मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /17 हजार रुपयांचा फोन केवळ 749 रुपयांत खरेदीची संधी, Redmi च्या 5G फोनवर जबरदस्त ऑफर

17 हजार रुपयांचा फोन केवळ 749 रुपयांत खरेदीची संधी, Redmi च्या 5G फोनवर जबरदस्त ऑफर

जर तुम्ही नवा स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. या सेलमध्ये Redmi Note 10T 5G फोन अतिशय कमी किमतीत खरेदी करता येईल. 16,999 रुपयांचा फोन तुम्ही केवळ 749 रुपयांत मिळवू शकता.

नवी दिल्ली, 4 मे : Amazon Summer Sale 2022 आज 4 मेपासून सुरू झाला आहे. या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्सपासून फॅशनवियर, डिव्हाइसपासून ते स्मार्टफोन लॅपटॉप-टॅबलेट, टीव्ही, हेल्थ अप्लायन्सेस अशा अनेक गोष्टींवर 70 टक्क्यांपर्यंत सूट मिळते आहे. त्याशिवाय अनेक नवे लाँच प्रोडक्टही पाहायला मिळतील. जर तुम्ही नवा स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. या सेलमध्ये Redmi Note 10T 5G फोन अतिशय कमी किमतीत खरेदी करता येईल. 16,999 रुपयांचा फोन तुम्ही केवळ 749 रुपयांत मिळवू शकता.

Redmi Note 10T 5G ची लाँचिंग प्राइज 16,999 रुपये आहे. परंतु Amazon Summer Sale मध्ये हा फोन 13,999 रुपयांत उपलब्ध आहे. फोनवर 3000 रुपयांचा डिस्काउंट मिळतो आहे. त्यानंतर बँक आणि एक्सचेंज ऑफर्सही आहेत. त्यामुळे या फोनची किंमत आणखी कमी होते.

Redmi Note 10T 5G वर 12,250 रुपयांची एक्सचेंज ऑफर आहे. जर तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज केला तर इतकी सूट मिळेल. परंतु 12,250 रुपयांची ऑफर फोनच्या कंडिशनवर, मॉडेलवर अवलंबून आहे. पूर्ण ऑफर मिळण्यासाठी फोनची कंडिशन आणि मॉडेल चांगलं असणं गरजेचं आहे. जर संपूर्ण ऑफर मिळाली, तर फोनची किंमत 749 रुपये होईल.

हे वाचा - केवळ 1700 रुपयात घरी आणता येईल iPhone 12, Flipkart Big Saving Days Sale ची भन्नाट ऑफर

जर जुना फोन एक्सचेंज करायचा नसेल, तर बँक ऑफर आणि कूपन आहे. फोनवर 1750 रुपयांचं कूपन मिळतं आहे. हे अप्लाय केल्यानंतर फोनची किंमत 12,249 रुपये होईल. त्यानंतर बँक ऑफरही आहे. जर तुम्ही ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर केला, तर 1000 रुपये डिस्काउंट मिळेल. त्यानंतर फोनची किंमत 11,249 रुपये होईल.

First published:

Tags: Redmi users, Xiaomi redmi