मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /यंदाच्या उन्हाळ्यात AC घ्यायचा आहे? या नामांकित कंपन्या देत आहेत बंपर ऑफर; वाचा सविस्तर

यंदाच्या उन्हाळ्यात AC घ्यायचा आहे? या नामांकित कंपन्या देत आहेत बंपर ऑफर; वाचा सविस्तर

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

सध्या राज्याच्या काही भागांत कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस किंवा त्याच्याही पुढे जाऊ लागलं आहे. वाढत्या उकाड्यापासून दिलासा मिळावा, यासाठी सर्व जण आता पंखे (Fan), एअर कूलर (Air Cooler), एअर कंडिशनर (Air Conditioner) आदी गोष्टींची खरेदी करू लागले आहेत.

पुढे वाचा ...

  मुंबई, 16 मार्च: गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या (Summer 2022) तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत. राज्याच्या काही भागांत कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस किंवा त्याच्याही पुढे जाऊ लागलं आहे. वाढत्या उकाड्यापासून दिलासा मिळावा, यासाठी सर्व जण आता पंखे (Fan), एअर कूलर (Air Cooler), एअर कंडिशनर (Air Conditioner) आदी गोष्टींची खरेदी करू लागले आहेत. पंखे, एअर कंडिशनरला वाढती मागणी पाहून अनेक कंपन्यांनी सेल, डिस्काउंट ऑफर्स जाहीर केल्या आहेत. तुम्ही यंदाच्या उन्हाळ्यात आल्हाददायी गारव्याचा आनंद घेता यावा यासाठी स्मार्ट एसी (AC) खरेदी करण्याचं प्लानिंग करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. अ‍ॅमेझॉनवर (Amazon offers) तुम्हाला नामांकित कंपन्यांचे एसी अत्यंत कमी किमतीत, वेगवेगळ्या ऑफर्समध्ये खरेदी करता येणार आहेत.

  यंदा उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच तुम्हाला अ‍ॅमेझॉन समर अप्लायन्सेस फेस्टमध्ये (Amazon Summer Appliances Fest) एअर कंडिशनर धमाकेदार डिस्काउंटमध्ये खरेदी करता येणार आहे. एसीची किंमत कमी झाल्याने तुम्हाला अगदी 5 स्टार रेटिंग (5 Star Rating) असलेले एसीही अगदी सहजपणे खरेदी करता येणार आहेत. या एसीजना कमी वीज लागते. तसंच अनेक तास सुरू ठेवूनदेखील वीजबिलात फारसा फरक पडणार नाही.

  हे वाचा-उन्हाळ्यात वाढत्या Electricity Bill चे नो टेन्शन, विजेशिवाय चालवा घरातली उपकरणं

  कोणत्या AC वर मिळत आहे ऑफर

  >> लिव्ह प्युअर (Livpure) 1.5 टन 5 स्टार वाय-फाय इन्व्हर्टर स्प्लिट एसीची किंमत 52,999 रुपये आहे; पण अ‍ॅमेझॉनवर हा एसी डिस्काउंटवर (Discount) तुम्हाला 29,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. वीज बचतीसाठी या एसीला 5 स्टार मिळाले आहेत.

  >> टीसीएल (TCL) 1.5 टन 5 स्टार वाय-फाय एआय अल्ट्रा - इन्व्हर्टर स्प्लिट एसी तुम्हाला अ‍ॅमेझॉनवर डिस्काउंटमध्ये 31,999 रुपयांना मिळेल. या एसीची किंमत 50,990 रुपये आहे. याशिवाय या एसीवर 4910 रुपयांची एक्स्चेंज ऑफरही आहे.

  >> सॅमसंग (Samsung) 1.5 टन 5 स्टार, वाय-फाय इनॅब्लिड इन्व्हर्टर स्प्लिट एसीची लॉंच किंमत 67,990 रुपये आहे. हा एसी अ‍ॅमेझॉनवर 41,490 रुपयांना उपलब्ध आहे. या एसीवर 26,500 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. याशिवाय एचडीएफसी बॅंकेच्या (HDFC Bank) ऑफर्सही आहेत. या बॅंकेच्या क्रेडिट कार्डवरून पेमेंट केल्यास तात्काळ 1500 रुपये डिस्काउंट मिळेल. त्याशिवाय 4910 रुपयांची एक्स्चेंज ऑफरही या एसीसाठी आहे.

  हे वाचा-नवा AC घेण्याचा विचार करताय? खरेदीआधी या गोष्टी लक्षात ठेवाच

  >> एलजी (LG) 1.5 टन 5 स्टार एआय ड्युएल इन्व्हर्टर वाय-फाय स्प्लिट एसीची लॉंचिंग प्राइस 56,490 रुपये आहे; पण अ‍ॅमेझॉनवर हा एसी 44,490 रुपयांना उपलब्ध आहे. या एसीवर 12 हजार रुपयांचा डिस्काउंट मिळत असून, याशिवाय 4910 रुपयांची एक्स्चेंज ऑफरही (Exchange Offer) ग्राहकांना मिळणार आहे. यामुळे ग्राहकांना पैशांची बचत करून आपल्या आवडीचा एसी खरेदी करता येणार आहे.

  First published:

  Tags: Amazon, Amazon subscription, Summer, Summer season