जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / 30 दिवस मोफत पाहा amazon prime, पण नंतर नेटफ्लिक्सप्रमाणे किती द्यावे लागतील पैसे?

30 दिवस मोफत पाहा amazon prime, पण नंतर नेटफ्लिक्सप्रमाणे किती द्यावे लागतील पैसे?

अ‍ॅमेझॉन प्राइमची मेंबरशिप घेऊन एन्जॉय करा. सध्या अ‍ॅमेझॉन प्राइम डे सेल सुरू आहे.

अ‍ॅमेझॉन प्राइमची मेंबरशिप घेऊन एन्जॉय करा. सध्या अ‍ॅमेझॉन प्राइम डे सेल सुरू आहे.

आता मेंबरशिप घेतल्यास तुम्हाला एक महिना म्हणजेच 30 दिवस मोफत केवळ वेबसीरिज नाही, तर वेगवेगळे चित्रपटही पाहायला मिळतील.

  • -MIN READ New Delhi,Delhi
  • Last Updated :

नवी दिल्ली, 17 जुलै : तुमच्या कुटुंबियांना चित्रपट पाहायला आवडतात? तुम्हाला वेबसीरिज तर पाहायला आवडतच असणार. मग वाट कसली पाहताय, अ‍ॅमेझॉन प्राइमची मेंबरशिप घेऊन एन्जॉय करा. सध्या अ‍ॅमेझॉन प्राइम डे सेल सुरू आहे. त्यामुळे आता मेंबरशिप घेतल्यास तुम्हाला एक महिना म्हणजेच 30 दिवस मोफत केवळ वेबसीरिज नाही, तर वेगवेगळे चित्रपटही पाहायला मिळतील. यासाठी आपल्याला फार काही नाही फक्त अ‍ॅमेझॉन प्राइमचं पेज ओपन करायचं आहे. त्यावर साइन इन टू जॉइन प्राइम हा ऑप्शन दिसेल. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर 30 दिवसांच्या फ्री ट्रायल ऑप्शनवर जा. मग तुम्हाला पेमेंटचे ऑप्शन दिसतील. त्यातील एका पर्यायावर क्लिक करून तुम्ही पैसे भरू शकता. तुम्ही UPI ऑप्शन निवडू शकता किंवा कार्ड पेमेंटही करू शकता.

News18लोकमत
News18लोकमत

पेमेंट होताच तुम्हाला 30 दिवस मोफत अ‍ॅमेझॉन प्राइम एन्जॉय करता येईल. मात्र त्यानंतर तुमच्या खात्यातून 1499 रुपये कमी होतील, ज्याद्वारे तुम्ही वर्षभर ही सुविधा सुरू ठेवू शकता. सीमा हैदरच्या घरी रात्री अचानक आले पोलीस! का लागला दरवाजा उघडायला वेळ? 1 महिना मोफत अ‍ॅमेझॉन प्राइम वापरण्यासाठी तुम्हाला त्यानंतरचं पूर्ण वर्ष ते वापरण्याची आणि त्यासाठी 1499 रुपये भरण्याची तयारी ठेवावी लागेल. कारण ते आपोआप तुमच्या खात्यातून कमी होणार आहेत. तुमची इच्छा नसेल तरीही तुम्हाला वर्षभराची मेंबरशिप मिळेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात