटर डिव्हाइस आणि अ‍ॅक्सेसरिजवर ऑफर

कम्प्यूटर डिव्हाइस आणि अ‍ॅक्सेसरिजवर 50 टक्के पर्यंतची सूट आहे. त्याचबरोबर लॅपटॉपवर 35%, गेमिंगवर 40% आणि स्मार्टवॉच, हार्ड ड्राईव्ह आणि एसएसडी वर देखील 40% पर्यंतची सूट आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: October 2, 2020, 9:47 AM IST
Tags: moneysale

ताज्या बातम्या